बलात्कार पीडितेलाच हद्दपार करण्यासाठी गाव एकवटलं ! बीड जिल्ह्यातील गेवराईतील संतापजनक प्रकार !!

बलात्कार पीडितेलाच हद्दपार करण्यासाठी गाव एकवटलं ! बीड जिल्ह्यातील गेवराईतील संतापजनक प्रकार !!

बलात्कार पीडितेलाच हद्दपार करण्यासाठी गाव एकवटलं ! बीड जिल्ह्यातील गेवराईतील संतापजनक प्रकार !!

पाच वर्षांपूर्वीच्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील पीडीत महिलेने आरोपींविरोधात लढा देऊन त्यांना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा केला, याचा राग धरून ग्रामपंचायतीने त्या महिलेलाच गावाबाहेर काढण्याचा ठराव केल्याचा अजब तितकाच संतापजनक प्रकार बीड जिल्हयातील गेवराई तालुक्यातील पाचेगावात घडलाय.

संबंधित महिलेवर काही वर्षापूर्वी सामुहिक बलात्काराची घटना घडली होती, अशी माहिती मिळतेय. बलात्कारानंतर तिला गाडीत घालुन पोलीस ठाण्यासमोरच फेकले होते. आरोपींना जामीन झाल्यानंतर त्यांनी तिला पुन्हा मारहाण केली होती. पीडितेने सदरबाबत न्यायालयात दाद मागितल्यानंतर आरोपींचा जामीन रद्द झाला होता.

न्यायालयात तीन वर्षं प्रकरण चाललं आणि आरोपीना नुकतीच जन्मठेपेची शिक्षा लागलीय. पण आरोपी गावातीलच आणि पुढाऱ्यांचे नातेवाईक असल्याचं कळतंय. त्यामुळे आता पीडित महिलेलाच गावातून हाकलण्यासाठी सगळे एकवटलेत.

सदर एकल महिलेच्या हकालपट्टीचा ठरावच ग्रामसभेने केलाय. महिला चारित्र्यहीन आहे, ती खोट्या तक्रारी करते, पैसे उकळते, तिच्यापासून संपूर्ण गावाला धोका आहे, असे आरोप तिच्यावर करण्यात आलेत. तिला गावातून हद्दपार करण्यात यावे, असा ठराव सर्व गावकरी घेत आहोत आणि तो सर्वांना मंजूर आहे, असा ठराव ग्रामपंचायत सदस्यांनी आँगस्ट महिन्यात ग्रामसभेत संमत करून घेतला. पाचेगाव आणि तांडे मिळून चार ग्रामपंचायतींनी असे ठराव केलेत.

गंभीर बाब अशी की ठरावावर ग्रामविकास अधिकाऱ्यांचीही स्वाक्षरी आहे. विशेष म्हणजे सदर महिलेविरोधातच अनुसूचित जातीजमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हाही दाखल झालाय.

बलात्कार पीडित एकल महिलच्या बाबतीत सुरू असलेला हा प्रकार अत्यंत संतापजनक असल्याची प्रतिक्रिया सदर प्रकरणात पाठपुरावा करीत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी मिडिया भारत न्यूज शी बोलताना दिलीय. सौंदरमल यांनी राधाबाई सुरवसे यांच्या समवेत पीडित महिलेची प्रत्यक्ष भेट घेऊन तिची बाजू जाणून घेतली.

बलात्कार प्रकरणात आरोपींना सजा झाल्याचा राग धरून आपणाविरोधात कटकारस्थानं सुरू असल्याचा आरोप पीडित महिलेने केलाय. ग्रामपंचायती आरोपींच्या नातेवाईकांच्या ताब्यात असल्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचं तिचं म्हणणं आहे. शिवाय, आपण शेती करत असलेली गढीवरील आपली वडिलोपार्जित जमीन हडपण्याचा डाव असल्याचाही आरोप महिलेने केलाय.

प्रत्यक्षात ग्रामपंचायतीने महिलेवरच इतरांची जमीन हडपल्याचा आरोप करत नोटीस बजावलीय.

सत्यभामा सौंदरमल यांनी गटविकास अधिकारी अनिरुध्द सानप यांची भेट घेऊन ग्रामसभेच्या ठरावाबाबत जाब विचारला असता, त्यांनी आपण गावात स्थळभेट केल्याचं व आपला अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याचं सांगितलंय.

ग्रामसभेचा ठराव बेकायदेशीर असल्याचं प्रथमदर्शनी मत व्यक्त करत ग्रामसेवकांविरोधात कारवाईची शिफारस केली असल्याचं सानप यांनी म्हटल्याची माहितीही सौंदरमल यांनी दिलीय.

सदर प्रकरण मानवी हक्कांच्या उल्लंघनाचं असल्याचं सांगत संबंधित ग्रामपंचायत बरखास्त करण्यात यावी तसंच संबंधित सदस्यांना निवडणूक लढवण्याची बंदी घालण्यात यावी आणि संबंधित ग्रामसेवकांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशा मागण्या सत्यभामा सौंदरमल यांनी केल्या आहेत. सदरबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!