आयसीएमआर म्हणते, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन उपाशीपोटी नको !

आयसीएमआर म्हणते, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन उपाशीपोटी नको !

आयसीएमआर म्हणते, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन उपाशीपोटी नको !

कोरोना संसर्गाच्या उपचारात हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) औषधाच्या वापरासंबंधी निर्माण झालेल्या वादावर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. उपाशी पोटी हे औषध घेतल्यास त्याचा दुष्प्रभाव दिसून येऊ शकतो, असे मत आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून व्यक्त केले.

दोन दिवसांपूर्वीच हे औषध कोरोनावर प्रभावी असल्याचे सांगत आयसीएमआरने त्याच्या वापरासंबंधी नवीन दिशानिर्देश ​दिले आहेत. इतर देशातील वैज्ञानिकांनी मात्र हे औषध कोरोनावर प्रभावी नसल्याचा दावा अभ्यासाअंती केला आहे. जगभरात या औषध वापरासंबंधी त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

जगप्रसिद्ध मेडिकल जर्नल ‘द लासेंट’ मध्ये प्रकाशित अभ्यासात एचसीक्यूवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

देशात या औषधाच्या प्रभावासंबंधी अजूनही अभ्यास केला जात आहे. जोपर्यंत कोरोना संसर्गावर कुठलीही लस उपलब्ध होत नाही, तोपर्यंत एचसीक्यूचा आपात्कालीन स्थित उपयोग करता येवू शकतो, असे भार्गव यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

उपाशी पोटी हे औषध घेतल्यास पोटासंबंधी त्रास होवू शकतो, त्यामुळे जेवण अथवा काही खाऊनच औषध घेण्याचा सल्ला त्यांच्याकडून देण्यात आला आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच या औषधाचा वापर केला जात आहे. कोरोना योद्धासह पोलिस कर्मचारी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना हे औषध देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!