संगमेश्वर तालुक्यात संकटात धावून आली मातृमंदिर संस्था ; देवरूखमध्ये सुरू केलं ३० ऑक्सिजन बेडचं कोविड सेंटर !!

संगमेश्वर तालुक्यात संकटात धावून आली मातृमंदिर संस्था ; देवरूखमध्ये सुरू केलं ३० ऑक्सिजन बेडचं कोविड सेंटर !!

संगमेश्वर तालुक्यात संकटात धावून आली मातृमंदिर संस्था ; देवरूखमध्ये सुरू केलं ३० ऑक्सिजन बेडचं कोविड सेंटर !!

संगमेश्वर तालुक्यातील कोविड रुग्णाची वेगाने वाढणारी संख्या आणि त्यांसाठी आवश्यक रुग्णालय सुविधेचा प्राधान्याने विचार करत मातृमंदिर संस्थेने देवरुख येथे ३० बेडचं अद्ययावत कोविड केअर सेंटर सुरू केलंय.

डॅा परमेश्वर गोंड यांचं एस एम एस हॅास्पिटल या कोविड सेंटरचं वैद्यकीय व्यवस्थापन करणार आहे. यात डॅा. प्रकाश पाटील, डॅा निकीता धने, डॅा. प्राजक्ता शिंदे पाटील आणि सर्व टिम कार्यरत आहे. ॲाक्सिजन आणि आयसीयूची व्यवस्था आहे. गरज वाढल्यास अधिक आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्याची ग्वाही डॅा. गोंड यांनी दिलीय.

संगमेश्वर तालुका हा सह्याद्रीच्या खोऱ्यातील अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ प्रदेश आहे. आजही येथील अनेक भागात आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत.

कोविडच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कोकणात शिमगोत्सवात प्रचंड वेगाने फैलावला. गेल्या महिनाभरात हा फैलाव इतका वेगाने झाला की खेड्यापाड्यातून वाड्यावाड्यातून कोरोना पॅाझीटीव रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली.

शासकीय यंत्रणा अहोरात्र राबत असतांना तीही कमी पडू लागली . या तालुक्यातील पॅाझीटीव्ह रुग्ण दोन अंकी संख्या पार करु लागले. ३०-३५ गाव कंटाईनमेंट झोन जाहिर झाले. रुग्णांना रत्नागिरी चिपळूण येथे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. ॲाक्सिजनची व्यवस्था नव्हती.

या पार्श्वभूमीवर मातृमंदिर संस्थेने कोविड सेंटर सुरू करण्यासाठी पावलं उचलली व त्यासाठी लागणारी परवानगी तहसीलदार सुहास थोरात यांनीही तात्काळ दिली, अशी माहिती मातृमंदिरचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी दिली. संगमेश्वर तालुका परिसरातील रुग्णांसाठी कोविड सेंटरचा सुविधा उपलब्ध आहे, असं आवाहन हेगशेटये यांनी केलं आहे.

तालुक्यातील लोकांची आर्थिक परिस्थिती पाहता सदरची वैद्यकीय सुविधा उपचार, औषधांसहित मोफत देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून आम्ही लोकांनाही मदतीचं आवाहन करीत आहोत. मातृमंदिरला दिलेल्या देणग्या आयकर अधिनियम (Income Tax) कलम 80 G नुसार करसवलतीस पात्र आहेत, अशी माहिती हेगशेट्ये यांनी दिलीय.

या कार्यात आपलं योगदान देऊ इच्छिणाऱ्यांना

बँकेचे नांव – अपना सहकारी बॅक लि.
शाखा – देवरुख
खात्याचे नांव – मातृमंदिर देवरुख
खाते क्र.- 029011100004197
IFSC – ASBL0000029

या खात्यावर देणगी पाठवता येईल, असं आवाहन हेगशेट्ये यांनी केलंय.

अधिक माहितीसाठी अभिजित हेगशेट्ये ( 94220 52314 ) किंवा आत्माराम मेस्त्री ( 94224 30809 ) यांच्या संपर्क साधावा.

मातृमंदिर संस्थेची स्थापना मावशी हळबे यांनी पुज्य सानेगुरुजी यांचा मूल्याधिष्ठीत आदर्शांने राष्ट्र सेवा दलाच्या वैचारिक बांधिलकीतून केली. आज राष्ट्रसेवादलाचे अध्यक्ष पद्मश्री डॅा. गणेश देवी यांनी सेवादल कार्यकर्त्यांनी, संस्थांनी कोविड प्रश्नावर प्राधान्याने काम करण्याचं आवाहन केलं . या आवाहनाला प्रतिसाद देत मातृमंदिरने देवरुख येथे आपल्या हॅास्पिटल कॅम्पसमध्ये ३० बेडचं अद्ययावत कोविड केअर रुग्णालय सुरु केलंय.

मातृमंदिरच्या या धैर्यशील लोकोपयोगी उपक्रमाने संगमेश्वर तालुक्यांतील जनतेसाठी या भीषण महामारीच्या काळात मोठी सुविधा उपलब्ध केल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे. यात संस्थेचे कार्यवाह आत्माराम मेस्त्री, अनिल अणेराव , विलास कोळपे, नाना कोळवणकर, सुचेता कोरगावकर यांचाही मोठा सहभाग आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!