अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतरच काश्मीरात जन्माष्टमी साजरी होतेय का? पहिल्यांदाच लालचौकातून मिरवणूक गेलीय का?

अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतरच काश्मीरात जन्माष्टमी साजरी होतेय का? पहिल्यांदाच लालचौकातून मिरवणूक गेलीय का?

अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतरच काश्मीरात जन्माष्टमी साजरी होतेय का? पहिल्यांदाच लालचौकातून मिरवणूक गेलीय का?

आधी लाल चौकात सैनिकांवर दगडफेक व्हायची. आता तिथे भगवान श्रीकृष्णांवर फुलं उधळली जात आहेत. अनुच्छेद ३७० हटवल्याचा हा परिणाम आहे. असं ट्वीट केलंय भाजपाचे राष्ट्रीय सचिव आणि आंध्रप्रदेशचे सहप्रभारी सुनील देवधर यांनी ! जम्मूकाश्मीरला विशेष स्वायत्तता देणारं कलम ३७० हटवल्यानंतरच आता काश्मीरात जन्माष्टमी साजरी होऊ लागली, असं देवधर यांचं ट्वीट सूचित करतं. पण वस्तुस्थिती तशी आहे ?

२०१४ पासूनची नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारची राजवट वादग्रस्त ठरली व दिवसेंदिवस तिची लोकप्रियता घसरत चाललीय. एका बाजूला लोकांना धर्मांधतेत गुंगवून ठेवायचं आणि त्याआड काही विशिष्ट उद्योगपतींना पूरक निर्णय घ्यायचे, अपारदर्शक कारभार करायचा, स्त्रोत लपवून पक्षनिधी लाटायचा, शासकीय यंत्रणांचा राजकारणासाठी गैरवापर करायचा, अशा कित्येक देशविरोधी गोष्टी आता देशासमोर पुरेपूर आलेल्या आहेत.

पक्ष समर्थकांना हिंदूराष्ट्राचं स्वप्न दाखवत सत्तेत आलेल्या भाजपाकडे हिंदूहिताचा कोणताही कार्यक्रम नसल्याने, मुसलमानांचं भय निर्माण करून, त्यांच्यापासून हिंदूंचा जीव वाचवणं, हेच उपकार समजा, असं वातावरण मोदी आणि कंपनीने तयार केलंय. त्यासाठीची मोठी भूमिका वृत्तवाहिन्यांनी निभावलीय. सोबत समाजमाध्यमांचा बेफाम बेलगाम वापर भाजपा करते.

बुद्धीचा जराही वापर न करता डोळे झाकून कशावरही विश्वास ठेवायला सांगणारी धर्मपरंपरा असल्याने भाजपाचं कामही सोपं झालं. त्यामुळे धादांत खोटी माहिती पसरवण्यात हा पक्ष जराही कसर सोडत नाही. सुनील देवधर यांचं ट्वीटही समर्थकांची दिशाभूल करत राहण्याच्या प्रयत्नांचाच भाग आहे.

जम्मूकाश्मीरबद्दल भाजपाला खूप काही प्रेम आहे किंवा काश्मीरी पंडितांबद्दल कणव आहे, अशातला भाग नाही. पण जम्मूकाश्मीर भाजपासाठी राजकीय भांडवल आहे. तिथून अवघ्या समर्थकांचं मानस मुसलमानांविरोधात घडवता येतं, इतकंच त्या राज्याचं भाजपासाठी महत्त्व आहे.

सुनील देवधर म्हणतात, काश्मीरातील लालचौकात जन्माष्टमी साजरी होऊ शकली, का तर अनुच्छेद ३७० हटवल्यामुळे ! अनुच्छेद ३७० कधी हटवलं गेलं, ५ ऑगस्ट २०१९ रोजी ; पण ४ सप्टेंबर २०१८ ची एक बातमी इंटरनेटवर सापडते, जी देवधरांना खोटं पाडते.

ग्रेटर काश्मीर या वेबसाईटवरच्या त्या बातमीत गणपत्यार मंदिरापासून सुरू होऊन जन्माष्टमीची मिरवणूक जहांगीर चौकामार्गे लालचौकात समारोप झाल्याचं म्हटलंय.

ग्रेटर काश्मीरमधील जन्माष्टमीची बातमी इथे वाचा

पत्रकार युसुफ जमील यांचं २०१८ चं एक ट्वीटही देवधरांना तोंडावर पाडतं.

५ सप्टेबर, २०१५ ची बिजिनेस स्टॅन्डर्डची बातमी आणखी सविस्तर माहिती देते. १९९० नंतर जम्मूकाश्मीरातील परिस्थिती बिघडल्यानंतर तब्बल पंधरा वर्षांनी, म्हणजे २००४ मध्ये काश्मीरी पंडितांनी जन्माष्टमी साजरी करायला नव्याने सुरुवात केली, असं बातमीत म्हटलंय. इतकंच नव्हें तर स्थानिक मुस्लिमही मिरवणुकांत सहभागी होऊन सामाजिक सलोख्याचा संदेश देत, असाही उल्लेख आहे.

बिझनेस स्टॅन्डर्डमधील बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

असंच वृत्तांकन इकाॅनाॅमिक टाईम्सच्या अंकातही आलंय.
इकाॅनाॅमिक टाईम्समधली बातमी इथे वाचा

मुफ्ती मेहबूबा यांनी जन्माष्टमीच्या सदिच्छा देण्यावरून संघीभाजपाई हिंदुत्ववादी त्यांना ट्रोल करताहेत की अनुच्छेद ३७० रद्द झाल्यावर कसे सरळ झालेत ! पण उमर अब्दुल्ला यांचं २०१५ चं ट्वीट बोलकं आहे.

मुख्यमंत्री या नात्याने ओमर अब्दुल्ला यांनी जम्मूकाश्मीरातील जनतेला जन्माष्टमीच्या सदिच्छा दिल्याचं २ सप्टेंबर २०१० चं आजतक वाहिनीचं वृत्त आहे.

आजतक ची बातमी इथे वाचा

१९८९ नंतर पहिल्यांदाच लालचौकातून जन्माष्टमीची मिरवणूक गेली, असा उल्लेख ४ सप्टेंबर २००७ च्या हिंदुस्थान टाईम्सच्या बातमीत आहे. विशेष म्हणजे अलगाववादी नेता व डेमोक्रॅटिक फ्रीडम पार्टीचा प्रमुख शब्बीर अहमद शाहचासुद्धा मिरवणुकीत सहभाग होता, अशी माहिती या बातमीत वाचायला मिळते.

हिंदुस्थान टाईम्सची बातमी इथे वाचा

जम्मूकाश्मीरात जन्माष्टमी साजरी होणं, तीत स्थानिक मुस्लिमांचा सहभाग असणं, मुस्लिम राजकीय नेत्यांनी जन्माष्टमीच्या सदिच्छा देणं, लाल चौकातून मिरवणूक जाणं यातलं काहीच ना नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा घडतंय, ना अनुच्छेद ३७० रद्द केलं गेल्यानंतर ! पण खोटं बोलल्याशिवाय भाजपाईंना चैन पडत नाही.

२०१४ पासून सत्ताधारी भाजपाने धडाधड एकेक सार्वजनिक उपक्रम विकायला काढले. पण ७० वर्षात या देशात काहीच घडलं नाही, ही लबाड बोंब मात्र सुरूच आहे. भारतात सगळं काही मोदी सत्तेत आल्यानंतरच घडू लागलंय, हे सिद्ध करण्याच्या केविलवाण्या धडपडीत भाजपाई प्रचंड खोटं बोलतात आणि तसं करताना त्यांना जराही लाज, संकोच, खेद वाटत नाही. आपले समर्थक सत्य शोधण्याच्या भानगडीत पडत नाहीत, याची या पक्षाच्या नेत्यांना पुरेपूर खात्री आहे.

 

 

 

राज असरोंडकर

संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ | संपादक, मिडिया भारत न्यूज
mediabharatnews@gmail.com

MediaBharatNews

Related Posts
comments
  • Evdya dur pahanyapexa rajyat tin tighada suru ahe tikde lax dya chai biscuit

  • leave a comment

    Create Account    Log In Your Account    Don`t copy text!