पॅकेज फायद्याचे नाही ; कोकण दौऱ्यानंतर फडणवीसांचं मत !

पॅकेज फायद्याचे नाही ; कोकण दौऱ्यानंतर फडणवीसांचं मत !

पॅकेज फायद्याचे नाही ; कोकण दौऱ्यानंतर फडणवीसांचं मत !

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दापोली येथे पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

१) पॅकेज जाहीर केले. पण, त्याचा फायदा होणार नाही. मासेमारांसाठी त्यात काहीही नाही. मी अनेक कोळीवाड्यांना भेटी दिल्या. डिझेलचा परतावा तत्काळ दिला, तर त्यांच्या हाती पैसा येईल. अनेकांना बोटींच्या दुरूस्तीसाठी लाख-दीड लाख रूपये लागणार आहेत जुने कर्ज असल्याने नवीन घ्यायचे कसे, हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. आधीच कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे उत्पन्न बंद आहे आणि त्यात हे चक्रीवादळाचे संकट. त्यांचे जुने कर्ज माफ करून नवीन कर्ज मिळण्याची व्यवस्था करावी लागेल.

२) आता 10 दिवस झाले पण, मदत नाही. अशा आपत्तीत मदत तत्काळ द्यायची असते. वीज नसल्याने बँकांचे व्यवहार थांबले आहेत. त्यामुळे रोखीने मदत देण्याचा निर्णय घ्यावा लागेल.

३) निवार्‍यासाठी शीटस मिळत नाहीत. त्याची काळाबाजारी होत आहे. तीन पट भाव आकारले जात आहेत. ही काळाबाजारी कशी थांबेल, यासाठी शासनाने तातडीने पाऊले उचलण्याची गरज आहे.

४) भाजपाच्या वतीने आम्ही काही कंपन्यांशी बोललो आहोत. भाजपाच्या वतीने जितकी मदत करता येणे शक्य आहे, तितकी आम्ही करू. पण, शासनाची शक्ती मोठी असते. त्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

५) हेक्टरी मदतीतून काहीही साध्य होणार नाही. एका गुंठ्याला केवळ 500 रूपये मदत मिळेल. सफाईसाठी लागणारा पैसा सुद्धा त्यापेक्षा अधिक आहे. 100 टक्के अनुदानातून फळबाग योजना राबवावी लागणार आहे. चालू कर्ज माफ करून दीर्घमुदतीचे कर्ज द्यावे लागेल

६) केंद्र सरकारने स्वत: हमी घेऊन वित्तपुरवठ्याच्या योजना जशा तयार केल्या, तशा योजना राज्य सरकारला तयार कराव्या लागतील. शाळांची मोठी दुरावस्था झाली आहे. जे 10 हजार रूपये जाहीर केले, ते कमी असले तरी ते तत्काळ दिले पाहिजे. या मदतीला विलंब झाला तर काहीच उपयोग नाही.

७) आता सर्व व्यवहार आपण सुरू केले, तर कोणतेही संकट आले तरी त्याला यशस्वीपणे तोंड द्यावे लागेल. नाभिक समाजाला सर्व राज्यांनी परवानगी दिली आहे. महाराष्ट्राने सुद्धा दिली पाहिजे. व्यवसाय सुरू झाले नाही, तर कोरोनापेक्षा मोठे संकट येईल.

News by MediaBharatNews Team

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!