मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
गरिबांनी जगायचं कस? असा सवाल केलाय महाराष्ट्र भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी !
14 एप्रिलपासून संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाऊन लागू केला, त्यावेळी जे पॅकेज जाहीर केले, त्याचे काय झाले सांगा. आता आणखी पंधरा दिवस लॉकडाऊन वाढवला आहे, सामान्यांनी कसे जगायचे सांगा…असं उपाध्ये यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून विचारलं आहे.
१५ लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी 1500 रुपये तर 12 लाख रिक्षाचालकांना प्रत्येकी 1500 रु देण्याचे जाहीर केले होते. कितीजणांना प्रत्यक्ष मदत दिली सांगा ? असं उपाध्ये यांनी विचारलंय.
अपयश झाकायला कांगावा व अकांडतांडव पण जनतेला मदत करायचे म्हणल्यावर हे सरकार कोडगे बनते. दुर्बल घटकांना मदत करायची सरकारची इच्छाच नाही.. संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाऊन लागू केलेल्या निर्णयाला आज 15 दिवस उलटले तरी आधीच तुटपुंजी जाहीर केलेली मदत ही या वसुली सरकारला लाभार्थ्यांना देता आलेली नाहिये. अशी टीका केशव उपाध्ये यांनी केलीय.