महाराष्ट्रात लाॅकडाऊनचा मुक्काम वाढणार ! मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत !!

महाराष्ट्रात लाॅकडाऊनचा मुक्काम वाढणार ! मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत !!

महाराष्ट्रात लाॅकडाऊनचा मुक्काम वाढणार ! मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत !!

लोकांचा जीव वाचवणं यालाच सर्वाधिक प्राधान्य असल्याने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लाॅकडाऊनशिवाय पर्याय नाही ! लोकांना काही काळ त्रास सहन करावा लागेल ! असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाॅकडाऊन वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत.

काय म्हणाले मुख्यमंत्री :

◾कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील.

◾प्रथम जीव वाचवण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही आरोग्याची आणीबाणी असेल तर नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला प्राधान्य असले पाहिजे.

◾विरोधी पक्ष नेत्यांनी दिलेल्या सूचनांवर निश्चितपणे गांभीर्याने विचार केला जाईल, त्यांनी चांगल्या सूचना मांडल्या आहेत

◾रेमेडीसिवीर उपलब्धता,चाचण्यांचे रिपोर्ट्स लवकर मिळणे, प्रयोगशाळांना यासाठी सूचना देणे,ऑक्सिजन उपलब्ध व्हावा म्हणून काटेकोर नियोजन अशा सूचनांवर शासन कार्यवाही करेल.

◾आपण हे सर्व काही करू पण या क्षणाला वेगाने वाढणारी रुग्णवाढ थांबवायची कशी हा प्रश्न आहे.

◾गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लोक घरी होते. त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे सोपे होते.

◾आता सर्व खुले झाले आहे, त्यामुळे यात व्यावहारिक अडचणी येतात. हे केंद्राने समजून घ्यावे.

◾लसीकरण वाढविण्याची खूप गरज आहे.युवा पिढीला लस देण्याची गरज आहे.फायझर कंपनी तर १२ ते १५ गटातील मुलांना लस देण्याचे नियोजन करतेय. दररोज झपाट्याने वाढणारा संसर्ग,रुग्णवाढ काहीही करून प्रथम रोखणे अतिशय गरजेचे आहे. सर्वानुमते एकमुखाने निर्णय घेऊन या संकटावर मात कशी करावी ते ठरवले पाहिजे.

◾कडक निर्बंध लावताना गरीब, श्रमिक, हातावर पोट असणाऱ्या वर्गाला त्रास होऊ नये ही सर्वांचीच भूमिका आहे. त्यादृष्टीने विचार सुरू आहे.

◾कोरोना सर्वांनाच टार्गेट करीत आहे. हातावर पोट असलेला वर्ग सगळ्या विभागात आणि क्षेत्रात आहे. त्यामुळे विचार करायचा तर सगळ्यांचाच करावा लागतो.

◾सर्व पक्षीय नेत्यांना माझे आवाहन आहे की जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन जो काही निर्णय घेतला जाईल त्यास सहकार्य द्यावे

◾रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढते आहे की, आज लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती येईल.

◾एका बाजूला जनभावना आहे दुसऱ्या बाजूला कोरोनाचा उद्रेक.अशात ही लढाई जिंकण्यासाठी थोडी कळ तर काढावीच लागेल. मी विविध क्षेत्रातील लोकांशी बोलतोए ! काल खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी बोललो.शासनाला सहकार्य करण्याची सगळ्यांची तयारी आहे. टास्क फोर्सच्या तज्ज्ञांचे म्हणणेही विचारात घेत आहोत !


केवळ लसीबाबत नव्हें पीपीई किट, वेंटीलेटरबाबतही दुजाभाव ! पृथ्वीराज चव्हाण यांचा संसदेतील माहितीच्या आधारे गौप्यस्फोट !

काय घडलं दिवसभरात | 310

 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!