सामाजिक अवहेलना झेलत डाॅक्टरी केली, जी कोविड संकटकाळात धावून आली !

सामाजिक अवहेलना झेलत डाॅक्टरी केली, जी कोविड संकटकाळात धावून आली !

सामाजिक अवहेलना झेलत डाॅक्टरी केली, जी कोविड संकटकाळात धावून आली !

सध्याचा काळ हा जितका असंवेदनशील घटनांनी बरबटलेला आहे तितकाच संवेदनशील लोकांनी आपल्या आतील मानवी संवेदना जिवंत ठेऊन सावरलेला आहे.

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर चालू आहे. कोरोनाचा प्रसाराला सुरुवातीच्या काळात धार्मिक रंग देण्याचा प्रयत्नही देशात झाला, मात्र कोरोना हा विषाणू लिंग, जातपात, पंथ, धर्म याच्या पलिकडे पसरला. या विषाणूपासून मानवनिर्मित कोणतीही उतरंड वाचू शकली आहे. अगदी त्याच प्रकारे देशभरातल्या सर्व कोरोना योद्ध्यांनी जात पात धर्म लिंग याच्या पलिकडे जाऊन या महा भयंकर साथीच्या आजाराला टक्कर दिली.

देशभरातले सगळे डॉक्टर्स अगदी तळहातावर जीव घेऊन सेवा देतायत. यात पुरुष आणि महिला डॉक्टरांचा समावेश आहेच आहे, पण तृतियपंथी डॉक्टरही आपली सेवा देतायत.

डॉ. अक्सा शेख ही स्वतंत्र भारतातील पहिली तृतियपंथी डॉक्टर आहे. 38 वर्षीय डॉ.अक्सा दिल्लीतील जामिया हमदर्द कोविड सेंटर नोडल अधिकारी आहे. कोरोना काळात तब्बल २००० रुग्णांची सेवा तिने केलीय. एवढंच नाही तर तिच्या काम करण्याच्या पद्धतीची दखल घेऊन लसीकरणा संबंधीच्या महत्वाच्या कामाची जबाबदारीही तिच्यावर सोपवण्यात आलीय.

 

डॉ. अक्सा यांच संपूर्ण शिक्षण मुंबईमध्ये झालय. भारतात ज्या तबलीग समाजाला कोरोना स्प्रेडर म्हणून बदनाम केलं गेलं, त्याच तबलीग समाजात तिचा जन्म झालाय.

तिचं संगोपन एका पुरुषाप्रमाणेच झालंय. अक्साचे सुरुवातीचं नाव जाकिर शेख ! न कळत्या वयात जाकिरलाही काही कल्पना नव्हती की आपण एक तृतियपंथी आहोत.

 जाकिरचं मेडिकल शिक्षण मुंबईच्या केईएम हॉस्पिटल मधील सेठ जीएस मेडिकल कॉलेजमध्ये झाले. या काळात त्याला त्याच्या आतल्या भावनांची जाणीव अगदी प्रकर्षाने झाली. जाकिर पुरुषांसारख वावरायचा खरा, पण ते त्याला एखाद्या कैदखान्यासारख वाटू लागलं. आणि इथेच त्यांनी ठरवलं की आपण आपल्या मुळ स्वभावाला मरु देता कामा नये आणि त्यांनी आपलं नैसर्गिक रुप स्विकारलं.

ते त्याच्या कुंटुंबियाना पचलं नाही की समाजालाही. त्यामुळे कुटुंबातील लोकांनी जाकिरच्या या निर्णयाचा विरोध तर केलाच पण त्याच्याशी असलेले सर्व सबंधही तोडून टाकले. परंतु, जाकिरने या सगळ्यांचा विरोध पत्करुन अक्सा शेख हे नवं रुप धारण केलं.

 

मुंबईत राहून आपलं कार्य करण तिच्यासाठी कठीण होतं म्हणून तिने परिवार आणि ओळखीच्या लोकांपासून दूर जाऊन आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठीची दिल्लीची वाट धरली. दिल्लीतील जामियाला आपला नवा परिवार बनवला आणि या काळात आपलं एम डी. ही पूर्ण केलं आणि ती देशातील पहिला तृतियपंथी डॉक्टर झाली.

कालांतराने शरीरात जे जे बदल होत गेले ते ते स्विकारत ट्रांस जेंडर पुरुषापासून तीने थेट ट्रांस जेंडर महिलेचं रुप धारणं केलं. यासाठी तिने मेडिकल सर्जरीचाही आधार घेतला.

अक्सा शेख यांच्या म्हणण्यानुसार, ‘समाजाने घालून दिलेले बंधन झुगारुन ‘स्व’चा शोध घेण्याचा प्रवास म्हणजे खरं स्वतंत्र’ !

ख-या अर्थाने अक्सा स्वतंत्र झाली होती. इतर मुलींप्रमाणे तिचेही काही स्वप्न आहेत. तिला लग्न करुन स्वत:चा परिवार त्यासोबत येणारे नातेसंबंध उभे करायचेत कारण अक्सा डॉक्टर झाल्यानंतरही घरच्यांनी तिला स्विकारल नव्हतं. मध्यंतरी ती कामा निमित्त मुंबईला येत जात होती, पण ती स्वताच्या घरी जाऊ शकतं नव्हती. हळू हळू घरच्यांनी तिला स्विकारायला सुरुवात केलीय ; पण आजही ते तिला जाकिर याच नावाने हाक मारतात.

 

डॉ. अक्सा शेख सध्या दिल्लीतील मुस्लिम बहूल भाग ओखला इथे वास्तव्यास आहेत. तिथे तिला गरीब/कष्टकरी लोकांसाठी दवाखाना उभारायचाय आणि तृतियपंथी समाजाविषयी लोकांच्या मनातील घृणा कमी करुन एकसंध समाज निर्माण करायचाय.

 

डॉ.अक्सा शेख म्हणतात- “ मैं तमाम मानवता के लिए काम करना चाहती हूं। मैं समाज को यह बताना चाहती हूं कि वो इंसानों की क़ाबलियत को सिर्फ औरत या मर्द के तौर पर नही आंक सकते। समाज जिन्हें किन्नर या हिजड़ा समझकर नीचा समझता है वो भी नजरिया बदलकर देखने पर बेहतर इंसान होते हैं”।

 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!