मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
प्रधानमंत्र्यांनी आपल्या शब्दांना जपून वापरावे. त्यांच्या वक्तव्यावर देशाची सामुदायिकता, सैनिकांचे मनोबल, सीमा सुरक्षा टिकून असते, त्यामुळे पंतप्रधानांनी आपले शब्द अत्यंत जपून वापरावे लागतात, असा कानटोचणी वजा सल्ला भारताचे माजी प्रधानमंत्री मनमोहनसिंग यांनी नरेंद्र मोदींना दिला आहे.
आज आपण इतिहासाच्या नाजूक वळणावर उभे आहोत. सरकारचे निर्णय आणि सरकारचे धोरण ठरवतील की,भविष्यात येणा-या पिढ्या आपलं आकलन कश्या प्रकारे करणार आहेत. जो देशाचे नेतृत्व करतो, त्याच्या खांद्यावर देशाची धुरा असते.आपल्या लोकशाही प्रजासत्ताकात ही संपूर्ण धुरा प्रधानमंत्र्यांच्या खांद्यावर असते, याची आठवण करून देणारं निवेदन माजी प्रधानमंत्री व जागतिक अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग यांनी जारी केलं आहे.
१५-१६ जून २०२० ला गलवान खो-यात भारताच्या सुपुत्रांनी आपलं सर्वोच्च बलिदान दिलेल आहे. आपल्या कर्तव्याप्रती तत्पर असलेल्या बहादुर सैनिकांनी देशासाठी आपले प्राण दिले. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत देशाचं रक्षण केलं. आम्ही त्या सर्व सैनिक, त्यांच्या परिवाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांचं बलिदान व्यर्थ जायला नको, अशी अपेक्षा मनमोहनसिंग यांनी आपल्या निवेदनात व्यक्त केली आहे.
चीन ने एप्रिल २०२० पासून भारताच्या गलवान खोरे तसेच पांगोंग त्सो लेक भागात अनेक वेळा घुसखोरी केली. आम्ही त्यांच्या कुठल्याही धमकीला घाबरत नाही किंवा आपल्या भूभागाचा कुठल्याही प्रकारे समझोता नाही करु शकत. मात्र प्रधानमंत्र्यानी आपल्या वक्तव्यांनी षडयंत्री चीनला अधिक बळ देऊ नये. त्यांच्या वक्तव्यामुळे विविध अंगाने संभ्रम निर्माण झालाय. तो दूर करून सर्वांनी पुन्हा एकोप्याने सद्य परिस्थितीचा सामना करावा, असं आवाहन मनमोहनसिंग यांनी केलं आहे.
हीच ती वेळ अशावेळी आपण सगळ्यांना एकमताने,एकजुटीने ह्या संकटांना तोंड द्यायचे आहे. मी सरकारला सांगू इच्छितो कुठलाही भ्रामक प्रचार कुठल्याही कुठनीतीचा भाग असू शकत नाही असा प्रचार मजबूत पाऊलांना पर्याय असू शकत नाही.प्रचारासाठी वापरलेल्या खोट्या गोष्टी फार काळ सत्य लपवू शकत नाहीत, या शब्दांत मनमोहनसिंग यांनी मोदींना सुनावले आहे.
आम्ही सरकारला आग्रह करू की काळवेळेची मागणी ओळखून संकटाचा योग्य मार्गाने सामना करावा आणि कर्नल पी.संतोष बाबू आणि सैनिकांच्या आहुतीच्या कसोटीवर खरे उतरावे, ज्यांनी देशाच्या अखंडतेसाठी सीमेचे रक्षण करताना आपल्या प्राणांचा त्याग केला, असं मनमोहनसिंग यांनी म्हटलं आहे.
News by MediaBharatNews Team