शेतकरी आंदोलनादरम्यानच्या मृत्यूंना सरकार जबाबदार : डॉ. संजय मंगला गोपाळ

शेतकरी आंदोलनादरम्यानच्या मृत्यूंना सरकार जबाबदार : डॉ. संजय मंगला गोपाळ

शेतकरी आंदोलनादरम्यानच्या मृत्यूंना सरकार जबाबदार : डॉ. संजय मंगला गोपाळ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी तीन्ही शेतीविषयक जुलमी शेती कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या व देशभर पसरलेल्या आंदोलनाला ऐतिहासिक यश मिळाल्याच्या निमित्ताने ठाण्याच्या दादोजी स्टेडियमवरील समता कट्ट्यावर जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय (एनएपीएम) च्या वतीने विजय मेळावा साजरा करण्यात आला.

सरकारने तीन शेती कायदे मागे घेतले असले तरी त्याची रीतसर प्रक्रिया पार पडणे बाकी आहे. शेती मालाला किमान हमीभाव कायदा लागू करणे व वीज बिल विधेयक मागे घेण्याच्या शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या अजुनही बाकी आहेत. त्यामुळे शेतकरी आंदोलन सुरूच राहणार आहे. तसंच चार श्रमिक संहिता मागे घेण्यासाठीची लढाई यापुढेही सुरू राहणार असल्याचं श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी यावेळी घोषित केलं.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२० साली शेती विषयक तीन जुलमी कायद्यांचा अध्यादेश जारी केला होता. गेले वर्षभरात शेतकरी आंदोलनात सुमारे सातशे आंदोलक शहीद झाले. लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांना चिरडून मारण्यात आले. या सर्व सरकारला टाळता येऊ शकणा-या मृत्युंना, केंद्र सरकार जबाबदार आहे, असं स्पष्ट मत जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी मांडलं.

 

सरकारने आंदोलन चिरडण्यासाठी, बदनाम करण्यासाठी आणि त्याला हिंसक वळण लावण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. तरीदेखील आंदोलन अहिंसक आणि शांतपणे सनदशीर मार्गाने निर्धाराने सुरू राहिलं. वर्षभरातील शेतकऱ्यांचा संघर्ष आणि त्याला देशभरातील शेतकरी, कामगार, महिला, युवा चळवळींनी दिलेला पाठिंबा यामुळे शेवटी सरकारला नमावे लागलं. सरकार कितीही हुकुमशाही गाजवत असेल तरी जन आक्रोश व जन आंदोलना समोर शासनाला नमावंच लागतं, हेच शेतकरी आंदोलनाने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे, असं डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी म्हटलं.

शेतकऱ्यांच्या लढाईला जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील हजारो जनसंघटनाही सातत्याने सहभागी राहिल्या आहेत. प्रत्यक्ष दिल्लीच्या सीमेवर सुरू सत्याग्रहात विविध राज्यातील कार्यकर्ते सहभागी राहिले आहेत. महाराष्ट्रातूनही कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे.

एनएपीएम तर्फे शेतकरी कामगार महापंचायत, युवा ज्योत दौड, मिट्टी सत्याग्रह यात्रा, शहीद शेतकरी अस्थी कलश यात्रा आदी विविध कार्यक्रम ही आयोजित करण्यात आले होते. यात ठाण्यातून समता विचार प्रसारक संस्था, श्रमिक जनता संघ, म्यु. लेबर युनियन, बाल्मिकी विकास संघ, स्वराज अभियान आदी संघटनांनी सहभाग घेतला होता, अशी माहीती एनएपीएमचे ठाणे शहर समन्वयक अजय भोसले यांनी सांगितले.

आजच्या विजय मेळाव्याला समता संस्थेच्या मनिषा जोशी, हर्षलता कदम, लतिका सु. मो., सुनिल दिवेकर, प्रवीण खैरालिया व अनेक युवा कार्यकर्ते हजर होते.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!