तथ्य तपासणी : कोरोनील जाऊदेत, आर्सेनिकम अल्बमतरी सिद्ध औषध आहे का ?

तथ्य तपासणी : कोरोनील जाऊदेत, आर्सेनिकम अल्बमतरी सिद्ध औषध आहे का ?

तथ्य तपासणी : कोरोनील जाऊदेत, आर्सेनिकम अल्बमतरी सिद्ध औषध आहे का ?

आयुष मंत्रालयाने जरी कोविड१९ आयुष् औषधांच्या जाहिरातींना बंदी घालणारी ऑर्डर काढली असली तरीही बऱ्याच शहरांत विशेषतः पुणे, वडोदरा, मुंबई येथे खाजगी आणि सरकारी मार्गाने आर्सेनिकम अलबम ह्या होमिओपॅथी औषधाचे वितरण चालू असल्याचे दिसून आले आहे. हे वितरण आयुष्च्या आधीच्या मार्गदर्शक तत्वानुसार करण्यात आले आहे. त्याशिवाय केरळ, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि मुंबई महानगर पालिका ह्यांनी सुद्धा होमिओपॅथी औषधे इम्युनिटी वाढवण्यासाठी व कोविड१९ होऊ नये म्हणून वापरण्याचा सल्ला दिला आहे.

त्याशिवाय, लॉकडाऊन असूनही कोविडरुग्णांची वाढती संख्या आणि त्यावर कोणतेही परिणामकारक औषध नसल्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा कोविडपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आयुषच्या आयुर्वेद आणि होमिओपॅथीविषयक मार्गदर्शक सूचना पाळण्यावर भर दिला आहे.

जानेवारी 2020 मध्ये दिलेली ही मार्गदर्शक तत्वे PIB वेबसाईटवर उपलब्ध आहेत. त्यावर भारतात आणि परदेशातूनही टीका झाल्यावर आयुष् ने परिशिष्ट I आणि परिशिष्ट II वाढवले, ज्यामध्ये आर्सेनिकम अलबम मुळे कोविड१९च्या विरुद्ध इम्युनिटी वाढत असल्याच्या दाव्याला पुरावा म्हणून एका इटालियन संशोधनाचा आधार दिला आहे.(बेलवाईत आणि सहकारी 2015)

ह्यामुळे बऱ्याच लोकांचा विश्वास आहे की आर्सेनिकम अल्बम 30 मुळे शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती वाढते. मात्र कोणत्याही होमिओपॅथीक औषधाचा पेशी आणि त्यांच्या रिसेप्टरवर शास्त्रीयदृष्ट्या काहीही परिणाम असल्याचे सिद्ध झालेले नाही. त्यामुळे सेंट्रल कौन्सिल ऑफ होमिओपॅथी (CCRH) ने हे औषध परिणामकारक असल्याचे सिद्ध करण्यासाठी बरेच वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत मांडले आहेत.

CCRH ने ज्याचा आधार दिला आहे त्या पेपर मध्ये असा दावा केला आहे की ह्या औषधाची ऍक्शन पेशी आणि रेणूंच्या पातळीवर होते.
अल्टन्यूजसारख्या माध्यमांनी ह्या पेपर मध्ये आर्सेनिकम अल्बम 30 च्या ऍक्शन विषयी जे दावे केले आहेत त्याचे पुनरावलोकन केले.

दावा : होमिओपॅथी औषधे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून कोरोना व्हायरस पासून बचाव करतात.
निकाल : चूक


तथ्य तपासणी

आपल्या शरीराची रोग प्रतिकारशक्ती दोन प्रकारची असते.

1 मूळची किंवा innate
2 नंतर तयार होणारी किंवा adoptive

1 Innate (मूळची) : हा आपल्या शरीराचा बाह्य रोगजंतूंना दिलेला नैसर्गिक प्रतिसाद असतो. ह्या प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती जन्मापासून आपल्यामध्ये असते आणि जोपर्यंत इम्युनिटी कमी करणारी औषधे किंवा रोग होत नाहीत तोपर्यंत ती कमी होत नाही. उदा HIV इन्फेकशन, इम्युनिटी कमी करण्यासाठी कॉर्टिकोस्टिरॉईड सारखी औषधे देणे, किंवा जुनाट निद्रानाश.

2 नंतर तयार होणारी इम्युनिटी (adoptive) : है प्रकारची रोगप्रतिकारशक्ती नैसर्गिक किंवा कृत्रिम घटक वापरून बदलता येते. ही आई कडून मुलाला मिळते किंवा जन्मानंतर जेव्हा एखादे इन्फेक्शन होते तेव्हा त्याच्या शरीरात तयार होते. उदा कांजिण्या. किंवा लस टोचल्यास कृत्रिमरीत्या तयार होते. शिवाय एखाद्या रोगप्रतिकारक अँटिबॉडीज असलेल्या व्यक्तीच्या प्लाझ्मा मधून दुसऱ्या व्यक्तीला देत येते.

आर्सेनिकम अल्बम इम्युनिटीवर कोणत्या प्रकारची क्रिया करते असा होमिओपॅथी चा दावा आहे?

आर्सेनिकम अल्बम घेतल्यामुळे आपली मूळची किंवा innate प्रतिकारशक्ती वाढते आणि त्यामुळे आपल्या शरीराला कोरोना सारख्या बाह्य रोगजंतूंशी सामना करण्याची शक्ती मिळते असा होमिओपॅथी चा दावा आहे.

होमिओपॅथी उपचारांसंबंधीचे हे दावे मानवावर केल्या एका संशोधनाच्या आधारे केले आहेत. ह्या संशोधनानुसार ह्या औषधामुळे सायटोकाईन नावाच्या प्रथिनांवर परिणाम होतो. ह्या प्रथिनांची पातळी रक्तात मोजता येते. ह्या प्रथिनांची रक्तातील पातळी ही इन्फेक्शनचे प्रमाण दाखवते. ही पातळी नॉर्मल असल्यास इम्युन सिस्टिम नॉर्मल आहे असे मानता येते. तसेच ही पातळी कमी असल्यास रोगामुळे किंवा औषधांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे असे मानता येते.

CCRH ने उदाहरण दिलेले आर्सेनिकम अल्बम बाबतचे संशोधन पुढीलप्रमाणे :

येथे आपण बेलवाईत आणि सहकाऱ्यांनी २०१५ मध्ये केलेल्या आर्सेनिकम अल्बमच्या इम्युनिटी वाढवण्याच्या परिणामाविषयीच्या संशोधनाचे पुनरावलोकन करू. ह्यानुसार आर्सेनिकम अल्बम इम्युन प्रथिनांची पातळी वाढवून आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

1 दावा: आर्सेनिकम अल्बम जेनेटिक बदलामुळे आर्सेनिक आणि अतिनील किरणांमुळे पेशीचा होणारा नाश थांबवतो.

डे आणि सहकारी (२०१२) आणि दास आणि सहकारी (२०११) ह्यांच्या संशोधनातून असे दाखवले गेले की E coli आणि S cereviae ह्या बॅक्टरीयामध्ये आर्सेनिकम अल्बम मुळे अरसेनाइटचे दुष्परिणाम कमी केले जातात. ही सर्व संशोधने बॅक्टरीया वर केली गेली आहेत. ती मानवावर वा प्राण्यांवर केली गेलेली नाहीत, त्यामुळे त्यांचा उपयोग औषधाच्या उपयोगाचा पुरावा म्हणून करता येत नाही.

आणखी, गव्हाच्या रोपांवर केलेल्या एका संशोधनाचा (मारोती आणि सहकारी २०१४) उपयोग आर्सेनिकम अल्बम जेनेटिक बदल करते हे दाखवण्यासाठी केला होता. ह्यामध्ये त्यांनी गव्हाच्या बियांमधील RNA बाहेर काढून त्यांवर काय जेनेटिक परिणाम होतो ते पहिले.

जीन एक्सप्रेशन ह्या पद्धतीमुळे शरीरात प्रथिने कशी तयार होतात हे बघता येते. ह्या संशोधनाचे निकाल प्राणी किंवा माणूस ह्यांना लागू होत नाहीत. दुसरे म्हणजे जीन्स एखादे प्रथिन जास्त प्रमाणात बनवू शकतात तसेच कमी प्रमाणातही बनवू शकतात. त्यामुळे जीन्स वरील परिणाम हा सुरक्षेसाठी आहे की व्हायरसचा प्रभाव वाढवणारा आहे ते सांगता येत नाही. अश्या प्रकारे संशोधनातून हे सांगता येत नाही की आर्सेनिकम अल्बम पेशीमध्ये जेनेटिक बदल होऊन पेशींचा नाश टाळता येतो.

दुसरा दावा : ह्यानुसार औषधामुळे ठराविक प्रथिनाच्या परिणामात बदल होतो त्यामुळे रोग निर्माण करणाऱ्या जीन चा परिणाम बदलून तो नॉर्मल होतो.

ह्या दाव्याचा अर्थ असा आहे की होमिओपॅथी औषध आपल्या DNA मध्ये असे बदल करते की त्यामुळे तयार होणारे प्रथिन जीनमधील बिघाड दुरुस्त करते. म्हणजे रोग होण्याचे कारण मुळापासून नष्ट करते.

ह्याचा अर्थ असा होतो की सगळेच रोग जीन्स मधील बदलांमुळे आणि प्रथिन संश्लेषणामुळे होतात, तसेच सगळे रोग इम्युनिटी बदलणाऱ्या जीन्समध्ये बदल करून बरे करता येतात. हा फारच फसवा युक्तिवाद आहे, कारण अनेक रोगांचा जीन मधील बदलांशी काही संबंध नसतो. परिसर आणि शरीरशास्त्राचे घटक रोगाच्या उपचारांमध्ये खूप मोठी भूमिका निभावतात हा होमिओपॅथीचाच मोठ्या प्रमाणात स्वीकारलेला दावा आहे.

3 होमिओपॅथीमध्ये खूप विषारी द्रव्ये खूप कमी प्रमाणात औषध म्हणून वापरतात हा दावा.

शेवटच्या दाव्यामध्ये (बेटी आणि सहकारी १९९७, बोड आणि डाँग २००२, खुदाबक्ष आणि सहकारी २०११ यांचा २०१५ च्या लेखात रेफेरन्स दिला आहे. यापैकी बोड यांच्या स्टडी नुसार अर्सेनिक मुळे कॅन्सर होतो तर ते कॅन्सर वरील औषध म्हणून वापरता येते. बेटी यांची स्टडी ही गव्हाच्या बियांवर केली गेली. २०११ मधील खुदा बक्ष यांची स्टडी फक्त माणसांवर केली गेली पण ती आर्सेनिकम अल्बम चा आर्सेनिक विषबाधेवरील परिणाम बघण्यासाठी केली होती.

अश्या प्रकारे आयुष्च्या परिशिष्टात दिलेले एकही संशोधन आर्सेनिक किंवा दुसऱ्या कोणत्याही औषधाचा कोविडवरील परिणाम सिद्ध करत नाही. तसेच अनेक वर्षांच्या औषधशास्त्रातील संशोधनाने हे सिद्ध झाले आहे की औषध परिणामकारक असण्यासाठी त्याचा ठराविक डोस औषधात असलाच पाहिजे.

निष्कर्ष

बेलावीत आणि सहकारी (२०१५) यांच्या पेपर मधील एकही स्टडी हे सिद्ध करत नाही की आर्सेनिकम अल्बममुळे प्राण्यांमध्ये किंवा मानवांमध्ये इन्फेकशनच्या विरुद्ध इम्युनिटी निर्माण होईल.

वास्तवात पेशींचे संरक्षण, जीन्स मधील बदल, आणि कमी डोसमुळे औषध जास्त परिणामकारक होणे ह्याचा अभ्यास साथीच्या रोगासाठी व्यवस्थितपणे केला गेलेला नाही. म्हणूनच इम्युन बुस्टर म्हणून होमिओपॅथीचा वापर हे ह्या पॅनडेमीक मध्ये मोठ्या प्रमाणात त्याची विक्री करण्यासाठी आयुष मंत्रालयाने बनवलेले दिशाभूल करणारे विज्ञान आहे.

alt news वर होमिओपॅथीक औषधांविषयी संशोधनाचे पुनरावलोकन करणारे तपासणी अहवाल आहेत. शिवाय, हेही दिसून आले आहे की आर्सेनिकम अल्बमच्या क्लिनिकल ट्रायल्स मानवावर कधीही करण्यात आलेल्या नाहीत.

CCRH च्या सल्लागार मंडळाने हेही सांगितले आहे की हेच औषध आधीही इंफ्ल्युएन्झासारखा रोग रोखण्यासाठी सुद्धा दिले गेले होते. म्हणजेच हे औषध ना तर सध्याच्या किंवा आधीच्या कोरोना व्हायरसच्या साथीसाठी खास तपासले गेले आहे आणि ना ते त्याविरुद्ध परिणामकारक आहे.

सरकार आणि वृत्तवाहिन्यांच्या होमिओपॅथी च्या प्रसाराबरोबरच अनेक कॉर्पोरेट कंपन्याही त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांची आणि समाजाची हर्ड इम्युनिटी तयार करण्यासाठी हे औषध मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत. राहुल बजाज यांनी सुचवले आहे की कॉरोनाशी लढण्यासाठी होमिओपॅथी आणि हर्ड इम्युनिटी हेच उपाय आहेत.

जरी लाईफ स्टाईल बदलणे, व्हिटॅमिन D, शांत झोप यांनी इम्युनिटी वाढवणे शक्य असले तरी आत्तापर्यंत कोणत्याही औषधाने कोविड१९ विरुद्ध इम्युनिटी तयार होते हे सिद्ध झालेले नाही. स्वच्छता, अंतर राखणे आणि मास्क, हात धुणे हेच खात्रीचे उपाय आहेत.

अशी टेस्ट न केलेली औषधे मोठ्या प्रमाणावर औषधे घेणे ह्यामुळे संरक्षण मिळाल्याचा आभास निर्माण होऊन जास्त रोगप्रसार होतो. ह्यामुळेच फिजिकल डिस्टनसिंग लागू करूनही देशाला रोगाचा प्रसार रोखण्यात यश आलेले नाही.

 

डॉ. मंजिरी मणेरीकर

यांच्याकडून अनुवादित


अल्ट न्यूजचा मूळ लेख वाचण्यासाठी क्लिक करा :
https://www.altnews.in/homeopathic-drugs-such-as-arsenicum-album-30-promoted-by-ayush-do-not-boost-immunity-against-covid/?utm_source=website&utm_medium=social-media&utm_campaign=newpost

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!