एड्सनिर्मूलन : विषाणूसंसर्गाच्या भयावर मात

एड्सनिर्मूलन : विषाणूसंसर्गाच्या भयावर मात

एड्सनिर्मूलन : विषाणूसंसर्गाच्या भयावर मात

Human immunodeficiency virus HIV हा साधारण 1980 पासून आपल्याला माहीत झाला. 1959 मध्ये कॉंगोमध्ये एड्सची केस पहिली मिळाली, असे म्हणतात. पण 1980 पर्यंत त्यावर संशोधन झालेले नव्हते. हा व्हायरस चिंपांझीपासून माणसात आला असे म्हणतात.

सुरुवातीला अमेरिकेत समलिंगी पुरुषांमध्ये hiv चा फैलाव जास्त झाला असला तरी भारतातील पहिली केस चेन्नई मधील देहविक्रय करणाऱ्या स्त्री मध्ये 1986 मध्ये सापडली. 1988 सालापासून WHO ने 1 डिसेंबर हा जागतिक एड्स डे म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.

HIV हा RNA व्हायरस असून तो रक्तातील लिंफोसाईटमध्ये वाढतो. लिंफोसाईट ह्या पेशी इम्युनिटी म्हणजेच रोग प्रतिकार शक्तीसाठी आवश्यक असतात आणि व्हायरस त्यांचाच नाश करतो. त्यामुळे हळूहळू रोग्याची इम्युनिटी कमी होत जाते आणि ज्या जंतूंमुळे नॉर्मल माणसाला रोग होणार नाही, त्याही जंतूंमुळे त्याला रोग होतो. ह्याला apportunistic infection असे म्हणतात.

लिंफोसाईट काउन्ट 200 पेक्षा कमी झाले की एड्स झाला असे म्हणतात. त्यानंतर रोगी मृत्यू पावतो. HIV पॉझिटिव्ह ते एड्स ह्यामध्ये साधारण 10 वर्षांचे अंतर असते.

हा व्हायरस शरीरसंबंध, रक्त आणि इतर स्त्राव ह्यामार्फत पसरतो. त्यामुळे देहविक्रय करणाऱ्या व्यक्तींना ह्या रोगाचा जास्त धोका असतो. मात्र हळूहळू लक्षात आले की बाधित व्यक्तीचे रक्त घेतल्यास, लॅब स्टाफमध्ये रक्त घेताना पेशन्टची सुई लागणे, हाताला जखम असताना त्यावर पेशन्टचे रक्त लागणे, इत्यादी मुळेही hiv चा संसर्ग होऊ शकतो.

कोणताही व्हायरस नवीन असतो तेव्हा, त्याबद्दल विशेष माहिती नसते आणि गैरसमज खूप असतात. HIV चा संबंध अनैतिक शरीरसंबंधांशी जोडला गेल्यामुळे हा एक सामाजिक डाग मानला गेला आणि त्या पेशन्टनाच नव्हे तर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स, लॅब स्टाफला सुद्धा वाईट वागणूक मिळू लागली. पण अनेक NGO त्यांना मदत करायला पुढे आले. तसंच संशोधनातून त्यावर औषधेही निघाली.

ही औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात हे खरे असले तरी त्यामुळे hiv म्हणजे मृत्यू हा समज दूर झाला.

सुरुवातीला hiv पॉझिटिव्ह लोकांना सांगायचे की तुम्ही लग्न करायचे नाही, केल्यास hiv पॉझिटिव्ह व्यक्तीबरोबरच लग्न करायचे. आणि मूल अजिबात होऊ द्यायचे नाही, कारण आई पासून मुलाला हा रोग होऊ शकतो. मात्र आता औषधे निघाल्यापासून आईला औषध दिल्यास मुलाला रोग होत नाही. पेशन्टचे जीवनमान वाढले आहे. तसंच अनेक NGO hiv ने आई वडील गेलेल्या मुलांचा सांभाळ करतात.

आणखी अनेक बदल करून hiv संसर्ग रोखण्यात वैद्यकीय क्षेत्राला यश आले आहे.

1 देह विक्रय करणाऱ्या स्त्रिया, पुरुष, ट्रान्स जेंडर ह्यांच्यात रोगाविषयी प्रबोधन आणि कंडोम च्या वापराची जागरूकता निर्माण करणे.
2 रक्तपेढीमध्ये फक्त ऐच्छिक रक्तदानास परवानगी. रक्तदात्याकडून hiv बाबत धोका असणारी वागणूक नसल्याचे प्रतिपादन घेणे.
3 तरीही सर्व रक्तपिशव्यांची hiv साठी तपासणी करून पॉझिटिव्ह आल्यास ती पिशवी टाकून देणे.
4 प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी सुई वापरणे. ह्यात गोंदवणे, न्हाव्यांचे ब्लेड, नाक, कान टोचणे इत्यादी सर्व गोष्टींचा समावेश आहे.
5 मेडिकल स्टाफ साठी सुरक्षेचे नियम बनवणे, नीडल इंज्युरी झाल्यास करावयाचे प्रोसिजर इ बनवणे.
6 रक्त किंवा कुठलाही शरीरातील द्रव सांडल्यास त्याची स्वच्छता कशी करायची ह्याचे नियम बनवणे.
7 शिरेतून ड्रग घेणाऱ्या लोकांना hiv पासून वाचवणे. त्यासाठी त्यांचे प्रबोधन करणे.
8 रेडिओ, टी व्ही, परिसंवाद, मासिके ह्यातून ह्या रोगाची आणि त्यापासून बचावाची माहिती सतत लोकांना देणे.

अनेक डॉक्टर्स आणि संस्था हे काम गेली 20 वर्षे सतत करत आहेत. लोकांमध्ये आता बऱ्यापैकी जागरूकता आली आहे.

ह्या वर्षीच्या जागतिक एड्स दिनाचे घोषवाक्य आहे, Ending the HIV epidemic: resilience and impact.

आता जोरदार प्रयत्न आणि लवचिकता ह्यांच्या साहाय्याने ह्या साथीचा शेवट करण्याची वेळ आली आहे.

 

 

डॉ. मंजिरी मणेरीकर

 नामवंत पॅथाॅलाॅजिस्ट | नॅशनल एडस् रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे येथे पॅथाॅलाॅजिस्ट व टीएन मेडिकल कॉलेज व नायर हॉस्पिटलमध्ये लेक्चरर म्हणून कामाचा अनुभव.


MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!