फडणवीस खोटं बोलताहेत ; विजय वडेट्टीवार यांची टीका

फडणवीस खोटं बोलताहेत ; विजय वडेट्टीवार यांची टीका

फडणवीस खोटं बोलताहेत ; विजय वडेट्टीवार यांची टीका

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आजचे दावे धादांत खोटे आहे. कोरोना संसर्गाच्या उपाययोजनांसाठी केंद्र सरकारने राज्याला एक नवा पैसा दिला नसून देवेंद्र फडणवीस खोटे बोलून राज्यातील जनतेची दिशाभूल करित आहेत.

दरवर्षी प्रमाणे केंद्राचा राज्य आपत्ती व्यवस्थापनासाठीचा १७१८.४० कोटीचा निधी आला आहे. केंद्राने दरवर्षी प्रमाणे राज्य आपत्ती व्यवस्थापनासाठी २०२०-२१ साठी ४२९६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यातील ४० टक्के निधी म्हणजे १७१८.४० कोटींचा निधी हा राज्य आपत्ती व्यवस्थापन व रिसपॉन्ससाठी आहे. त्यातील ३५ टक्के निधी करोनासाठी खर्च करता येवू शकतो.

महाराष्ट्र विधीमंडळातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका आॅनलाईन पत्रकार परिषदेत केंद्राने महाराष्ट्राला कशी किती मदत केलीय, याची आकडेवारी सादर केली. त्यासोबत भाजपाने #modiformaharashtra हा हॅशटॅगही चालवला. त्याच संदर्भाने,  फडणवीस खोटं बोला, नेटाने बोला या युक्तीचा अवलंब करित आहेत, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्वीटद्वारे केली आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!