नासा म्हणते, दिवाळीतील रोषणाईमुळे प्रकाशात पडणारा फरक अत्यंत सुक्ष्म ; अंतराळातून टिपणं निव्वळ अशक्य !

नासा म्हणते, दिवाळीतील रोषणाईमुळे प्रकाशात पडणारा फरक अत्यंत सुक्ष्म ; अंतराळातून टिपणं निव्वळ अशक्य !

नासा म्हणते, दिवाळीतील रोषणाईमुळे प्रकाशात पडणारा फरक अत्यंत सुक्ष्म ; अंतराळातून टिपणं निव्वळ अशक्य !

भारताची नासाने अंतराळातून उपग्रहाद्वारे टिपलेली प्रतिमा समाजमाध्यमांत डोकावली नाही, अशी एकही दिवाळी जात नाही. किंबहुना, त्या प्रतिमेशिवाय लोकांना दिवाळी अपूर्ण वाटू लागलीय. गेल्यावर्षीच्या कोविडकाळात 'दिवे लावा' ईव्हेन्टनंतर ही प्रतिमा अधिकच चर्चेत आली. पण ना ही प्रतिमा नवी आहे, ना तिची चर्चा !

नासा हिस्टरी ऑफिसच्या ट्वीटर हॅन्डलवरून दिलेल्या माहितीनुसार, सदरची प्रतिमा १२ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यावर्षीच्या दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी टिपलेली आहे.

सुओमी एनपीपी उपग्रहावरील व्हिजिबल इन्फ्रारेड इमेजिंग रेडिओमीटर सूटने (व्हीआयआयआरएस) दक्षिण आशियाचं रात्रीच्या वेळचं दृश्य टिपलेलं होतं. ही प्रतिमा व्हीआयआयआरएसने गोळा केलेल्या डेटावर आधारित आहे, जी हिरव्यापासून जवळच्या इन्फ्रारेडपर्यंत तरंगलांबीच्या श्रेणीत प्रकाश शोधते. शहरांतील प्रकाश वेगळा करणं सोपं व्हावं, म्हणून प्रतिमा उजळवण्यात आली आहे.

बहुतांशी उजवळलेली क्षेत्रे भारतातील शहरे आहेत, जो जगातील सर्वात मोठी हिंदू लोकसंख्या असलेला देश आहे. भारतात १.२ अब्जपेक्षा जास्त लोक राहतात. १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेली देशात ३० शहरे आहेत. (तुलना करता चीनमध्ये अशी ६२ तर अमेरिकेकडे ९ शहरे आहेत.) बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तानमधील शहरेही प्रतिमेच्या कडेवर दिसत आहेत.

ही प्रतिमा दरवर्षी दिवाळीत समाजमाध्यमांत प्रसारित होते. अगदी गेल्यावर्षी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी कोविड संकटकाळात दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं, तेव्हाही ही प्रतिमा प्रामुख्याने भाजपा पक्षाकडून व त्यांच्या विसंबून, विश्वासाने किंवा धाकाने अनेक मान्यवरांनी प्रसारित केली होती. बडे राजकीय नेते, खेळाडू, सिने अभिनेत्यांनी या बुद्धीबधीरतेत हातभार लावल्याने या प्रतिमेची महती भलतीच वाढली. त्यामुळे गेल्या दहा वर्षात वारंवार सत्यशोधन होऊनही दिवाळीत भारताचा भूभाग कसा उजाळलेला असतो, हे दर्शवण्यासाठी हिंदुत्ववादी या प्रतिमेचा वापर करतात.

बिजिनेस इनसाईडरने दहा वर्षांपूर्वीच या प्रतिमेचा दिवाळीशी संबंध जोडण्यावरून स्पष्टीकरण प्रकाशित केलं आहे. अलिकडच्या काही वर्षांत सोशल मीडिया वेबसाइट्स आणि इंटरनेटवर ही प्रतिमा पुन्हा वेगाने फिरत आहे. परंतु,, प्रतिमेसोबत जो दावा केला जातो, तो प्रतिमा प्रत्यक्षात दर्शवत नाही.

अमेरिकेच्या संरक्षण हवामान उपग्रह कार्यक्रमांतर्गत (डीएमएसपी) उपग्रहांद्वारे प्राप्त ऑपरेशनल लाइन्सकॅन सिस्टमच्या आकडेवारीच्या आधारे एनओएएचे शास्त्रज्ञ ख्रिस एल्विज यांनी कालनिहाय लोकसंख्या वाढ अधोरेखित करण्यासाठी २००३ मध्ये तयार केलेली ती एक रंग-संमिश्रण प्रतिमा आहे.

त्या प्रतिमेत, पांढऱ्या भागात १९९२ पूर्वी दिसू शकणारा शहरांतील प्रकाश दाखवलेला आहे, तर निळ्या, हिरव्या आणि लाल छटा अनुक्रमे १९९२, १९९८ आणि २००३ मध्ये दिसणारा शहरातील प्रकाश दर्शवतो.

नासाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध उपरोक्त माहितीसोबत हेही वाचायला मिळतं की प्रत्यक्षात, दिवाळीत तयार झालेला कोणताही अतिरिक्त प्रकाश इतका सूक्ष्म असतो की अंतराळातून पाहिले असता तो अगम्य असण्याची शक्यता असते. अंतराळातून तो इतक्या ठळकपणे स्वतंत्रपणे टिपणं निव्वळ अशक्य आहे.

लोकांच्या मेंदूची धार्मिक जडणघडण हजारो वर्षांपासून असत्यावर पटकन विश्वास ठेवणारी बनलेली असल्याने, ज्यांचे स्वार्थ खोटेपणावरच विसंबून आहेत, अशा लोकांचं फावतं. जे सत्यशोधन करतात, त्यांचीच प्रतिमा खलनायकी रंगवून लोकांनी त्यांचं सत्यशोधन स्वीकारू नये व खोट्यालाच चिकटून राहावं, असाही जाणीवपूर्वक प्रचार-प्रसार करणाऱ्यांकडे त्यासाठीच्या प्रचंड मोठ्या यंत्रणा आहेत. त्यामुळेच सत्यशोधन झालेली गोष्टही आधीच्याच असत्य रुपात पुन्हा पुन्हा भेटत राहते.

त्यात शिकलेसवरले मोठ्या संख्येने सहभागी असतात. त्यांना जोवर आपल्या बेजबाबदारपणाची लाज वाटत नाही, तोवर #फेकन्यूज पसरत राहणार ! पण ज्यांना हा चिंतेचा विषय वाटतो, त्यांनी समोर आलेलं सत्य व्यापक प्रमाणावर पसरवायला काहीच हरकत नाही.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!