यंदा साहित्य संमेलनात सरस्वती पुजनाऐवजी कुराणातील आयतांचं पठन झालं ?

यंदा साहित्य संमेलनात सरस्वती पुजनाऐवजी कुराणातील आयतांचं पठन झालं ?

यंदा साहित्य संमेलनात सरस्वती पुजनाऐवजी कुराणातील आयतांचं पठन झालं ?

नाशिकला नुकतंच अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडलं. एरव्ही सरस्वती पुजनाने म्हणे संमेलनाची सुरुवात व्हायची. यंदा कुराणातली आयते म्हटली गेली. राज्यात महाविकास आघाडीचं हिंदुत्वविरोधी सरकार ! मग ते मुस्लिमधार्जिणं वागणार, नाही का? धक्का बसला ना !

वाचकही विचारात पडले असतील की खरंच कुराणातील आयते म्हणून साहित्य संमेलनाचा प्रारंभ झाला असेल? झालाही असेल ! काॅंग्रेस-राष्ट्रवादीवाले मुस्लिम मतांसाठी काहीही करतील आणि आता शिवसेनाही सत्ता स्वार्थासाठी त्यांच्याच वळचणीला जाऊन हिंदुत्व पार विसरून गेलीय. असे कोणाही सर्वसामान्यांच्या मनात येणारे विचार वाचकांच्याही मनात आले असतील ! हो ना?

वाॅटस्एप, फेसबुक, युट्यूबवर असलं काही समोर आलं की डोळे झाकून विश्वास ठेवायचा आपला आता स्वभावधर्मच झालाय. खरंखोट्याची शहानिशा करायला इथे वेळ आहे कोणाला ?

ट्विटरवर @humlogindia नावाचे हॅण्डल आहे. हम लोग इंडिया असं नाव असलं तरी हे हॅण्डल सातत्याने धर्मद्वेष पसरवताना दिसतं. या हॅण्डलवरून साहित्य संमेलनात सरस्वती पुजनऐवजी कुराणातील आयते म्हटल्याचा दावा केला गेलाय.

https://twitter.com/humlogindia?t=T6nOfvMsxmNUs-jIDnr8EA&s=09

ट्विटसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांचा मुस्लिम पद्धतीने करूणा भाकतानाचं छायाचित्र जोडण्यात आलंय. या हॅण्डलला फाॅलो करणाऱ्यांसाठी इतकुसा पुरावा पुरेसा आहे विद्वेषी थयथयाट करायला !

 

मुस्लिमद्वेष म्हणजेच हिंदुत्व समजणाऱ्या इथल्या बुद्धिबधिरांना संमेलनातील इतरांची अशीच छायाचित्रे सापडतात का, हे तपासण्याची गरजही भासत नाही; कारण आव्हाड-सुळेंच्या छायाचित्राने त्यांचं काम झालेलं असतं.

 

थोडे कष्ट घेऊन सर्च केलं की जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांचं छायाचित्र एका मुस्लिम पद्धतीच्या विवाह सोहळ्यातील असल्याची माहिती आपल्या समोर येते.‌ पुढे सुप्रिया सुळे यांच्या फेसबुक अकाऊंटवरचा विडिओच पाहायला मिळतो. वधूवरांसाठी अल्लाहचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रार्थना करतानाचा तो विडिओ आहे.

https://www.facebook.com/supriyasule/videos/3083285855282863/

याचाच, अर्थ जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांचं छायाचित्र साहित्य संमेलनातलं नसल्याचं अगदी ठळकपणे पुराव्यानिशी सिद्ध होतं. पण तोवर विद्वेषी मंडळींनी संबंधित नेत्यांना, राजकीय पक्षांना, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा डाव साधलेला असतो.

सदरचा अपप्रचार उघडा पडला तरी धर्मांध ट्रोलर्स त्यांचं प्रचार/प्रसाराचं काम सुरूच ठेवतात. त्यांना कळून चुकलंय की धर्मांधतेने लोकांचे मेंदू इतके बधीर झालेत की लोक असत्यावर पटकन विश्वास ठेवतात आणि त्यावरच आपलं पूर्वग्रहदूषित मतही बनवतात.

इथे प्रश्न इतकाच आहे की या अपप्रचाराविरोधात जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे संबंधितांविरोधात व त्यांच्या सूत्रधारांविरोधात फौजदारी तक्रार करणार आहेत का आणि महाविकास आघाडीचं सरकार ती तक्रार पुरेशा गांभीर्याने घेऊन वेगाने कठोर कारवाईचं पाऊल टाकणार आहे का?

 

 

 

राज असरोंडकर

संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ | संपादक, मीडिया भारत न्यूज

mediabharatnews@gmail.com

 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!