समुहांसाठी फेसबुकने केलेत नवे बदल !

समुहांसाठी फेसबुकने केलेत नवे बदल !

समुहांसाठी फेसबुकने केलेत नवे बदल !

फेसबुकवरील समुहांच्या बाबतीत काही नवे बदल होऊ घातले आहेत, ज्यामुळे समूहांच्या प्रशासकांकडे समूहावर नियंत्रण करण्यासाठी अतिरिक्त अधिकार येत आहेत.

समूहांवर कोणाला सहभागी करून घ्यायचं किंवा नाही याचा अधिकार प्रशासकांकडे असतो, परंतु नव्या बदलानुसार जर समूहाची सेटिंग एका विशिष्ट पद्धतीने ठेवली, तर बाहेरील सदस्य थेट समूहात सहभागी होऊ शकतात; परंतु त्यांनी पोस्ट अथवा कॉमेंट करावी की नाही हे ठरवण्याचे अधिकार प्रशासकांनाच असतील.

त्याच प्रमाणे समूहात नसलेली व्यक्तीसुद्धा अभ्यागत म्हणून समूहात पोस्ट किंवा कॉमेंट करू शकेल ; अर्थात त्यासाठी प्रशासकांची परवानगी आवश्यक असणार आहे.

प्रशासकासाठी एक सहाय्यक टूल असणार आहे, ज्यात पोस्टचे निकष निश्चित केल्यावर ते सहाय्यक टूल स्वतःहून कारवाई करेल ; अर्थात ही कारवाई अन डू  करण्याचीही सोय असणार आहे

समूहाची सेटिंग आता संपूर्ण समूहाला प्रभावित करणारी किंवा एखाद्या सदस्याच्या बाबतीत नियंत्रित करणारीसुद्धा असू शकणार आहे. फेसबुक समुहांसाठीचे हे बदल 11 जून पासून लागू होत आहेत

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!