विकासाचं गुजरात मॉडल फेक ! वेंटिलेटर प्रकरण सरकारच्या अंगलट !

विकासाचं गुजरात मॉडल फेक ! वेंटिलेटर प्रकरण सरकारच्या अंगलट !

विकासाचं गुजरात मॉडल फेक ! वेंटिलेटर प्रकरण सरकारच्या अंगलट !

४ एप्रिल २०२० ला गुजरातचे मुख्यंत्री विजय रुपाणी यांनी अहमदाबाद स्थित एका कंपनीकडून बनवलेले कथित वेंटिलेटर अहमदबाद येथील हॉस्पीटल मध्ये लावून उद्घाटन केलं. त्यानंतर अहमदाबाद मधील बऱ्याचशा दवाखान्यात हे वेंटिलेटर पाठवण्यात आले. पण आता तब्बल १५ दिवसानंतर ही बातमी समोर येत आहे की मुख्यमंत्र्यांनी हॉस्पीटलमध्ये लावलेल वेंटिलेटर नसून ते अंबु बैग आहेत.

वेंटिलेटर म्हणून अंबु बैग देणा-या कंपनीसोबत मुख्यमंत्री विजय रुपानी ह्यांचे घनिष्ठ सबंध आहेत. मित्राच्या कंपनीला फायदा पोहचावा म्हणून केलेला हा खटाटोप आता संपूर्ण पणे उजागर झाला आहे. वेंटिलेटरच्या नावाखाली दुसऱ्याच सामग्रीचा पुरवठा करणे आणि एवढ्यावरच न थांबता अहमदाबाद स्थित संपूर्ण सरकारी दवाखान्यात अशा फेक मशीन बसवणे हे अपराधीक कृत्य आहे. यामुळे फेक गुजरात मॉडलचा फेक चेहरा आता जनतेसमोर आलेला आहे.

गुजरात सरकार मधील एका वरिष्ठ अधिका-याच्या म्हणण्यानुसार हा एक गंभीर गुन्हा आहे ह्यात स्वत: गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी सहभागी आहेत. हे प्रकरण भाजपाच्या अंगलट येऊ शकतं अस ध्यानात येताच केंद्र सरकारने राज्य सरकारला विश्वासात न घेता राजकोट स्थित एकावरिष्ठ अधिका-यांसह अहमदाबादचे जिल्हाधिकारी विक्रांत पांडेय ह्यांच्या बदल्या ताबडतोब केल्या आणि त्यांना दिल्लीला पाठवण्यात आलं. (अहमदाबादच्या सरकारी हॉस्पीटल मध्ये लागलेले कथित वेंटिलेटर हे कलेक्टरच्या देखरेखीखाली लागलेले होते,वेंटिलेटरची क्षमता आणि त्याची quality चेक करणं हे काम जिल्हाधिका-यांनी का केलं नाही असे प्रश्न उपस्थित होण्याआधीच त्यांची बदली करण्यात आली)

ज्या दिवशी हे कथित वेंटिलेटर दवाखान्यात लागत होते, त्यावेळी विजय रुपानी हे उद्घाटन सभारंभात बोलताना म्हणाले की-

“करोना महामारीच्या काळात सगळीकडे वेंटिलेटरची कमतरता असताना गुजरात मध्ये अगदी स्वस्त किंमतीत वेंटिलेटर उपलब्ध करुन देण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत,करोनाशी दोन हात करणारे गुजरात हे जगातील सगळ्यात अव्वल राज्य असेल.‌”

पण आता आपल्याच ह्याच स्टेटमेंटवरून रुपानी यांनी पलटी मारली, मी वेंटिलेटर असं म्हणालोच नव्हतो, असा युक्तीवाद त्यांनी सुरु केला.

पण गुजरात सरकारच्या प्रेसनोट मध्ये दवाखान्यात लावलेल्या सर्व मशिन्स ह्या ‘वेंटिलेटर’ आहेत असा स्पष्ट उल्लेख आहे. गुजरात सरकारच्या प्रेसनोट मध्ये खालील उल्लेख आपल्याला पहायला मिळतो –

राजकोट स्थित ज्योती सिएनसी कंपनीने केवळ दहा दिवसात वेंटिलेटर धमन-१ विकसित करुन नरेंद्र मोदींच्या ‘मेक-इन-इंडिया’ च्या स्वप्नांना पंख दिले. राजकोट स्थित स्थानिक उद्योगपती श्री.पराक्रम सिंह और ज्योती सीएनसी ह्यांच आम्ही अभिनंदन करतो,आणि पुढील कार्यास शुभेच्छा देतो.

ह्या प्रकरणाचा पर्दापाश तेव्हा झाला अहमदाबाद शासकीय हॉस्पीटल मध्ये २३० धमन-१ वेंटिलेटर असूनही ते अक्षम आहेत, ते व्यवस्थित रित्या काम करत नाहीत,मुळात वेंटिलेटरची कुठलीही क्षमता त्या मशिनमध्ये नव्हती त्यामुळे हॉस्पीटल प्रशासनाला अधिकच्या चांगल्या वेंटिलेटरची गरज भासू लागली.

त्यानंतर ज्योती सीएनसी कंपनीद्वारे एक स्टेटमेंट जाहीर करण्यात आलं की आम्ही पाठवलेल्या मशिन ह्या पूर्णतः वेंटिलेटर नाहीत, त्यात वेंटिलेटरची पूर्ण क्षमताही नाही आम्ही आता धमन-३ ची निर्मिती करत आहोत, ते पूर्णतः वेंटिलेटर असतील.

करोना महामारीच्या काळात एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्रीच वैयक्तिक स्वार्थासाठी जनतेच्या जिवाशी खेळतोय. तथाकथित गुजरात मॉडलचा ढिंढोरा मिरवण्यासाठी अशा प्रकारचं गुन्हेगारी काम विजय रुपानी ह्यांच्यामार्फत झालेलं आहे. त्यामुळे ते जनतेची जाहिर माफी मागतील का हा प्रश्न आहे? आणि केंद्र सरकार रुपानीवर कारवाई करेल का ह्याकडे सर्वांच लक्ष आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!