महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात आता गुगल क्लासरुम !

महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात आता गुगल क्लासरुम !

महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात आता गुगल क्लासरुम !

सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत गुगलने भागिदारी केली आहे. या उपक्रमाची अधिकृत घोषणा आज ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे करण्यात आली. या भागीदारीमुळे राज्यातील 2.3 कोटी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित शिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रवेश करू शकणार आहेत. ‘जी स्वीट फॉर एज्युकेशन’, ‘गुगल क्लासरूम’, ‘गुगल मीट’ यासारख्या विनामूल्य साधनांसह दूरस्थ शिक्षणाची सोय यामुळे होणार आहे.

सगळं जग विचित्र परिस्थितीला सामोरं जात असताना आणि आपलं आयुष्य मास्क आणि घरात बंदिस्त झालेलं असताना कोरोनाने आपल्याला काय शिकवलं, असा विचार आपण केला तर कोरोनाने उद्याच्या गोष्टींची आज आपल्याला ओळख करून दिली. उद्याचं जग, उद्याची माध्यमे, उद्याचं शिक्षण कसं असेल याची आजच जाणीव करून दिली. त्यामुळे एक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकताना महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या या पिढीला पुढचं स्वप्नं काय असेल हे केवळ दाखवलं नाही तर ते स्वप्न आजच प्रत्यक्षात आणलं ‘जी स्वीट’ आणि ‘गुगल’ क्लासरुमच्या माध्यमातून असं पाऊल टाकणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं, त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.

‘वर्क फ्रॉम होम’साठीही सहकार्य हवं !

भावीकाळात वर्क फ्रॉम होमची संकल्पना यशस्वीपणे राबविताना उपलब्ध तंत्रज्ञानाचा अधिकाधिक चांगला उपयोग कसा होऊ शकेल यासाठीही ‘गुगल’ने सहकार्य करावं, असं आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह राज्यातील इतर विद्यार्थ्यांचं शिक्षण या कठीण काळात थांबू नये, आणि प्रत्येकाला पूर्वीप्रमाणेच शिक्षण मिळवता आलं पाहिजे, यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कौतुक केलं.

कोरोनाच्या संकट काळात शिक्षणाच्या उद्भवलेल्या समस्येला संधीत रुपांतर करुन डिजिटल क्रांतीचा योग्य वापर करुन विद्यार्थ्यांना याचा उपयोग करुन घेता येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही समान आणि दर्जेदार शिक्षण यामुळे मिळण्याची सोय झाली आहे, असं ते म्हणाले.

सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहचविण्यासाठी आणि शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी इंटरनेटच्या सामर्थ्याचा वापर करुन,ऑनलाईन संसाधने, प्लॅटफॉर्म, बँडविड्थ आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन महाराष्ट्राला शिक्षणातील सर्वात प्रगतीशील राज्य बनविण्याचे आमचं लक्ष्य आहे, असं प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केलं.

आतापर्यंत सुमारे दीड लाख शिक्षकांनी या माध्यमाचा वापर करण्यासाठी रजिस्ट्रेशन केलं असल्यांचंही त्यांनी सांगितलं. गुगलसोबत शिक्षण क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासंबधी दीर्घकालीन भागीदारीची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कोविड विषाणुच्या प्रादुर्भावामुळे देशातील सुमारे ३२ कोटीहुन अधिक मुलांच्या शिक्षणात खंड पडला आहे. परंतु, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्यास ‘गुगल’ कटीबद्ध असून राज्यासोबत सुरु झालेली ही भागीदारी भविष्यात अधिक समृद्ध होईल, अशी ग्वाही गुगलचे भारतातील विक्री प्रमुख आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता यांनी दिली.

काय आहेत नव्या निर्णयातील ठळक बाबी ?

शिक्षणासाठी जी स्वीट : जीमेल, डॉक्स आणि ड्राइव्ह तसेच क्लासरूमसह परिचित संप्रेषण आणि सहयोग साधनांचा विनामूल्य संच. हे कोठेही, केव्हाही आणि डिव्हाइसच्या श्रेणीवर शिकण्यास सक्षम करतं.

‘गूगल क्लासरूम’ : जी स्वीट फॉर एज्युकेशन मधील एक सोपं पण शक्तिशाली साधन, जे शिक्षकांना सहजपणे असाइनमेंट तयार करण्यास, पुनरावलोकन करण्यास आणि आयोजित करण्यात मदत करतं, तसंच वर्गात किंवा दूरस्थ शिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यास मदत करतं.

‘गूगल फॉर्म’ : एक सोपा प्रश्न आणि प्रतिसाद साधन जे शिक्षकांना क्विझ आणि चाचण्या लवकर तयार करण्यासाठी प्रश्न भरण्यास किंवा आयात करण्यास अनुमती देतं.

असाइनमेंट्स : एक असं साधन जे शिक्षकांना लवकर आणि सुरक्षितपणे तयार करण्यास, विश्लेषण करण्यास आणि ग्रेड कोर्सवर्क करण्यास आणि विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अधिक लवचिकता प्रदान करण्यास अनुमती देतं.

News by MediaBharatNews Team

MediaBharatNews

Related Posts
comments

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!