कोविड झूठ है, म्हणणारा व्हिडिओ WHO चा आहे ? त्यातली डाॅक्टरमंडळी कोण आहेत ?

कोविड झूठ है, म्हणणारा व्हिडिओ WHO चा आहे ? त्यातली डाॅक्टरमंडळी कोण आहेत ?

कोविड झूठ है, म्हणणारा व्हिडिओ WHO चा आहे ? त्यातली डाॅक्टरमंडळी कोण आहेत ?

कोविड घातक आजार नसून साधा सर्दी खोकल्याचा आजार आहे, असं WHO ने पत्रकार परिषदेत कबूल केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सद्या भारतात मोठ्या प्रमाणावर प्रसारित होतोय. काय आहे, या विडिओमागचं सत्य ?

भारतात लसीकरण कार्यक्रमाचा पुरता बोजवारा उडाला आहे. कोविड जागतिक संसर्गाशी मुकाबला, प्रतिबंधात्मक उपाय आणि लसीकरणाच्या पूर्वतयारीत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सपशेल अपयशी ठरल्याचं आता पुरतं उघड झालं असून, सर्वोच्च न्यायालयसुद्धा सरकारची बाजू सावरू शकलेलं नाही, उलट न्यायालयाने सरकारला धारेवर धरलंय.

ताटाखालच्या माध्यमांवरही लोकांचं लक्ष केंद्र सरकारच्या अपयशावरून भलतीकडे वळवण्याचे आटोकाट प्रयत्नही अपुरे ठरत असून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची माध्यमांनीच फुगवलेली तथाकथित विश्वासार्हता व क्षमता पणाला लागली आहे. नरेंद्र मोदींची लोकप्रियता प्रचंड घसरलेली आहे. पतंजली उद्योजक रामकृष्ण यादवमार्फत सरकारने डाॅक्टरांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा अत्यंत लज्जास्पद प्रयत्नही करून पाहिला.

आता तर कोविडचा विषाणूवगैरे काही नसून तो फ्ल्यूचाच प्रकार आहे, असा दावा WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या नावावर खपवणारा व्हिडिओ भारतात नव्याने पसरतोय.

व्हिडिओसोबत जोडलेल्या हिंदी भाषेतील मजकुरात म्हटलेलं आहे की

ब्रेकिंग न्यूज़: डबल्यू.एच.ओ ने अपनी गलती मानी पूरी तरह से यू-टर्न लेते हुए कहा है कि कोरोना एक सीजननल वायरस है यह मौसम बदलाव के दौरान होने वाला खांसी जुकाम गला दर्द है इससे घबराने की जरूरत नहीं। डब्ल्यू.एच.ओ अब कहता है कि कोरोना रोगी को न तो अलग रहने की जरूरत है और न ही जनता को सोशल डिस्टेंसिंग की जरूरत है। यह एक मरीज से दुसरे व्यक्ति में भी संचारित नहीं होता। देखिये WHO की प्रैस कांफ्रेंस…..

वास्तविक, व्हिडिओत कुठेही WHO चा बॅनर नाही की उल्लेख नाही ! पण सोबतच्या मजकुरात मात्र मोठ्या लबाडीने WHO ची पत्रकार परिषद असल्याचा दावा करण्यात आलाय.

व्हिडिओतली माणसं इंग्लिशमध्ये बोलताहेत आणि सोबत मराठीत लिहिलं पण आहे की WHO ची पत्रकार परिषद, याचा अर्थ व्हिडिओतली माणसं WHO चीच आहेत, असा बेअकली निष्कर्ष काढणाऱ्या तर्कशून्य लोकांचं भारतात बहुमत असल्याने आणि या गाढवपणाला कथित शिकलेसवरलेलेही हातभार लावत असल्याने व्हिडिओ वाॅटस्एपवर forwarded many times या टॅगसहित दिसतो.

वास्तविक, ज्यांचं थोडंफार इंग्लिश चांगलं आहे, अशी कोणीही व्यक्ती व्हिडिओ ऐकून सांगू शकेल की हा WHO चा विडिओ नाही. तरीही, अनेक तथाकथित शिक्षित लोक व्हिडिओ आणि मजकुराचा ताळमेळ नसतानाही तो आंधळेपणाने आणि तितक्याच बेजबाबदारपणे पुढे पाठवत आहेत. ज्यांना इंग्लिशमधलं ठो कळत नाही, त्यांच्यासाठी सोबतचा मजकूर गैरसमज ठाम होण्यासाठी पुरेसा आहे.

व्हिडिओत, WHO चा कोणीही प्रतिनिधी नसून, वर्ल्ड डॉक्टर्स अलायन्स नावाच्या युरोपियन स्थित गटाने तो व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की नोवेल कोरोनाव्हायरस “सामान्य फ्लू विषाणू” आहे आणि कोविड-१९ साथीचा रोग नाही.

मात्र, व्हिडिओतील दावा खोटा असल्याने हा व्हिडिओ यूट्यूबवरून काढून टाकण्यात आला असला, तरी व्हिडिओचे काही भाग फेसबुकवर आणि वाॅटस्एपवर फिरत आहेत.

सद्याच्या जागतिक साथीचं कारण सार्स-कोव्ही-२ हा कोरोनाव्हायरस आहे, इन्फ्लुएंझाचा स्ट्रेन नाही, हे जगभरातील शास्त्रज्ञ सार्वत्रिकपणे मान्य करतात. कोविड-१९ हंगामी फ्लूपेक्षा घातक आहे. कोविड-१९ ने आतापर्यंत अमेरिकेत गेल्या पाच फ्लू हंगामापेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे.

जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांच्या मते, जग कोविड-१९ या साथीच्या रोगाने घेरलेलं आहे.. काही युरोपियन सरकारांनी आणखी एका प्रकरणांशी लढण्यासाठी अधिक निर्बंध लादले आहेत.

तरीही १० ऑक्टोबर २०२० रोजी, एसीयू २०२० या जर्मन संक्षिप्त शब्दाने ओळखल्या जाणाऱ्या गटाचे प्रमुख, हेको शाॅवोनिंग या जर्मन वैद्याने आणि कोविड-१९ साथीच्या रोगाच्या अस्तित्वाला आव्हान देण्यासाठी वर्ल्ड डॉक्टर्स अलायन्स नावाची संस्था स्थापन करण्याची घोषणा केली. त्यांच्या वेबसाइटवर असा दावा करण्यात आला आहे की जून २०२० पासून ‘साथीचा रोग’ मुळात संपला आहे.

या गटाच्या स्थापनेची घोषणा करणारा १८ मिनिटांचा व्हिडिओ एसीयू२०२० वेबसाइटवर पोस्ट करण्यात आला होता; परंतु त्यानंतर यूट्यूबने त्याच्या सेवेच्या अटींचे उल्लंघन केल्याबद्दल तो काढून घेतला आहे. तरीही, साथीच्या रोगामागील विज्ञानाला आव्हान देणाऱ्या दोन डॉक्टरांचा समावेश असलेल्या व्हिडिओचे काही भाग खोटे दावे आणि आकडेवारीसह फेसबुकवर फिरत आहेत.

डच जनरल प्रॅक्टिशनर एलके डी क्लेर्क व्हिडिओत म्हणतात, “आमच्याकडे साथीचा रोग नाही” आणि कोविड-19 ला “सामान्य फ्लू विषाणू” आहे. पण त्यांचा हा दावा डब्ल्यूएचओ, सीडीसी आणि इतर तज्ञांनी स्पष्टपणे नाकारलेला आहे.

समाजमाध्यमात फिरत असलेल्या व्हिडिओतील दुसरी वक्ता म्हणजे आयर्लंडमधील युनिव्हर्सिटी कॉलेज डब्लिनमधील वैद्यकीय शाळेतील प्राध्यापक डोलोरेस कॅहिल ! कॅहिलशी असहमती दर्शवणारं निवेदन जारी करून, तिच्या विद्यापीठानेच तिला तोंडावर पाडलं आणि युरोपियन युनियनने तिला युरोपियन युनियनच्या वैद्यकीय पॅनेलचा राजीनामा देण्यास सांगितलं.

थोडक्यात काय, तर WHO ची पत्रकार परिषद म्हणवणाऱ्या व कोविडवगैरे काही नाही म्हणणाऱ्या व्हिडिओतील दावे एकतर WHO चे नाहीत, शिवाय ते दावे खोटे, निराधार व खोडसाळ आहेत. तो व्हिडिओ पसरवणं हा निव्वळ मूर्खपणा आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!