गॅंगस्टर विकास दुबेला राजकीय पाठबळ भाजपाचं !

गॅंगस्टर विकास दुबेला राजकीय पाठबळ भाजपाचं !

गॅंगस्टर विकास दुबेला राजकीय पाठबळ भाजपाचं !

उत्तरप्रदेशात गुन्हेगारी संपवल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सातत्याने केलाय. ३ हजार एन्काऊंटर, ८१ खतरनाक गुंडांचा खात्मा, १६० लोकांना रासुका ! तरी तब्बल ६० गुन्हे दाखल असलेला दहशतवादी विकास दुबे मोकाट होता.

सरकारच्या मेहेरबानीशिवाय ते शक्य नव्हतं. भाजपा राज्यमंत्र्याची पोलिस ठाण्यात हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पण प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या पोलिसांनीही न्यायालयात पलटी मारली होती. ही नुसती दहशत नव्हती, तर दुबेच्या पाठीशी राजकीय संरक्षण होतं.

२०१७ ला एका गुन्ह्यात विकास दुबेचं नाव आलं तेव्हा काही लोकांनी पोलिस ठाण्यात त्याच्या बाजूने प्रतिज्ञापत्रे केली. ती दबावाने केलीयंत का याचं उत्तर देताना विकास दुबे म्हणतो, काही लोकांनी मदत केली. त्यात त्याने दोघांची नावं घेतलीत. अभिजीत सिंह सांगा आणि भगवती प्रल्हाद सागर ! दोघेही भाजपाचे आमदार आहेत.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!