अदर पुनावाला यांना शिवसेनेने धमकी दिली ?

अदर पुनावाला यांना शिवसेनेने धमकी दिली ?

अदर पुनावाला यांना शिवसेनेने धमकी दिली ?

सिरम इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा आदर पूनावाला यांना धमकी नेमकी कोणी दिली यावरून देशात वेगवेगळे अंदाज बांधले जात असतानाच, इंडिया टुडे चे पत्रकार राहुल कंवल यांनी सदरबाबत शिवसेनेकडे इशारा केला आहे. यावरून शिवसेनेने संताप व्यक्त केला असून राहुल कंवल यांच्या विरोधात कारवाईची मागणी इंडिया टुडे समूहाकडे केली आहे.

खोटे वृत्त दिल्याबद्दल यापूर्वी आपण जशी एका पत्रकाराविरोधात कारवाई केलीत, तशीच कृती राहुल कंवल यांच्याबाबतीत अपेक्षित आहे, असं शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी इंडिया टुडे ला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

देशात पाच राज्यातल्या निवडणुकीच्या निकालाचं वातावरण असून त्यात भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश मिळालेले नाही. भाजपाच्या पराभवाची चर्चा देश पातळीवर सुरू असतानाच या चर्चेला बगल देण्याचा खोडसाळ प्रयत्न राहुल कंवल यांच्या वृत्तांकनातून झाला असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

अदर पुनावाला यांनी ब्रिटनमध्ये जाऊन तिथल्या माध्यमांशी बोलताना, आपल्याला धमकी मिळत असल्याचा गौप्यस्फोट केला होता. राज्यांचे मुख्यमंत्री, बाहुबली आणि उद्योगसमुहांकडून आपणांवर दबाव असून धमक्याही मिळत आहेत. नावं घेतली तर माझं शीर उडवलं जाईल, अशा आशयाचं खळबळजनक वक्तव्य पुनावाला यांनी केलं होतं.

अदर पुनावाला यांनी ब्रिटनमधील भागीदारांशी चर्चा सुरू केल्याचं वृत्त आल्याने ते लस उत्पादनाचा व्यवसाय ब्रिटनमध्ये स्थानांतरित करताहेत की काय, अशी शंका व्यक्त केली जात होती.

मात्र, पुण्यात लस उत्पादनाचं काम वेगाने सुरू असून लवकरच परतल्यावर मी आढावा घेईन, असं ट्वीट पुनावाला यांनी केल्यानंतर दिलासा व्यक्त केला गेला होता.

त्यांना मिळालेल्या धमकी प्रकरणाने आज वेगळी कलाटणी घेतलीय. इंडिया टुडेचे राहुल कंवल यांनी निवडणूक विश्लेषणादरम्यान सदर प्रकरणाबाबत शिवसेनेकडे इशारा केला. तसाही भाजपा ट्रोलर्स तो आधीपासूनच करत होते. त्यामुळे सदरचं धमकी प्रकरण खरोखरचं आहे की पूर्वनियोजित डर्टी गेम्सचाच भाग आहे, अशी नवी चर्चा सुरू झालीय.

या पार्श्वभूमीवर आता पुनावालांच्या पुढच्या पावलांवर देशाचं लक्ष लागून आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!