मजुरी करता करता टिकटाॅक गाजवलं ! आता कौटुंबिक छळाला तोंड देतेय युट्यूबर राधा भालेराव !!

मजुरी करता करता टिकटाॅक गाजवलं ! आता कौटुंबिक छळाला तोंड देतेय युट्यूबर राधा भालेराव !!

मजुरी करता करता टिकटाॅक गाजवलं ! आता कौटुंबिक छळाला तोंड देतेय युट्यूबर राधा भालेराव !!

टिकटाँकवर फेमस. दारूमुळे आईने जाळून घेऊन आत्महत्या. तर दारूड्या बापाचं लिव्हर फुटुन मृत्यू. लहानपणापासून माहेरी सासरी सावत्रपणाचे भोग. इटभट्टीवर बालविवाह.१३ व्या वर्षापासुन इटभट्टीच काम.टिकटाँकवर सव्वालाख फोलोअर्स आणि तिन मिलियन लाईक्स असलेल्या तरुणीचा कौटुंबिक आणि लैंगिक हिंसाचार सहन करत नवऱ्याच्या साथीने जगण्याचा हा धडपडा प्रवास !

टिकटाॅकवर नवऱ्याला झळपण्या शब्द बोलत फेमस असणारी राधा भालेराव रा. भाळवणी ता.करमाळा जिल्हा सोलापुर जिल्ह्यातील ही सत्तावीस वर्षाची विवाहीत तरुणी तीन लेकरांची आई आहे. या तरुणीला मी सुद्धा टिकटाॅवर विडीओ करत असल्याने ओळखीची होती. (वैयक्तिक कधीच भेटलो नाही)

पण मागच्या आठवड्यात तिला यु टु्यब वर फाॅलो करणाऱ्या एका गुजरातमध्ये रहात असलेल्या महाराष्ट्रातील महिलेने माझ्या एका फेसबुक पोस्टवर कमेंट करत राधा भालेराव नावाच्या महिलेले तातडीची मदतीची गरज असल्याचे सांगत तिच्या जिवाला धोका असल्याचं मला सांगितले.

यावर मी तात्काळ संपर्क करत संबंधित पिडीत महिलेला काय अडचण ) कोणती मदत हवी (वैद्यकीय पोलीस आर्थिक) याबाबतची माहिती मला वाट्सएप करायला सांगितली. नंतर संबंधित महिलेने वाट्सएपपवर माहीती टाकली, तेव्हा तिचा डिपी बघत मला ती टिकटाॅक वरची ओळखीची वाटली. नंतर कळले की, तिने तिच्या दिराने तिला अश्लील शिव्या फोनवर दिलेल्या होत्या. त्याबाबतचा विडीओ युट्युबला टाकत तिने मदत मागितली होती.

नंतर मी लागलीच सोलापुरच्या पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्याशी संपर्क साधला. त्यावर त्यांनी तात्काळ प्रतिसाद देत संबंधित पिडीत महिलेला माझ्या वाट्सएपवर छोटीशी तक्रार पाठवायला सांगत करमळा पोलीस ठाण्यातील संपर्क नंबर पाठवला.

करमाळा पोलीस ठाण्यात संपर्क केला असता तेथील बिट अंमलदार यांनी तात्काळ तिथे पोहचतो म्हणाले. पण पोलीस गावात येईपर्यंत काही अनर्थ होऊ नये, म्हणून तेथील पोलीस पाटील विशाल देंडे यांची मदत घेत त्यांना तिला मदत करण्याची विनंती केली. तिथे नणंद राधाचा फोन हिसकावून घेत होती असं (फोन मध्ये ऐकायला येत होत, तिच्या नंणदेशी बोलणं केलं असता, मला तुम्ही बिडमधीच राज्य करायचं, मीबी महिला संघटनेत काम करते, आमच्यात पडू नका असं म्हणू लागली.

ज्या दिराने राधाला शिव्या दिल्या त्या दिरासोबत फोनवर बोलणं केलं तर तीने आमची इज्जत घालवती, म्हणून मी शिव्या दिल्या आहेत. मॅडम पण केस काही करू नका ! मी गावात येऊन माफी मागतो असं बोलला. (ईंदापुरला इटभट्टीवर तो रहातो)

नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच निघत ११ वाजता तिच्या भाळवणी गावात पोहचलो. (प्रवासखर्च राधाच्या युट्युब मैत्रिणीनी केला) याबाबत संबधित गावातील उपसरपंच पोलीस पाटील हेही तिथे भेटायला आले. तेव्हा तीने (फेसबुक लाईव्ह) मध्ये बरेच सांगितले.

ज्यात ती सहा वर्षांची असताना आईची जाळून घेत आत्महत्या झालेली कारण राधाचा बाप दारूडा होता. या दारूपायीच आईचा मृत्यू झालेला ! नंतर पुढे ती नऊ वर्षाची असताना कोटार फुटुन बापाचाही मृत्यू झालेला. नंतर दोघी बहिणी आणि एक भाऊ यांच्या नशिबी अनाथपण आलं; पण तिच्या एका सावत्र बहिणीने त्यांचा परतपाळ केल्यांचं राधाने सांगितले. कारण राधाच्या आईकडील लोकांनी “आमचं गेलं जग बुडालं” म्हणत जबाबदारी घेण्यास नकार दिला.

नंतर पुढे तिने केमच्या आश्रमशाळेत शिक्षण घेतले, पण बहिणीच्या मागं कर्ज मजूरी जास्त मिळत नसल्याने सहावीला गेलेल्या वर्गात असतानाच तिला शाळा सोडावी लागली. बहिण रस्त्याचं डांबरकाम करायची. तिथे हिने तिच्या कामात हातभार लावला. नंतर राधा वयात आली (शानी झाल्यावर) तिचा ं इटभट्टीवर हनुमंत भालेराव (नवऱ्यालाही सख्खी आई नाही) यांच्यासोबत २ मे २००७ रोजी सावत्रबहिण आणि मामा यांनी तिचं बालविवाह लावून दिला.

हसत्या खेळत्या वयात मजुरी, नंतर लग्न पुढे झाल्यापासून तिनं वेगवेगळ्या उरळीकांचन,आकुर्डी, पिंपरी चिंचवड, इंदापुर इत्यादी ठिकाणच्या इटभट्ट्यावर काम केलं. कुणी कामाचे पैसे दिले तर कुणी हडप केले.

याही परिस्थितीमध्ये राधा नवऱ्याच्या साथीने संसार करत होती. नंतर टिकटाॅकच्या माध्यमातून ती तिचे विडीओ अपलोड करू लागली. तिच्या बोलण्यात,वागण्यात गावरान बाज, घरचं गरीबीचं वातावरण, इटभट्टीवरचं वातावरण लेकरं, नवरा घरात जगतानाचा विडीओ लोकांना आवडू लागले.

बघता बघता तिचे पाच महिन्यात सव्वा लाख फाँलोअर्स, तीन मिलियन लाईक्स वाढल्या. याचा परिणाम ती फेमस झाली. तिच्या सोबत लोक फोटो विडीओ काढण्यासाठी तिच्या इटभट्टीवर येऊ लागली. सोबत येताना किराणा, लेकरांना खाऊ कपडे (कधी नवीन तर कधी आडजुने)

राधाला नटायचं सामान, मटण मासे असं बरंच काही आणू लागली. राधा आणि तिच्या नवर्याला इटभट्टीच्या कामातून हप्त्याला एक हजार रुपये मिळायचे, ज्यामधे त्यांचं भागत नसं.

रोज नवीन लोकं रोज नवीन सामानाची मदत लोकं करू लागली (आम्हाला सुद्धा एका पोलीस अधिकाऱ्याने कोंबडीचा विडीओ बघून कोंबड्या आणुन दिल्या होत्या )

नंतर सरकारच्या काय मनात आलं की, टिकटाॅकवर गदा आणत ते बंद केलं त्यानंतर राधाला तिच्या नणंदेने भाळवणीला बोलावून घेतले (त्यांना वाटले की,विडीओमधून लय पैसा कमविला काय की)

पण राधा पुढं पाट मागं पाट अशा अवतारात गावात आली अन नणंद सासरज यांचा भ्रमनिरास झाला. गावात दोन महिन्यापुर्वी आल्यानंतर राधानं तिचं जुनं युट्युब चॅनल अपडेट करत त्याच्यावर तिची कहाणी सांगायला सुरू केली.

सदरील कहाणी तिने सतरा ते अठरा भागात विडीओ स्वरूपात टाकलेली आहे .(कदाचित तिने यावर पुस्तक लिहीले गेले असते तर लय मागणी आली असती, पण शिक्षण पाचवी म्हणुन अडचणी)

सदरील विडीओ बघून काही लोकांनी तिला शेळी घेण्यासाठी पैसे पाठवले. घरावर पत्रे नसल्याने पत्रे घ्यायला पैसे पाठवले ; पण तिचे सदरील पैसे सासऱ्याने वापरले अन तिला जुने मोडके पत्रे आणून दिले.

तसेच राधाचे युट्युबवरील विडीओ बघून आजूबाजूचे नातेवाईक सासरच्या लोकांना सांगु लागले. इज्जत चालली म्हणुन गावात सासरा सासूनणंद यांचा राधाला त्रास सुरू झाला. भालेराव आडनाव लावायचे नाही, असे नणंद म्हणु लागली.

सासु लेकी बोले सुने लागे म्हणत राधाच्या मुलीवर म्हणजे नातीवर घालत,”हिच्या बोच्यावर एक लाथ घातली तर पनास बुलं पडतील” अशा पद्धतीच्या शिव्या देऊ लागली.

नवरा राधाला ताब्यात कसा काय ठेविना, म्हणुन राधाच्या नवऱ्याला चपलाने मारलं. आता जर विडीओ टाकले तर हिला उघडं नागडं करून हाणायचं, हिच्याअंगावर बाया सोडायच्या असं सासरा शिव्या देऊ लागला. दिर इंदापुरमधी राहून अश्लिल शिव्या देऊ लागला.

अशा या जाचातुन सुटका व्हावी म्हणुन राधाने युट्युब वर विडीओ टाकून मदत मागितली आणि आम्ही तिला मदत करत दिरावर विनयभंगाचा गुन्हा करमाळा पोलीस ठाण्यात दाखल झाला. यात सोलापूरच्या अतिशय प्रामाणिक असलेल्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी राधाला तात्काळ मदत केली.

यानिमित्ताने बरेच प्रश्न पडतात !

एखाद्या माणसाच्या वाट्याला दुःख यावं, यासाठीच त्याचा जन्म झालेला असतो काय? काही लोकं चांगल्या भावनेने मदत करत असतील तर ती लोक झोपण्यासाठीच मदत करतात ? तिला केलेली मदत हिसकाऊन घ्यायची अन वरून इज्जत गेली म्हणायचं? बिना मायबापाशिवाय बालपण दोन्ही घरातुन सावत्रपणाचे भोग भोगत ती जगतेय.

दारूमुळे तिचे मायबाप मेले. हसत्या खेळत्या वयात तिचे शिक्षण थांबवुन तिचा बालविवाह केला गेला. याकडे लक्ष नाही जात कुणाचं? ती तिच्या दुःखाचं भांडवल न करता ती त्याला तिच्या मायभाषेतून स्कील म्हणून जगापुढं मांडत असेल आणि त्यातही नवऱ्याच्या खंबीर साथीने तर यात गैर काय?

किती सहज आपण बोलून जातो की ती भीक मागते पण तिच्यावर ही वेळ कोणामुळे आली?दारू जातीयता पितृसत्ता ! यावर कोणी नाही बोलणार?

राधा ज्या समाजातून येते, त्या समाजात डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयभीम म्हणत फार उदो उदो केला जातो, पण त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी राधाला दिलेले समान न्याय, समानता, शिक्षणाचा हक्क, जोडीदार निवडण्याचा हक्क, तिचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वैयक्तिक प्रतिष्ठा यावर याच समाजातून टाच आणली जातेय, हे किती खेदजनक आहे? कधी बदलणार आहोत आपण ?

 

 

 

 

सत्यभामा सौंदरमल

 जिल्हाअध्यक्ष, दामिनी दारूबंदी अभियान
सचिव, निर्धार सामाजिक सेवाभावी संस्था
sattayabhamasaundarmal@gmail.com
nirdhar101@gmail.Com / 9527463565


 

MediaBharatNews

Related Posts
comments
  • राजु खरात

    May 8, 2021 at 12:08 pm

    समाजातील लोकांनी शिल _ विनय याचे पालन करणे आवश्यक आहे.

  • राधाचं आणि तिच्या मदतीला धावून येणाऱ्या प्रत्येकाचं ..कौतुक कराव तितकी कमीच आहे…
    एखाद्या चा हक्क ..डावलण्याचं कामं केलं जातं राधाच्या बाबतीत… तिचं कुटूंब… त्याही पेक्षा कुटूंबातील कही व्यक्तीनी तिचं जगणं हिसकावलं…
    म्हणून जयभीम… म्हणनारा संपूर्ण समाज..बदनाम करणं योग्य नाही.
    “तीच्या समाजाणं तीच्या जगण्यावर टाच आणली” हे म्हणन चुकीचं…

  • leave a comment

    Create Account



    Log In Your Account



    Don`t copy text!