महिलाविषयक प्रकरणांचा गृहमंत्री नियमित आढावा घेणार ; मनसे शिष्टमंडळाला आश्वासन !

महिलाविषयक प्रकरणांचा गृहमंत्री नियमित आढावा घेणार ; मनसे शिष्टमंडळाला आश्वासन !

महिलाविषयक प्रकरणांचा गृहमंत्री नियमित आढावा घेणार ; मनसे शिष्टमंडळाला आश्वासन !

साकीनाका येथील 34 वर्षीय महिलेवर झालेल्या अमानुष बलात्काराच्या घटनेनंतर आणि राज्यात वाढत असलेल्या महिला अत्याचारांच्या घटनेतील वाढ पाहता आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचं निवेदन त्यांना सादर केलं.

यात प्रामुख्याने बलात्काराच्या घटनांची प्रकरणं फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणं, महिलांवरील अत्याचाराचे एफआयआर घटनेनंतर 24 तासात नोंदवून घेणं, राज्य महिला आयोगाला तात्काळ पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा, बलात्कार करणाऱ्या आरोपीला तत्काळ फाशी देण्याची तरतूद शक्ती कायद्यात करावी त्यासाठी शक्ती कायद्याची राज्यात लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, पोस्को कायद्यातील पळवाटा दूर कराव्यात, महिलांविषयक प्रकरणांचा स्वतः गृहमंत्र्यांनी दर महिन्यातून एकदा आढावा घ्यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली.

यावेळी माननीय गृहमंत्र्यांनी या सर्व विषयावर मनसेच्या शिष्टमंडळाला समाधानकारक उत्तरं दिली तसंच काही मुद्द्यावर आपलं म्हणणे विस्तृतरित्या सादर करण्यास सांगितलं, अशी माहिती स्वतः शालिनी ठाकरे यांनी दिली आहे.

यावेळी मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्यासह जनहित व विधी कक्षाचे सरचिटणीस ऍड.संतोष सावंत , गोरेगाव महिला विभाग अध्यक्षा धनश्री नाईक उपस्थित होते.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!