महाराष्ट्रात लाॅकडाऊन की अधिक निर्बंध ? मुख्यमंत्र्यांनी काय दिले संकेत ?

महाराष्ट्रात लाॅकडाऊन की अधिक निर्बंध ? मुख्यमंत्र्यांनी काय दिले संकेत ?

महाराष्ट्रात लाॅकडाऊन की अधिक निर्बंध ? मुख्यमंत्र्यांनी काय दिले संकेत ?

कोविड संकटकाळात राज्य सरकारला सहकार्य करण्याऐवजी आपापलं सोयीचं राजकारण करताना सरकारला कोंडीत पकडू पाहणाऱ्या मनसे, भाजपासह काँग्रेसलाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन शब्द सुनावलेत. कोविडबाबतची सद्यस्थिती सांगण्यासाठी राज्याला थेट संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी ही संधी साधली.

२ एप्रिलपासून राज्य पुन्हा ठप्प होणार अशी सर्वसामान्यांत चर्चा होतीच. त्यामुळे मुख्यमंत्री पुन्हा स्थानबद्धता घोषित करतील, अशी सगळ्यांनाच धाकधूक होती. मुख्यमंत्र्यांनी स्थानबद्धतेचा केवळ इशारा दिला ; पण घोषणा केली नाही. एकदोन दिवसांत राज्यात निर्बंध मात्र कडक लागू होतील, याचे त्यांनी स्पष्ट संकेत दिले.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या धर्तीवर राज्य शासनाने विविध निर्बंध नव्याने लागू करण्यास सुरुवात केलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी फेसबुक लाईव्ह माध्यमातून संवाद साधणार असल्याचे जाहीर झाल्यावर ते स्थानबद्धता अर्थात टाळेबंदीबाबत काय घोषणा करणार याची उत्सुकता होती..

मुख्यमंत्र्यांनी आपल्या थेट संबोधनात सविस्तरपणे अनेक मुद्द्यांना स्पर्श केला.

ज्यात सद्यस्थितीतील महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेची प्राप्त स्थिती, लसीकरणाची स्थिती, लसीकरण केल्यानंतरही नागरिकांनी घेण्याची काळजी, जगभरातील विविध खंडातील देशांमध्येसुद्धा लॉक डाऊनची सद्यस्थिती काय आहे, याचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.

राजकीय विरोधकांचा, टीकाकारांचा त्यांनी नेहमीच्याच ठाकरी शैलीत समाचार घेतला. ज्यात भाजपाचे नेते, आनंद महिंद्रासारखे उद्योगपती होतेच, पण ‘ कुणी म्हणतंय लाॅकडाऊन केलं तर प्रत्येकाच्या खात्यात पाच हजार द्या, असा उल्लेख करत, काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही कोपरखळी मारली.

मी मास्क वापरत नाही, असं म्हणणाऱ्या मनसे नेता राज ठाकरेंनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टोला लगावला. मास्क न वापरण्यात कसले शौर्य आहे, असा सवाल त्यांनी केला.

लस घेतलेली असेल तरीही मास्क वापरावाच लागेल, असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं.

सरकार जी पावलं उचलतं आहे, ती जनतेच्या हितासाठी उचलतं आहे. अर्थचक्र फिरवायचं आहे, गरीबाची रोजीरोटी वाचवायची आहे. पण सगळ्यात आधी आपल्याला त्यांचे जीव वाचवायचे आहेत, हे सांगतानाच, राजकारण करताना जनतेच्या जीवाशी खेळू नका, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

संकटातून वाचवणाऱ्या विष्णूचे अनेक अवतार पाहिले, पण आता संकटात टाकणाऱ्या विषाणूचे अनेक अवतार आपण पाहतोय, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मागच्या टप्प्यात कोरोनाचा प्रभाव ओसरताच लोक समारंभांना गर्दी करू लागले, बाजार गर्दीने भरू लागले. या गाफीलपणामुळेच कोरोना पहिल्यापेक्षा अधिक पटीने घातक होऊन आलाय, त्यामुळे लाॅकडाऊन अपरिहार्य ठरणार आहे आणि कोणी किती टीका केली, रस्त्यावर उतरलात तरी त्याची पर्वा न करता लोकांचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक ते निर्णय मी घेणारच, असं मुख्यमंत्री म्हणाले.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!