बनावट ओळखपत्राच्या आधारे लोकल प्रवास केल्यास दंडात्मक कारवाईचे आदेश !

बनावट ओळखपत्राच्या आधारे लोकल प्रवास केल्यास दंडात्मक कारवाईचे आदेश !

बनावट ओळखपत्राच्या आधारे लोकल प्रवास केल्यास दंडात्मक कारवाईचे आदेश !

रेल्वे तिकिट तपासनीसांना लसीकरण पूर्ण झाल्याचं नमूद केलेलं ओळखपत्र तपासण्याचा अधिकार देण्यात आला असून ज्या प्रवाशांकडे असं ओळखपत्र नसेल किंवा प्रवाशांकडे खोटं ओळखपत्र खोटे आढळून आल्यास प्रवाशांकडून तसंच खोटं प्रमाणपत्र प्रमाणित करणाऱ्यांकडून रु. ५००/- इतका दंड वसूल करण्याचे तसंच भारतीय दंड संहिता १८६० नुसार कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने जारी केले आहेत.

आरोग्य सेवा देणारे अधिकारी / कर्मचारी / अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसंच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा व दुसरी मात्रा (डोस) घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांनाच लोकलट्रेन प्रवास अनुज्ञेय करण्यात आला आहे.

ज्या कर्मचारी अथवा नागरिक यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पुर्ण झाले आहेत, त्यांना लसीकरणाच्या अंतिम प्रमाणपत्राच्या आधारे लसीकरण प्रमाणपत्र व आस्थापनांच्या ओळखपत्रासह राज्यशासनाने ठरवून दिलेल्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत विहीत कार्यपध्दतीने (ऑनलाईन/ऑफलाईन) प्रमाणित केलेल्या ओळखपत्र धारकानांच लोकलट्रेन प्रवासासाठी मासिक/ त्रैमासिक पास देण्यात यावेत.

प्रमाणित ओळखपत्र प्राप्त करण्याबाबतच्या तपशीलवार व स्वयंस्पष्ट सूचना प्राधिकाऱ्यांकडून स्वतंत्रपणे प्रसारीत करण्यात येणार आहेत.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!