युपीत दोन वर्षाच्या बाळासह कुटुंब जिवंत जाळलं !

युपीत दोन वर्षाच्या बाळासह कुटुंब जिवंत जाळलं !

युपीत दोन वर्षाच्या बाळासह कुटुंब जिवंत जाळलं !

मागच्या होळीच्या वेळेस डीजेच्या आवाजावरून वाद झाला होता. बरं, वाद दोन धर्मातीलही नाही. उलट एकाच धर्मातील असणंच रामबहादुरच्या कुटुंबाला भारी पडलं ! मैनपुरी मधील माधवनगर मध्ये एक परिवार गाढ झोपेत असताना घराला आग लावून घर पेटवण्यात आलं.

आरोपी मुरारी हा छतावरुन घरात घुसला आणि दरवाज्याला बाहेरुन कडी लावून रॉकेल ओतून घर पेटवून दिले.आणि एकच आकांत सुरु झाला. जोरजोरात ओरडण्याचा आवाज ऐकल्यानंतर शेजारी जागे झाले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला तात्काळ संपूर्ण परिवाराला खोलीतून बाहेर काढण्यात आलं पण तो पर्यंत प्रत्येकाच्या शरिराने आग पकडली होती.

दवाखान्यात नेत असताना दोन वर्षीय ऋचाचा वाटेतच मृत्यू झाला आणि उर्वरित चौघेही गंभीररित्या भाजले आहेत त्यांच्यावर सैफई हॉस्पीटलमध्ये उपचार चालू आहेत. राम बहादूर (वय ४५) पत्नी सरला (४२), मुली रौली (१८), शिखा (१६) अशी त्यांची नावं आहेत.

एकतर सणउत्सवांना उन्मादी स्वरुप द्यायचं, पोलिसांनी धार्मिक रोष नको म्हणून डोळेझाक करायची, कोणी तक्रार केलीच तर टाळाटाळ करायची, त्यातून लोक आपसांत भिडतात व किरकोळ वाद एखाद्या कुटुंबालाच उद्ध्वस्त करतात.

दवाखान्यात एका मुलीने जबाब नोंदवताना गावातीलच मुरारी नामक व्यक्तीचे नाव घेतले, म्हणून बरं, त्या आधारे रामबहादूर यांच्या भावाने मुरारी विरुद्धात पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

अशा घटनांत धागेदोरे नसतात तेव्हा त्याला धार्मिक रंग देऊन विखार पेटवणं सद्या देशात सहज झालं आहे. पण द्वेष पसरवून राजकीय पोळी भाजता येणं शक्य नसलं की लोक अशा अमानवीय घटनांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. राजकारण करता येत नसलं की लोकांच्या जीवाची किंमत शून्य आहे भारतात !

News by MediaBharatNews Team

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!