राज्याची आरोग्य यंत्रणा सुधारा ; सामाजिक संस्थांची मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड मागणी !

राज्याची आरोग्य यंत्रणा सुधारा ; सामाजिक संस्थांची मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड मागणी !

राज्याची आरोग्य यंत्रणा सुधारा ; सामाजिक संस्थांची मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड मागणी !

९ जानेवारी २०२१ ला भांडारा सामान्य रुग्णालयात झालेल्या खेदजनक घटनेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना, कम्युनिटी बेस ऑर्गनायझेशन यांनी मिळून १ फेब्रुवारीला आरोग्य मंत्र्यांना निवेदन देणं आणि २ फेब्रुवारीला पोस्ट कार्ड मोहीम राबवली .

या मोहिमेतून शासनाकडे खालील मागण्या करण्यात आल्या :

• राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयातील फायर ऑडीट २ महिन्याच्या आता करण्यात यावं.
• राज्यातील आरोग्य यंत्रणेतील रिक्तपदं भरण्यात यावीत.
• भंडारा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाल्या बालकांच्या पालकांचं मानसिक समुपदेशन करण्याची उपाययोजना करावी.
• राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयाचं बांधकाम ऑडीट, स्वच्छता ऑडीट, औषधं पुरवठा ऑडीट अशा पद्धतीने सामाजिक ऑडीट देखील करण्यात यावं.

९ जानेवारी २०२१ रोजी भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा जळून मृत्यू ओढवला होता. सदर घटना आणि २०१७ मध्ये नाशिकमध्ये झालेली घटना ! ह्या घटना पाहता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सरकारी आरोग्य यंत्रणांचा भोंगळ कारभार उघड झालाय. खरं तर, सर्वच रुग्णालयात अश्या घटना होणार नाहीत, याकरिता काही उपाय योजना करण्याची गरज आहे, असं कोरो इंडिया च्या मुमताज शेख यांनी मिडिया भारत न्यूज ला सांगितलं.

या मागणीसाठीच पोस्टकार्ड मोहीम राबविण्यात आली . ह्या मोहिमेत महिला , पुरुष आणि युवकांचा सहभाग लक्षणीय होता . एकूण संपूर्ण महाराष्ट्रातून १९७०७ पोस्टकार्ड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आलीत.तसंच ३३ जिल्हाधिकाऱ्यांना कोरोसोबत महाराष्ट्रातील ९३ संस्था संघटनांनी आणि १७ ग्रामपंचायतीनी निवेदनं दिली .

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!