मनोहर भिडेंभोवती वाळू तस्कर, खाजगी सावकार, जुगारींचा वावर ; निकटवर्तीयाचा गौप्यस्फोट !

मनोहर भिडेंभोवती वाळू तस्कर, खाजगी सावकार, जुगारींचा वावर ; निकटवर्तीयाचा गौप्यस्फोट !

मनोहर भिडेंभोवती वाळू तस्कर, खाजगी सावकार, जुगारींचा वावर ; निकटवर्तीयाचा गौप्यस्फोट !

शिवप्रतिष्ठान चे संस्थापक मनोहर भिडे युवकांमध्ये छत्रपती शिवरायांचे तसंच संभाजीराजांचे विचार वगैरे पेरत असतात. जाज्वल्य राष्ट्रप्रेम वगैरे शिकवत असतात ; असं आजवर पसरवलं जायचं. पण शिवप्रतिष्ठानमधला वाद चव्हाट्यावर आला तसा संभाजी भिडे यांचा कथित आदर्श युवक घडवणाऱ्या प्रतिमेचाही फुगा फुटलाय.

मनोहर भिडेंभोवती वाळू तस्कर, खाजगी सावकार, ठेकेदार, जुगारी तसंच तोंडात २४ तास मावा असलेले लोक वावरत असतात ; इतकंच नव्हे तर ते भिडेंना पोलिसांपासून सरकारी कार्यालयांपर्यंत लाचारासारखं फिरवतात, असा आरोप भिडेंचे गेल्या २० वर्षांपासूनचे निकटवर्तीय नितिन चौगुले यांनी केलाय.

चौगुले यांनी शिवप्रतिष्ठानमधून बाहेर पडून शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेची स्थापना केलीय. आपण गुरुजींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करणार, असं चौगुले यांनी जाहिर केलेलं असलं तरी त्यांची नवी संघटना एकप्रकारे भिडेंनाच आव्हान असल्याचं बोललं जातंय.

चौगुलेंच्या बंडामागे भारतीय जनता पार्टीची फूस व खासदार उदयनराजे भोसले यांचं पाठबळ असल्याचं बोललं जातंय.

शिवप्रतिष्ठानमधला अंतर्गत वाद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनीच समाजमाध्यमात चव्हाट्यावर आणला. हा वाद आधी भिडेंपर्यंतही गेलेला होता. पण भिडेंचं जाज्वल्य राष्ट्रप्रेम तो वाद सोडवू शकलं नाही. अखेर देसाईंनीच चौगुलेंना संघटनेतून काढून टाकल्याची घोषणा एका विडिओद्वारे केली. गेली वीस वर्षे भिडेंसोबत सावलीसारखे वावरणाऱ्या चौगुलेंसाठी हा मोठा धक्का होता. पण लागलीच शक्तीप्रदर्शन करत चौगुलेंनी नव्या संघटनेची स्थापना केली.

जुगार खेळताना पोलिसांना सापडलेल्या एका धारकऱ्याला मी सोडवला. त्याने ‘मी गोरक्षा करतो म्हणून मुस्लिमांनी मला अडकवले’ असा बनाव करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक खुलासा चौगुले यांनी केला.

एका धारकऱ्यांने आर्थिक संस्था काढून लोकांचे पैसे थकवले. ठेवीदार मोर्चा काढणार होते, तर त्याने गुरुजींना ठेवीदारांच्या दारोदार फिरवले. गुरुजींनी आपला कार्यकर्ता आहे म्हणून विनंती करून कारवाई होऊ दिली नाही. काहीजण नगरसेवक , आमदारकीचे , खासदारकीचे तिकीट मिळवण्यासाठी गुरुजींचा वापर करतात.

ते म्हणाले, एकजण इतरांच्या जमिनीवर कब्जा करून बोर्ड लावण्याचे काम करतो. पैसे उकळून प्रकरण मिटवण्याचे प्रकार करतो, अशी लोकं गुरुजींच्या अवतीभोवती आहेत.

मनोहर भिडेंनी हिंदुत्वाच्या नावावर युवकांची माथी भडकावण्याचं काम केल्याचा आरोप त्यांच्यावर अनेकदा झालाय. भिडेंच्या शिक्षणाबाबत, कथित विद्वत्तेबाबत अनेकदा कपोलकल्पित माहिती समाजमाध्यमातून पसरवण्यात आलीय ; पण ती कधीही सिद्ध होऊ शकलेली नाही. भिडेंनी विविध विषयांवर अनेकदा बेलगाम विधानं केलीत. पण तरीही माध्यमांनी सोयिस्कररित्या भिडेंची एक प्रखर राष्ट्रवादी आदर्श प्रतिमा बळेच उभी केली होती.

नितीन चौगुलेंच्या गौप्यस्फोटामुळे शिवप्रतिष्ठानमध्ये नेमकं काय चालतं आणि स्वत: भिडे ‘कार्यकर्त्यांवरच्या प्रेमापोटी’ कोणत्या प्रवृत्तीची पाठराखण करतात, ते चव्हाट्यावर आलंय.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!