विकास केदारेला आत्महत्येला पोलिसांनी प्रवृत्त केले का ? चौकशी सुरू !!

विकास केदारेला आत्महत्येला पोलिसांनी प्रवृत्त केले का ? चौकशी सुरू !!

विकास केदारेला आत्महत्येला पोलिसांनी प्रवृत्त केले का ? चौकशी सुरू !!

तपास अधिकाऱ्याने पैश्यासाठी छळल्याचा निकटवर्तीयांचा जबाब


मूळचा उल्हासनगरचा व लग्नानंतर आसनगावात स्थायिक झालेला युवक विकास केदारे याने आपल्या अकरा वर्षाच्या मुलीसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. शहापूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आर एस क्षीरसागर हे विकास कडे सतत पैशाची मागणी करत होते आणि तेच विकासाच्या आत्महत्येला कारणीभूत आहेत, असा आरोप विकासच्या आई पुष्पलता केदारे यांनी शहापूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या समोर केलाय. शिवाय तसा रीतसर जबाबही पुष्पलता यांनी पोलिसांना दिला आहे. यामुळे क्षीरसागर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

विकास केदारेच्या मृत्यूला जबाबदार धरून क्षीरसागर यांच्याविरोधात 'आत्महत्येला प्रवृत्त' केल्यावरून सामाजिक कार्यकर्त्यांचं एक शिष्टमंडळ पोलिस उप अधीक्षक नवनाथ ढवळे यांना भेटलं. कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक राज असरोंडकर, अशोका फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी रगडे, प्रहार जनशक्ती चे ठाणे जिल्हा अध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील, पत्रकार रामेश्वर गवई, दुर्गेश पांडे, राजाराम जावळे, बाळू खरात, दशरथ चौधरी, केतन गज्जर, गणेश भालेराव, करणं रणवीर, रुपेश ढोके शिष्टमंडळात होते. क्षीरसागर यांनी विकासकडे पैशांची मागणी केल्याच्या प्रत्यक्ष साक्षीदार विकासच्या आई पुष्पलता आणि बहिण शिल्पा शिरसाट आणि त्यांचे पती संजय शिरसाठसुद्धा सोबत होते.

विकास केदारे या युवकाने आपल्या आर्या नावाच्या मुलीसह आत्महत्या केल्याची घटना शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. विकास केदारे याच्या आत्महत्यापूर्व चिठ्ठीत पोलिस अधिकारी आर एस क्षीरसागर याने पैश्यासाठी छळल्याचा उल्लेख आहे.

विकासची पत्नी मोनाली हिच्या आत्महत्येत विकासला व त्याच्या आईला मोनालीच्या माहेरच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून आरोपी बनवण्यात आले होते. मोनालीची कुठलीही मृत्यूपूर्व जबानी वा तक्रार नसतानाही तो गुन्हा मोनालीच्या कुटुंबियांनी पोलिसांवर दबाव आणून दाखल करायला लावा होता. त्यामुळे चूक नसतानाही विकास व त्याच्या आईला काही महिने तुरुंगात काढावे लागले होते, याची खंत विकासच्या मनात होती.

विकासने आपली बाजू सर्वतोपरी तपास अधिकारी आर एस क्षीरसागर यांच्याकडे मांडण्याचा प्रयत्नही केला, परंतु पैश्याच्या लालसेपायी विकासला गुन्हयात अडकवण्यात आले असे त्याच्या आत्महत्यापूर्व चिठ्ठीतील मजकुरातून ध्वनीत होत आहे.

पोलिस आर एस क्षीरसागरसारखे नीच पैश्याला हपापलेले लोकं भेटले. त्यांना द्यायला लाखों रुपये नव्हते म्हणून माझ्या आयुष्याची वाट लावली. खूप मरणयातना भोगल्या. त्यांच्यासारखे पोलिस व इतर सरकारी लोकं जे निरापराध लोकांना पैश्यासाठी अडकवतात, त्यांना माझा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही. विकासच्या चिठ्ठीतील हा मजकूर क्षीरसागर यांच्याविरोधातील पुरेसा पुरावा आहे, अशी भूमिका शिष्टमंडळाने पोलिस उप अधिक्षकांसमोर मांडली.

स्वतःला आणि सोबत आपल्या लाडक्या लेकीला संपवतानाच्या वेळच्या मानसिकतेतही आत्महत्या करणं चुकीचे आहे याची जाणीव आहे असं लिहिणारा विकास पूर्ण भानावर होता. त्याने चिठ्ठीत मांडलेले सर्व मुद्दे, त्याचे संयमी व परिपक्व व्यक्तिमत्व अधोरेखित करतात. या पार्श्वभूमीवर, पोलिस अधिकारी क्षीरसागर यांच्याविरोधात तळतळाट व्यक्त होतो, यावरुन क्षीरसागर यांनी त्याच्याबाबत किती खोडसाळ आणि अन्यायी भूमिका निभावली असेल आणि त्यामुळेच कशी विकासभोवती त्याला आत्महत्येला प्रवृत्त करणारी परिस्थिती निर्माण झाली असेल, याचा अंदाज करता येऊ शकतो, असं शिष्टमंडळाचं म्हणणं होतं.

क्षीरसागर विकासकडे पैश्यांची मागणी करीत होता, याची साक्षीदार त्याची आईसुद्धा आहे आणि त्याचे जवळचे काही मित्रसुद्धा आहेत, ज्यांच्याकडे विकासने आपले मन मोकळे केले होते. जर भ्रष्टाचार आणि पक्षपातीपणा नाही झाला तर प्रथमदर्शनीच सदर प्रकरण क्षीरसागर यांच्याविरोधात गुन्हा करण्याइतपत पूरक आहे. अधिक तपास झाल्यास सत्य तथ्य सबळ पुराव्यांसहित समोर येऊ शकते. त्यामुळेच क्षीरसागर यांना पोलिस सेवेतून निलंबित / बडतर्फ करून त्यांच्याविरोधात तातडीने फौजदारी गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. किंबहुना ते आपले कर्तव्य आहे, असे शिष्टमंडळाने पोलिसांना सांगितले.

विकासची आई पुष्पलता यांची क्षीरसागर यांच्या विरोधात मुलाच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याची तक्रार आहे. क्षीरसागरविरोधात फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, या विकासच्या आईच्या मागणीला आमचे समर्थन आहे. तक्रारीला प्रथमदर्शनी पुराव्याचा आधार आहे त्यामुळे ती दाखल करून घेणे आपले पोलिसी कर्तव्यच आहे, असा शिष्टमंडळाचा आग्रह होता.

डीजीपी/२३/५४/एफआयआर / २८३/२०१२ या माननीय संजीव दयाळ यांनी मा. पाच्या निर्देशांना अनुसरून राज्याचे पोलिस महासंचालक असताना जारी सर्वोच्च न्यायाल केलेल्या परिपत्रकानुसार आलेली तक्रार नोंदवणे बंधनकारक आहे. जे आपले कर्तव्य आहे, तेच निभावण्याची मागणी आम्ही आपणांकडे अत्यंत विनम्म्रपणे करीत आहोत, असं म्हणत हा विनम्रपणा व संविधानिक मार्गाचा अवलंब आमची कमजोरी ठरु नये अशी अपेक्षा शिष्टमंडळाने व्यक्त केली.

आपल्याकडून आपले कर्तव्य निभावण्यात कोणत्याही प्रकारची हयगय झाली, आरोपी पोलिस अधिकान्यास 'आपलेच कार्टे' म्हणून पाठीशी घालण्याचा भ्रष्टाचार झाला तर मात्र नाईलाजाने संविधानिक आंदोलनात्मक मार्गाचा अवलंब करावा लागेल व त्यानंतर सदरबाबत राज्यभर जे पडसाद / असंतोष उमटतील, त्याला सर्वस्वी आपण जबाबदार असाल, असा स्पष्ट इशारा शिष्टमंडळाने लेखी निवेदनात दिला आहे.

चिठ्ठीत जर थेट क्षीरसागर यांना जबाबदार धरलेलं असतं तर त्यांच्याविरोधात लगेच गुन्हा दाखल झालाही असता, पण विकास केदारेच्या चिठ्ठीत त्याने एकूणच समाजाविरोधात संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे सदर प्रकरणाचा सखोल तपास आम्ही सुरू केलाय. असं पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी शिष्टमंडळाला सांगितलं.

शनिवारी विकास केदारे आत्महत्या प्रकरणासाठी सकाळी ११ वाजल्यापासून ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, शहापूर पोलिस ठाण्याचे उपासे आणि पडघा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कटके शिष्टमंडळासोबत शहापूर पोलिस ठाण्यात थांबून होते. घटनेच्या प्रत्येक अंगाने त्यावेळी चर्चा झाली.

दरम्यान विकासच्या आई पुष्पलता, बहिण शिल्पा, तिचे पती संजय शिरसाट तसंच विकासचे मित्र शिवाजी रगडे यांचे जबाबही पोलिसांनी नोंदवून घेतले. सहाय्यक पोलीस निरीक्षक आर एस क्षीरसागर याने विकासकडे कशी सातत्याने पैशाची मागणी केली, ते या चौघांनीही आपापल्या जबाबात सांगितलं.

विकासची पत्नी मोनालीच्या आत्महत्येच्या घटनेच्या तपासात क्षीरसागर यांनी सत्य सोडून भलतीच मांडणी केल्याचा आरोप केल्यावर त्याचीही चौकशी करण्याचं आश्वासन पोलिस उप अधिक्षकांनी दिलं. तपासात घटनेची कुठलीच बाजू आम्ही सोडणार नाही. क्षीरसागर यांना सद्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. त्यांनाही जबाबासाठी बोलावण्यात येईल. तपासात जे सत्य तथ्य समोर येईल, त्यावरुन अंतिम निष्कर्ष काढू, त्यात पक्षपातीपणा होणार नाही, अशी ग्वाही ढवळे यांनी दिली.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!