महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी; करोना मृत्यू दरात घट !

महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी; करोना मृत्यू दरात घट !

महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी; करोना मृत्यू दरात घट !

महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र कोविड -१९ च्या मृत्यूचे प्रमाण ४.७६% वरुन ३.४९% पर्यंत खाली आले आहे.

२२ एप्रिलला राज्यात एकूण रुग्ण ५६४९ होते त्यापैकी २६९ रुग्णांचा मृत्यू झाला. २१ मे ला राज्यात कोविड रुग्णांची संख्या ४१६४२ होती पैकी १४५४ जणांचा मृत्यू झाला. २३ मे ला रुग्णांची संख्या ४४५८२, तर मृत्यू संख्या १५१७ आहे. रुग्णांची संख्या वाढत असतानाच मृत्यूचे प्रमाण कमी होताना दिसून येत आहे.बरेचसे रुग्ण पूर्णतः बरे होऊन घरी परतले आहेत.

महिनाभरातली आकडेवारी तपासली तर आपल्याला दिसून येईल की मृत्यूच प्रमाण एक टक्याच्यावर कमी झाले आहे. मृत्यू प्रमाण ४.७६% वरुन ३.४९% वर आला आहे.

१) २२ एप्रिल – मृत्यू दर ४.७६%
२) २६ एप्रिल -मृत्यू दर ४.२४%
३) ३० एप्रिल- मृत्यू दर ४.३७%
४) १ मे – मृत्यू दर ४.२२%
५) ९ मे – मृत्यू दर ३.८५%
६) १४ मे – मृत्यू दर ३.०७%
७) २१ मे – मृत्यू दर ३.४९%

करोना टेस्टची संख्या एप्रिल मध्ये जवळपास ८९००० एवढी होती. आता ती वाढून आजपर्यंत ३.२२ लाखावर पोहचली आहे.

आतापर्यंत महाराष्ट्रात ४४५८२ रुग्णांची नोंद झाली असून पैकी १२५८३ रुग्ण पूर्णतः बरे होऊन घरी पोहचले आहेत.

News by MediaBharatNews Team

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!