पत्रकार सिद्धिक कप्पन यांना कोविड उपचारादरम्यानही बेड्या?

पत्रकार सिद्धिक कप्पन यांना कोविड उपचारादरम्यानही बेड्या?

पत्रकार सिद्धिक कप्पन यांना कोविड उपचारादरम्यानही बेड्या?

केरळ युनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट्स आणि काही प्रमुख माध्यमांनी दिलेल्या माहितीवरून, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी उत्तर प्रदेशात मथुरा येथे यूएपीए कायद्यांतर्गत सध्या युपी पोलिसांच्या ताब्यात असलेले केरळमधील पत्रकार सिद्धिक कप्पन यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करणारं पत्र युपीचे मुख्यमंत्री अजय मोहन बिष्ट उर्फ योगी आदित्यनाथ यांना लिहिलं आहे.

सिद्धिक कप्पन यांना मधुमेह आणि हृदयाचे आजार असल्याचं वृत्त आहे. कोविड-१९ ची लागण झाल्यानंतर त्यांना केव्हीएम हॉस्पिटल, मथुरा येथे दाखल करण्यात आलं आहे. प्रकृती अनिश्चित असतानाही त्यांना त्यांच्या पलंगावर बेड्या ठोकण्यात येत असल्याचं पिनराई विजयन यांनी पत्रात नमूद केलं आहे.

या प्रकरणात हस्तक्षेप करावा, जेणेकरून सिद्धिक यांना मानवीय वागणूक मिळावी, अशी विनंती पिनराई विजयन यांनी केलीय.

सिद्धिक यांना आवश्यक असलेल्या तज्ञ आरोग्य सेवेचाही त्यांना दुसऱ्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्याबाबत गांभीर्याने विचार करावा, जेणेकरून तिथे आधुनिक जीवनरक्षक सुविधा सुनिश्चित होतील, असंही पिनराई विजयन यांनी सुचवलं आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!