रत्नागिरीतला बालकांचा तारणहार गेला !

रत्नागिरीतला बालकांचा तारणहार गेला !

रत्नागिरीतला बालकांचा तारणहार गेला !

रत्नागिरीतील प्रसिद्ध बाल रोग तज्ञ व शासकीय रुग्णालयातील प्रसिद्ध डॉक्टर दिलीप मोरे यांचं आज पहाटे दुःखद निधन झालं.

गेले काही दिवस ते कोरोनाशी लढा देत होते ; त्यांच्या प्रकृतीत मध्यंतरी सुधारणा होत होती, परंतु कालपासून त्यांची प्रकृती गंभीर होत गेली आणि आज पहाटे त्यांचं दुःखद निधन झालं.

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाच्या काळात डॉ. मोरे यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली होती. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना झालेल्या ४२ छोट्या बालकांना त्यांनी कोरोनामुक्त केलं होतं.

निवृत्तीनंतरही पाच-सहा वर्षे ते शासकीय रुग्णालयात सेवा बजावत होते. त्यानंतर त्यांनी निवृत्तीची इच्छा व्यक्त केली असतानाच कोरोनाची लागण झाली. गेले काही दिवस त्यांच्यावर रत्नागिरी येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा कोरोनाशी लढा सुरू होता. परंतु खेदजनकरित्या आज त्यांचं निधन झालं.

त्यांच्या निधनामुळे रत्नागिरीकरांनी एक चांगला मनमिळाऊ डॉक्टर व खराखुरा कोरोनायोद्धा गमावला आहे. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!