गोरक्षणाच्या नावाखाली पुन्हा दहशतवादी कारवाया ; दिल्लीत युवकावर जीवघेणा हल्ला !

गोरक्षणाच्या नावाखाली पुन्हा दहशतवादी कारवाया ; दिल्लीत युवकावर जीवघेणा हल्ला !

गोरक्षणाच्या नावाखाली पुन्हा दहशतवादी कारवाया ; दिल्लीत युवकावर जीवघेणा हल्ला !

दिल्लीपासून थोड्या अंतरावर असणाऱ्या गुडगांवमध्ये एका मांस सप्लाय करणा-या मुलाला गुंडांनी हाथोड्यांनी जबर मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. सदर युवकाला तात्काळ दवाखान्यात भरती करण्यात आलं असून एका आरोपीला अटक केल्याचं वृत्त आहे. गोरक्षणाच्या नावाखाली या दहशतवादी कारवाया पुन्हा सुरू झाल्या आहेत.

टाईम्स अॉफ इंडिया मध्ये आलेल्या एका बातमीनुसार मेवात मधील मीट सप्लायर लुकमान (२५) ह्या युवकाला गाईचं मांस सोबत घेऊन जात असल्याच्या संशयावरून गुंडांनी मारहाण केली. सदर मारहाणीचा एक व्हिडिओ सोशलमिडियावरुन प्रसारित होतो आहे.

पिडित लुकमान याने पोलिसांना सांगितलेल्या घटनाक्रमानुसार, शुक्रवारी तो आपल्या पिकअप व्हॅनमध्ये म्हशीचं मांस घेऊन जात असताना काही लोकांनी त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली. ते सातआठजण मोटरसायकलवरून लुकमानचा पाठलाग करत होते. त्याला त्यांनी गुडगांव येथे भर बाजारात जुम्मा मशिदीजवळ गाठलं आणि अचानक त्याच्यावर लोखंडाच्या रॉड तसेच हाथोड्यांनी हल्ला सुरू केला. आजुबाजुला लोक होते, पण कोणी मध्ये पडलं नाही. गुडगांवचे स्थानिक पोलिसही आले, पण त्यांनी बघ्याची भूमिका घेतली.

लुकमानचा आरडाओरडा ऐकून लोक जमायला लागल्यावर त्याला त्याच्याच पिकअप व्हॅनमध्ये टाकून बादशहापूरला घेऊन गेले व तिथे मारहाण करायला सुरूवात केली. बादशहापूर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहचले व लुकमानला त्यांच्या तावडीतून सोडवलं; पण आश्चर्यकारकरीत्या आरोपी पोलिसांच्या तावडीतून फरार झाले.

सध्या लुकमानवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी एका आरोपीला अटक केल्याचं वृत्त आहे. बाकी व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या आरोपींचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!