रुग्णालय नव्हें, कालकोठरी ! गुजरात न्यायालय संतापलं !

रुग्णालय नव्हें, कालकोठरी ! गुजरात न्यायालय संतापलं !

रुग्णालय नव्हें, कालकोठरी ! गुजरात न्यायालय संतापलं !

करोना महामारीच्या काळात अहमदाबादच्या शासकीय रुग्णालयात आतापर्यंत सर्वाधिक ३७७ मृत्यूंची नोंद झाली. ह्याच पार्श्वभूमीवर एका जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान गुजरात उच्च न्यायालयाने गुजरात सरकारला खडे बोल सुनावले.

शनिवारी एका जनहित याचिकेची सुनावनी न्यायमुर्ती मा. जे.बी परदीवाला आणि न्यायमुर्ती आई. जे. वोरा ह्यांच्या खंडपीठाद्वारे झाली.

गुजरात सरकारच्या आरोग्यविषयक धोरणांवर न्यायालयाने गुजरात सरकारला चांगलेच खडसावले.

मा. न्यायलयाने म्हटले आहे, की

“ही गंभीर आणि निराशाजनक बाब आहे,आजच्या तारखेत सरकारी दवाखान्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे, अहमदाबाद शासकीय रुग्णालय हे रुग्णालय कमी कालकोठरी वाटावी इतकी खराब हालत आहे”

पुढे बोलताना न्यायमुर्ती जे.बी.परदीवाला म्हणाले –

” गरीब, कष्टकरी वर्गाला शासकीय रुग्णालयाशिवाय पर्याय नाही त्यामुळे शासकीय रुग्णालय सोयी सुविधायुक्त ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे, गुजरात सरकारचे आरोग्य मंत्री आणि आरोग्य कर्मचारी ह्यांना ह्याच जरासही भान असू नये ही गोष्ट अत्यंत निराशाजनक आहे”

शनिवारी न्यायालयाने आपले स्टेटमेंट जाहिर करून गुजरात सरकारला काही निर्देशही दिले आहेत.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!