शालेय फुटबाॅल स्पर्धेत तक्षशीला विद्यालय अव्वल

शालेय फुटबाॅल स्पर्धेत तक्षशीला विद्यालय अव्वल

शालेय फुटबाॅल स्पर्धेत तक्षशीला विद्यालय अव्वल

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या विद्यमाने तथा जिल्हा क्रीडा परिषद व उल्हासनगर महानगरपालिका जिल्हास्तरीय ‘शालेय फुटबॉल’ स्पर्धेचे आयोजन मा.बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल उल्हासनगर-४ येथे करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी शहरातून विविध विद्यालयातून विद्यार्थी आले होते. या विद्यार्थी संघातून सदर फुटबॉल स्पर्धेत तक्षशिला विद्यालयाचा १४ वर्षे वयोगटाखालील मुलांचा संघ विजयी झाला आहे. तसेच १७ वर्षे वयोगटाखालील मुलांचा संघ उपविजेता झाल्याने तक्षशिला विद्यालयाचे (माध्यमिक) मुख्याध्यापक  पंजाबराव प्रधान तसेच पर्यवेक्षक सिद्धार्थ शिरसाट यांनी विजयी संघ व क्रीडा शिक्षक अरुण भटकर क्रीडा शिक्षिका विद्या भारसाखळे यांचे अभिनंदन केले आहे. महा महिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीचे सचिव राजेश वानखेडे  व सहसचिव प्रशांत धांडे यांनीही अभिनंदन केले आहे. समाजातील सर्व थरातून विजयी संघाचे कौतुक होत आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!