कधी मुस्लिमांची खोड ; कधी ख्रिश्चनांची ! कुणाला पेटतं ठेवायचंय देशातलं वातावरण !

कधी मुस्लिमांची खोड ; कधी ख्रिश्चनांची ! कुणाला पेटतं ठेवायचंय देशातलं वातावरण !

कधी मुस्लिमांची खोड ; कधी ख्रिश्चनांची ! कुणाला पेटतं ठेवायचंय देशातलं वातावरण !

भारतातलं वातावरण धर्मभावनेवरून सतत तापतं ठेवणं, देश चालवण्यात आलेलं अपयश झाकलं ठेवण्यासाठी धर्मद्वेषाच्या चर्चेत देशाला गुंगवून ठेवणं जणू भाजपाई सत्तास्वार्थी राजकारणाची गरज झालीय. त्यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून देशात रोज कुठे ना कुठे वादविवाद घडवून आणणे, देश धर्मभावनेवरून दुभंगलेला राहिल याबाबत सतर्क राहणे असले उद्योग भाजपा, भाजपाचे नेते व समविचारी मंडळी करीत राहतात.

१९ मार्च रोजी हरिद्वारवरुन पुरी येथे जाणाऱ्या उत्कल एक्सप्रेसने दिल्लीच्या हज़रत निज़ामुद्दीनवरुन राउरकेला जाणाऱ्या चार ख्रिश्चन महिला ननना झांसी स्टेशनवर अभाविप /हिंदु जागरण मंच कार्यकर्ते म्हणवणाऱ्या गुंडांनी पोलिसांच्या हाताशी धरून धर्म परिवर्तनाचा आरोप करत जबरदस्तीने खाली उतरवले. ही अशाच रिकामटेकड्या उद्योगांपैकी एक !

केरळ मधील चार ख्रिश्चन नन यांना रेल्वेच्या डब्यातून धर्मकट्टर कार्यकर्त्यांनी खाली उतरवल्याची घटना समोर आली आहे. चार नन धर्म परिवर्तनाचे काम करत असल्याचा बहाणा करून त्यांना रेल्वेतून खाली उतरवण्यात आलं. मात्र यानंतर लोकांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरलं आहे. कोणाही कार्यकर्त्यांना रेल्वे मधून एखाद्या प्रवाशाला खाली उतरवण्याचा अधिकार कोणी दिला? कोणीही गावगुंड थेट रेल्वेमधून नागरिकांना खाली कसे उतरवू शकतात. असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय.

ह्या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळलीय. मागाहून प्रकरण अंगलट येतंय, हे दिसताच तीन तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनीच धर्म परिवर्तनाचा आरोप फेटाळला. त्यांना परत दुसऱ्या गाडीत बसवून पाठवण्यात आले. नननी आधार कार्ड दाखवून स्वत:ची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न केला ; पण पोलिस म्हणाले, ते बनावट आहे. उच्चस्तरावरून हस्तक्षेप झाल्यानंतर रात्री उशीरा पोलिसांनी ननना सोडलं.

केरळ राज्यातील वातावरण आधीच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकांच्या पाश्वभूमीवर तापलं असताना अधिक धार्मिक धुव्रीकरण घडायला नको म्हणून यात स्वत: केरळच्या मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी, गृहमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात ‘अशा घटना देशाच्या धर्मनिरपेक्षेतेच्या प्रतिमेला मलीन करत असतात त्यामुळे केंद्र सरकारने अशा घटनांचा निषेध नोंदवून संबंधित लोकांवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!