हायड्रोक्सीक्लोरोक्वीन‌ औषधे कोविडवर निरुपयोगी, उलट धोकादायक !

हायड्रोक्सीक्लोरोक्वीन‌ औषधे कोविडवर निरुपयोगी, उलट धोकादायक !

हायड्रोक्सीक्लोरोक्वीन‌ औषधे कोविडवर निरुपयोगी, उलट धोकादायक !

अँटी मलेरियल औषधे क्लोरोक्वीन आणि हायड्रोक्सीक्लोरोक्वीन यांची अझीथ्रोमायसीन ह्या औषधाबरोबर covid19 च्या उपचारासाठी शिफारस होत आहे आणि ती त्यासाठी वापरली सुद्धा जात आहेत. परंतु कोविडवर त्यांच्या परिणामकारकतेचा पुरावा अजूनही मिळालेला नाही. ह्यासाठी covid19 वर क्लोरोक्वीन आणि हायड्रोक्सि क्लोरोक्वीनच्या परिणामांच्या पूर्ण क्षमतेच्या randomised controlled trials च्या निकालांची जग वाट पाहत आहे. मात्र ह्या औषधांचा हृदयावर दुष्परिणाम होऊ शकतो. लॅन्सेट ह्या मॅगझीनचे मनदीप मेहरा आणि सहकाऱ्यांनी क्लोरोक्वीन आणि हायड्रोक्सि क्लोरोक्वीनच्या 96032 हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या आणि SAARS cov 2 मुळे ARDS (Acute Respiratory Distress Syndrome) झालेल्या पेशन्टवरील स्टडीचा रिपोर्ट दिला आहे.

ECG वरून असे दिसून येते की ह्यामुळे हृदयाच्या ठोक्यांचा ताल चुकतो आणि त्यामुळे एक प्रकारचा आजार होऊ शकतो. ह्याला torsades de pointes असे नाव आहे. हा बरेचदा आपोआप बरा होतो. मात्र कधी कधी गंभीर होऊन हृदयाची गती वाढते आणि स्नायू कमकुवत होऊन मृत्यूही येऊ शकतो. औषधामुळे हा आजार होण्याची शक्यता जास्त धोका असलेल्या रुग्णांत दिसून येते. उदा. औषधांची रक्तातील पातळी जास्त असणे, कोरोनरी हृदयरोग, रक्तातील पोटॅशियम कमी असणे, हृदयाची गती कमी असणे, काही जन्मजात हृदयविकार इत्यादी.

स्टडी केलेल्या ह्या पेशंट्सचे सरासरी वय 53.8 वर्षे होते. त्यापैकी 46.3% स्त्रिया होत्या. सहा देशांमधील 671 रुग्णालयातील डेटा ह्यासाठी वापरला गेला. ह्यापैकी 1868 जणांना क्लोरोक्वीन, 3016 जणांना हायड्रोक्सि क्लोरोक्वीन दिले गेले तर 3783 जणांना क्लोरोक्वीन बरोबर अझीथ्रोमायसीन दिले गेले आणि 6221 जणांना हायड्रोक्सिक्लोरोक्वीन बरोबर अझीथ्रोमायसीन दिले गेले.

ही औषधे त्यांना covid19 चे निदान झाल्यापासून 48 तासांत दिली गेली होती. कंट्रोल म्हणून ज्यांना ही औषधे दिली गेली नाहीत, अशा 81144 पेशंट्स ना घेतले होते. दोन परिणामांचा अभ्यास केला गेला.

1 हॉस्पिटलमध्ये असतानाच मृत्यू
2 हृदयाच्या ठोक्यांचा ताल चुकणे
2 स्नायू कमजोर होणे

वय, लिंग, वंश, इतर आजार, covid 19 चा गंभीरपणा हे सगळे मुद्दे विचारात घेऊनही ह्या चारही औषध देण्याच्या पद्धतीमध्ये ही औषधे न दिलेल्या पेशंट्सपेक्षा हॉस्पिटलमध्ये असतानाच मृत्यू होण्याचे प्रमाण खूप जास्त आढळले. हा धोका पुरुष व स्त्रिया दोन्हींमध्ये सारखाच होता. हृदयाच्या गती आणि तालावरील परिणाम ही औषधे दिलेल्यांमध्ये 4.3% ते 8.1% आढळला तर कंट्रोल मध्ये फक्त 0.3% आढळला.

ह्या निरीक्षणात्मक स्टडीच्या मर्यादा मान्य केल्या तरीही मेहरा आणि सहकाऱ्यांनी खूप मोठया संख्येने covid19 च्या रुग्णांवर क्लोरोक्वीन आणि हायड्रोक्सिक्लोरोक्वीन यांच्या परिणामांचा अभ्यास केला आहे हे मान्य करावे लागते.

ह्याचे रिझल्ट हे सिद्ध करतात की ह्या औषधांचा ह्या पेशंट्सवर काहीही चांगला परिणाम न होता उलट ती धोकादायकच ठरली आहेत. ह्या औषधांमुळे मृत्यूचा धोका वाढण्याचे कारण हृदयाच्या तालावर आणि स्नायूंवरील परिणामांमुळे आहे असे वाटणे शक्य आहे कारण ह्या औषधांमुळे तसे परिणाम दिसतात.

परंतु,
1 ह्या ग्रुप मधील मृत्यूची संख्या ही हृदयविकारांच्या संख्येपेक्षा खूपच जास्त होती.
2 मृत्यूचा धोका क्लोरोक्वीन बरोबर अझीथ्रोमायसीन दिलेल्या आणि न दिलेल्या दोन्ही रुग्णांमध्ये सारखाच होता. हा धोका जर ह्या औषधांमुळे असता तर दोन्ही औषधे दिलेल्यांमध्ये तो जास्त असायला हवा होता.
3 मृत्यूचा दर स्त्री पुरुष दोन्हींमध्ये सारखाच होता. मात्र औषधांमुळे हृदयविकार होण्याचा दर स्त्रियांमध्ये जास्त असतो.

ह्या मुद्द्यांचा निष्कर्ष असा की ह्या स्टडी मधून असे दिसत नाही की ह्या औषधांमुळे वाढणारा मृत्यूचा धोका हृदयविकारामुळे आहे. ह्या औषधांच्या अँटीव्हायरल आणि रोगप्रतिकारक शक्तीवरील परिणामांमुळे covid19 जास्त गंभीर होतो असे एक हायपोथीसिस आहे.

दुसऱ्या हायपोथीसिस नुसार covid 19 च्या व्हायरसचा रक्तातील ऑक्सिजन कमी करण्याचा आणि हृदयाचे स्नायू कमजोर करण्याचा धोका ह्या औषधांमुळे वाढतो.

ही हायपोथीसिस अजून सिद्ध केली गेली नाहीयेत.
मेहरा आणि सहकाऱ्यांच्या स्टडी चे निष्कर्ष हे सिद्ध करतात की क्लोरोक्वीन किंवा हायड्रोक्सि क्लोरोक्वीन आणि अझीथ्रोमायसीन ह्या औषधांचा covid19 च्या हॉस्पिटल ऍडमिटेड रुग्णांवर काहीही चांगला परिणाम होत नसून मात्र, ती धोकादायक आहेत.

News by Dr. Manjiri Manerikar

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!