उलटतपासणी : प्रत्येक कोविड रुग्णामागे केंद्र सरकारकडून तीन लाख मिळतात, हे खरं आहे का ?

उलटतपासणी : प्रत्येक कोविड रुग्णामागे केंद्र सरकारकडून तीन लाख मिळतात, हे खरं आहे का ?

उलटतपासणी : प्रत्येक कोविड रुग्णामागे केंद्र सरकारकडून तीन लाख मिळतात, हे खरं आहे का ?

प्रत्येक कोरोना रुग्णामागे दीड लाख रुपये खर्च म्हणून नगरपालिका आणि महानगरपालिका यांना देण्यात येईल असे केंद्र सरकारकडुन जाहीर करण्यात आले आहे, म्हणून जनतेला विनंती आहे की आपण जागरूक राहावे. महानगरपालिका, नगरपालिका, पॅथोलॅब आणि प्रायव्हेट डॉक्टर हे सर्व मिळून कोरोना रुग्णांची संख्या जास्तीत जास्त कशी वाढवता येईल या प्रयत्नात आहेत व त्यानुसार शोध घेत आहेत. सामान्य माणसाला ताप किंवा सर्दी खोकला झाला…की त्याला कोरोना positive घोषित करीत आहेत, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीमागे दीड लाख रुपये मिळवता येतील. केंद्र सरकारकडून हा प्लॅन सध्या पूर्ण महाराष्ट्र आणि भारतात सुरू झाला आहे. तेव्हां जनतेने अशा प्रकारे त्या सर्वांचा प्रयत्न हाणून पाडा….”कोरोना “हा आता कोणताही आजार राहिलेला नसून तो आता मेडिकल इंडस्ट्री चा धंदा झाला आहे.

अशा प्रकारचा संदेश आपल्याला प्राप्त झाला आहे का ? असेल तर नोंद घ्या की हा संदेश खोटा आहे !

आपण जर हा संदेश इतरांना पुढे पाठवला असेल तर जाणीव असूद्या की आपण एका फौजदारी गुन्ह्यात सहभागी झाला आहात, कारण कोणतीही खोटी माहिती तयार करणं, खरी आहे म्हणून पसरवणं हा कायद्याने गुन्हा आहे.

उपरोक्त संदेश खोटा असल्याचं स्वत: केंद्र सरकारनेच स्पष्ट केलं आहे.

या संदर्भात टाईम्स ऑफ इंडिया पासून अनेक माध्यमात १० ते १२ मे दरम्यान बातम्या येऊन गेल्या आहेत.

टाईम्स ऑफ इंडिया ची बातमी वाचण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा : Don’t trust audio message about government giving Rs 3 lakh to Covid-19 patients

या बातमीत केंद्र सरकारच्या ट्वीटर हॅन्डलवरून दिलेल्या माहितीचा आधार घेण्यात आला आहे, ज्यात म्हटलं आहे की प्रत्येक पेशंटमागे तीन देण्याची केंद्र सरकारची कोणतीही योजना नाही.

केंद्र सरकारचं सदरचं ट्वीट पाहण्यासाठी इथे क्लिक करा : Central Government giving Rs. 3 Lakh per COVID-19 patient to the State Government for looking after them is FAKE !

प्रत्येक रुग्णामागे केंद्र सरकारकडून राज्य सरकारला ठराविक रक्कम मिळते, हाच संदेश कधी तीन लाख, कधी दीड लाख तर कधी एक लाखाच्या रकमेसह पसरवला जात आहे. पण स्वत: केंद्र सरकारनेच अधिकृत ट्वीटरवरून खुलासा केला असल्याने सदरचा मेसेज खोडसाळ, खोटा असल्याचं स्पष्ट होतं.

Factcheck by MediaBharatNews Team & Kaydyane Waga Movement

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!