संभाजी भिडे नावाच्या वयोवृद्धाला कुत्रा चावल्याची घटना घडल्यानंतर समाजमाध्यमात त्याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भिडेचा सतत वादग्रस्त तितकीच विद्वेषी वक्तव्ये करण्याचा पूर्वेतिहास पाहता त्याला कुत्रा चावला, ते चांगलंच झालं, असं नेटकरी उघडपणे बोलत आहेत. स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष ॲड. जय गायकवाड यांनी तर भिडेला चावलेला कुत्रा दत्तक घेऊन त्याचा सांभाळ करायची तयारी दाखवली आहे. संभाजी भिडेचा पूर्वेतिहास पाहता कुत्र्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असं सूचक विधानही ॲड. गायकवाड यांनी केलं आहे.
कुत्रे माणसांना चांगले ओळखतात. सहसा, ज्यांच्यात माणूसपण मेलेले असते अशांना पाहिल्यावर कुत्रे भुंकतात अथवा चावतात, अशी प्रतिक्रिया ॲड. जय गायकवाड यांनी दिली आहे.
मी आजपर्यंत अनेक कुत्रे पाळलेत. माणूसपण आणि करुणा माणसापेक्षा कुत्र्यांमध्ये जास्त असते, याचा अनुभव मला आला. कुत्रे एकतर वेडे झाल्यावर चावतात, नाहीतर समाजाला घातक असणाऱ्या लोकांना चावतात. संभाजी भिडे हा या नव्या पिढीसाठी घातक आहे, याबाबत दुमत नसल्याचं ॲड. गायकवाड यांनी म्हटलं आहे.

एखाद्याला कुत्रा चावला म्हणून आपण आनंदीत होण्याचं काहीच कारण नाही. संभाजी भिडे लवकरात लवकर बरे होवो, त्याला दीर्घायुष्य लाभो, अशी मी कामना करतो, पण भिडेचा दंगली घडवून आणण्याचा विद्वेषी पूर्वेतिहास पाहता कुत्र्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, अशी भीती मला वाटते. एक श्वानप्रेमी म्हणून मी कुत्र्याला सांभाळण्याची तयारी दर्शवलीय, या शब्दांत ॲड. गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.
संभाजी भिडेला चावलेल्या कुत्र्याचा शोध घेऊन, मला 9503969098 या क्रमांकावर संपर्क करा, असं आवाहन करत, तो कुत्रा एक हुशार प्राणी आहे, ज्याने अमानवी प्रवृत्तीला ओळखले आणि धडा शिकवला. त्याला दत्तक घेऊन त्याचा संपूर्ण सांभाळ करणार असल्याचं ॲड. जय गायकवाड यांनी म्हटलं आहे.