सर्वोच्च न्यायालयातही जेव्हा फेक मेसेजचा हवाला दिला जातो…

सर्वोच्च न्यायालयातही जेव्हा फेक मेसेजचा हवाला दिला जातो…

सर्वोच्च न्यायालयातही जेव्हा फेक मेसेजचा हवाला दिला जातो…

देशाच्या सर्वोच्च न्यायालयात एक व्हॉट्सअॕप फोरवर्डेड मेसेज भारताच्या साॅलिसिटर जनरलकडून वाचला जातो, तो मेसेज पूर्णतः खरा नसतो, त्यातील सत्य वेगळंच असतं, तो एक फेक मेसेज असतो. जाणून घेऊया या गंभीर प्रकारामागचं सत्य.

२८ मेला सुप्रिम कोर्टात देशभरात मजुरांच्या स्थलांतरीत मजुरांच्या अत्यंत दयनीय अवस्थेच्या पार्श्वभूमीवर सरकारकडे जबाब मागीतल्यानंतर भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता उपस्थित होते. त्यांनी देशभरातील स्थलांतरीत मजुरांसाठी भारत सरकारने कोणत्या योजना आखल्या,कोणती ठोस पाऊले उचलली ह्या बद्दल मा.सुप्रिम कोर्टाला माहिती दिली.

आपला सरकारतर्फे जबाब नोंदवताना त्यांनी मजुरांची स्थिती मांडणा-या पत्रकारांना, सामाजिक कार्यकर्त्यांना उद्देशून ‘काही जण कयामत के पैगंबर बनून सरकारला प्रश्न विचारत आहेत,असे लोक सोफ्यावर बसून फक्त सरकार वर सातत्याने टिका करतात आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना सरकारचे काम दिसणार नाही,सरकारनी मजुरांसाठी केलेले काम दिसणार नाही’ अस वक्तव्य केलं.

ह्यानंतर पुढे बोलताना तुषार मेहतांनी पुलित्जर पुरस्कार विजेता पत्रकार केविन कार्टर यांनी सुदान दुष्काळ आणि भूकबळी च्या पाश्वभूमीवर घेतलेल्या जगप्रसिद्ध छायाचित्राचा दाखला दिला.

ते म्हणाले

“१९८३ मध्ये एक पत्रकार सुदानला जातो. तिथे त्याला भूकेने व्याकुळ अवस्थेत पडलेला एक मुलगा दिसतो. त्या मुलाच्या बाजूला एक गिधाड उभा असलेला दिसला, जो त्या मुलाच्या मरणाची वाट पहात असतो. त्यांनी तो फोटो लगेच घेतला. कालांतराने तो फोटो जगप्रसिद्ध न्यूयार्क टाईम्स मध्ये प्रसिद्ध झाला. फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यात त्या पत्रकारांनी आत्महत्या केली. जेव्हा त्या पत्रकाराला दुस-या एका पत्रकाराने प्रश्न विचारला ‘त्यावेळी त्या ठिकाणी मुलाच्या बाजूला किती गिधाडं होती? फोटोग्राफरने उत्तर दिलं, एक ! पत्रकारांनी त्याला क्राॅस करत सांगितलं. त्या मुलाच्या मरणावर टपलेले दोन गिधाडं त्या ठिकाणी होते एक त्या मुलाच्या बाजूला आणि एक हातात कॕमेरा घेऊन”

अगदी अशाप्रकारे आपल्या देशातील बुद्धीजीवी लोक असतात, असा रोख तुषार मेहता यांचा होता. सुप्रिम कोर्टातल्या ह्या संवादाची खात्री केल्यानंतर असे समजले की वरील संवाद हा खरा आहे.

खरतर देशाच्या सॉलिसिटर जनरलनी सुप्रिम कोर्टात एक व्हॉट्स अॕप फॉरवर्डेड मेसेज वाचला. ही कहाणी शब्द नी शब्द काही दिवसापूर्वी सोशल मिडियावर सरकारच्या बचावासाठी फिरत होती. हीच कहाणी सुप्रिम कोर्टात वाचून सरकारचा पक्ष तुषार मेहता मांडतात आणि सरकारला विरोध करणा-यांना मरणावर टपलेले लोक अशी टिकाही करतात.

पण काय आहे नेमकं सत्य –

१) फोटोतील तो मुलगा त्यावेच्या दुष्काळातून वाचला होता. १४ वर्षानंतर त्या मुलाचा मलेरियाने मृत्यू झाला. (संदर्भ-Pgurus मधील एक लेख)

केवळ व्हॉट्स अॕप वरील मेसेजचा धागा पकडून भारताचे सॉलिसिटर जनरल केविन कार्टरला त्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार धरुन त्याचा तुलनेसाठी वापर करतात.

२) पत्रकाराने केविनला तु दुसरा टपलेला गिधाडं होतास तु त्या मुलाला वाचवू शकला असतास, असं म्हटल्याचा कोणताही पुरावा कोठेच उपलब्ध नाही. पत्रकार आणि केविनचा संवाद हा पूर्णतः फेक आहे.

तो मुलगा तेव्हा मेलाच नव्हता; उलट केविनने त्या पक्षाला तिथून हाकलून लावलं. त्यानंतर तो मुलगा उठून चालायला लागला. (स्नोप्स २०१८- फॕक्ट चेक – न्यूयार्क टाईम्सला त्यांनी सांगितलेल आहे)

३) त्या मुलाच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत, ह्या एवढ्या एकाच कारणामुळे केविनने आत्महत्या केलेली नव्हती.

टाईम्स मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखानुसार, तो पैशाची चणचण,मुलीचं संगोपन आणि आपल्या अत्यंत जवळच्या मित्राचा मृत्यू, सुदानचा दुष्काळ इ.कारणामुळे तो ड्रग्सच्या आहारी गेला आणि २७ जुलै १९९४ ला त्याने आत्महत्या केली.

सोशल नेटवर्किंगवर येणारा सगळाच मजकूर खात्रीशीर नसतो. सर्वसामान्य माणसं डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवतात आणि पसरवत राहतात. पण आता देशाचे साॅलिसिटर जनरलसुद्धा वाॅटस्एप मजकुराचा हवाला सर्वोच्च न्यायालयात देऊ लागले आहे.

News by MediaBharatNews Team

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!