जाणून घ्या जोतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं !

जाणून घ्या जोतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं !

जाणून घ्या जोतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं !

बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण या संस्थेने वंचितांचा आधारवड – महात्मा ज्योतिबा फुले प्रश्नोत्तरं स्पर्धा आयोजित केली होती. डॉ. मंजिरी मणेरीकर यांनी त्यात पहिला क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील विजयी प्रश्नोत्तरे डॉ. मणेरीकर यांनी मिडिया भारत न्यूज साठी उपलब्ध करून दिली आहेत.

प्र. १) महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचा मार्टीन ल्युथर असे कोणी म्हटले ?

शाहू महाराज

प्र. २) महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८४८ साली पुण्याच्या बुधवार पेठेतील भाडयाच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा स्थापन केली. त्या कामी त्यांना कोणी सहकार्य केले ?

जगन्नाथ सदाशिवजी

प्र. ३) महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृशांसाठी स्थापन केलेली पहिली शाळा अद्यापही कोणत्या ठिकाणी सुरु आहे ?

भोकरवाडी- पूणे

प्र. ४) महात्मा ज्योतिबा फुले यांना वयाच्या कितव्या वर्षी मराठी गावठी शाळेत घालण्यात आले ?

वयाच्या ७ व्या वर्षी

प्र. ५) सन १८५२ मध्ये मुंबई सरकारने पुण्यास विश्राम बागेत एक दरबार भरवून ज्योतिबांच्या स्त्री शिक्षणाची दखल घेवून ज्योतिबांना एक शाल अर्पण करून त्यांचा गौरव केला. त्या शालीची किंमत किती होती ?

२०० रुपये

प्र. ६) अश्पृशांसाठी पहिली शाळा ज्योतिबांनी किती सालात कोठे सुरु केली ?

सन १८५१ साली पूणे येथे नानापेठेत

प्र. ७) महात्मा ज्योतिबांना ठार मारण्यासाठी आलेल्या दोन मारेकऱ्यापैकी (त्यांनी ज्योतिबांना न मारता ते त्यांचे एकनिष्ठ सेवक बनले.) कोणता मारेकरी पुढे मोठा पंडित होवून त्याने शृंगेरीच्या शंकराचार्याना वादात जिंकून सत्यशोधक समाजाला अजिंक्यपद मिळवून दिले ?

धोंडीराम नामदेव

प्र. ८) महात्मा ज्योतिबांनी आपल्या विहीरीवर व हौदावर पाणी भरण्यासाठी १८५१ साली अस्पृश्य लोकांना परवानगी दिली. तो ज्योतिबांचा पुण्यातील हौद आज कोणत्या नावाने ओळखला जातो ?

फुल्यांचा हौद

प्र. ९) महात्मा फुलेंच्या प्रयत्नाने सर्वप्रथम कोणत्या जोडप्यांचा पहिला पुनर्विवाह घडून आला ?

रघुनाथ जनार्दन व नर्मदा

प्र. १०) महात्मा ज्योतीबांच्या “बालहत्या प्रतिबंधक गृहाची” प्रेरणा घेऊन कोणत्या दोन पुढाऱ्यांनी पंढरपूर येथे “बालहत्या प्रतिबंधक गृह” स्थापन केले ?

महादेव गोविंद रानडे व लाल शंकर उमी शंकर

प्र. ११) हिंदू धर्मातील गुलामगिरीवर लख्ख प्रकाश टाकणारा कोणता ग्रंथ ज्योतिबांनी लिहिला ?

गुलामगिरी

प्र. १२) ज्योतिबांनी लग्नविधीची मंगलाष्टके कोणत्या भाषेतून प्रसिध्द केली ?

प्राकृत

प्र. १३) ज्योतीरावानी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज या संस्थेचा मूळ पाया काय होता ?

समतेच्या पायावर

प्र. १४) ज्योतिबांनी मुंबईमध्ये गिरणी कामगारांचा पहिला संघ कोणाच्या मदतीने स्थापन केला ?

नारायण मेघाजी लोखंडे

प्र. १५) लेखक पंढरीनाथ पाटील यानी ज्योतीबांना “हिंदूस्थानातले पहिले……. ”
कोण म्हणून संबोधले आहे ?

सोशॅलिस्ट

प्र. १६) सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या उपयुक्तेबद्दल हिंदूराष्ट्राचे मत अजमावून पाहण्यासाठी विलायत सरकारने कोणते कमिशन नेमले ?

हंटर कमिशन

प्र. १७) १८७४ सालच्या दुष्काळात ज्योतीबांनी धनकवडी कॅपवर एक छात्रालय सुरू केले. अनाथ हजार बालकांना भाकरी व भाजी वाटप होई. किती महिने हे केंद्र सुरु होते ?

नऊ महिने

प्र. १८) ज्योतीबा फुले किती वर्ष म्युनिसिपल कमिटीचे सभासद होते ?

१० वर्षे

प्र. १९) १८८९ सालच्या राष्ट्रीय संस्थेच्या मुंबईतील ५ व्या अधिवेशन सभेच्या मंडपासमोर महात्मा फुले यांनी उभारलेला शेतकऱ्यांचा पुतळा कशाचा होता व किती फूट उंच होता ?

गवताचा ४o फूट उंच

प्र. २०) १८८९ मध्ये लंडनच्या महिला वर्गाने मुंबईच्या नाभीक वर्गाचे अभिनंदन का केले ?

विधवा केशवपनावर सामुहीक बहिष्कार घातल्याबददल

प्र. २१) १८८० साली महात्मा फुले यांनी सिंधुदुर्ग जिल्हयातील कोणत्या ठिकाणी भेट दिली ?

सावंतवाडी

प्र. २२) महात्मा फुले यांच्या पक्षाघाताच्या आजारपणात त्यांच्या उपचारासाठी कोणत्या दोन मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात पैसा पुरवला ?

सयाजीराव गायकवाड
नागेश्वरगीर कल्याणगीर बुवा

प्र. २३) महात्मा फुले यांनी लिहिलेले अखेरचे पुस्तक कोणते ?

सार्वजनिक सत्यधर्म

प्र. २४) मजुरांच्या सुधारणेसाठी व त्यांची संघटना बांधण्यासाठी ज्योतीरावांनी कोणत्या नावाने कंपनी स्थापन केली ?

पूणे कमर्शियल अॅड कॉन्ट्रक्टींग कंपनी

प्र. २५) मुंबई येथील जनतेने
१८८८ मध्ये ज्योतिबा फुले यांना कोणती पदवी देऊन सन्मान केला ?

महात्मा

प्र. २६) श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा फुले यांना कोणत्या नावाने गौरविले आहे ?

हिंदूस्थानचा वॉशिंग्टन

प्र. २७) “सत्याचा पालनवाला
हा धन्य ज्योतिबा झाला
पतितांचा पालनवाला
हा धन्य महात्मा झाला”
हे काव्य ज्योतिबांच्या गौरवार्थ कोणी लिहिले ?

महर्षी अण्णासाहेब शिंदे

प्रश्न २८ ज्योतिबा फुले यानी सरकारी नोकरी करण्याचे ठरवले असते तर ते कोण झाले असते असे लेखक पंढरीनाथ पाटील याना वाटते ?

हायकोर्ट जज्ज

प्रश्न २९ भाषेच्या संदर्भाने इश्वर भक्ती कशी करावी असा सल्ला सर्व जनतेस ज्योतिबानी दिला ?

ईश्वरभक्ती मातृभाषेत करावी

प्रश्न ३० “सत्यासत्याशी मन केले ग्वाही
मानियेले नाही बहुमता”
असा संकल्प करुन ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यानी कोणता निर्णय घेतला ?

मुलींच्या शाळेसाठी घराबाहेर पडण्याचा


MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!