मी का लिहितो ?

मी का लिहितो ?

मी का लिहितो ?

आपण कसं जगायचं, किंबहुना जगायचं की नाही, हे सरकार ठरवत असतं. हे सरकार म्हणजे कोण तर आपणच. सरकार आपलं प्रतिनिधित्व करत असतं. अपेक्षित हे असतं की आपण सरकारवर नियंत्रण ठेवायचं असतं, पण आपण आपली पकड ढील सोडतो आणि सरकार आपल्याला नियंत्रित करू लागतं. इथेच लोकशाहीचा उलटा प्रवास सुरू होतो आणि तो हुकुमशाहीकडे सरकतो. त्याची चाहुल लागल्यावर तरी बोलायला हवं. त्या दृष्टीने आनंद शितोळे यांची फेसबुक पोस्ट पुरेशी बोलकी आहे.

मी काय खावं हे सरकार ठरवत. मी काय वाचाव हे सरकार ठरवत. मी काय बघाव हे सरकार ठरवतं. मी काय बोलू नये हे सरकार ठरवत.

माझ्या अपत्यांनी शाळेत , कॉलेजात काय शिकावं हे सरकार ठरवतं. माझ्या घरातल्या आजारी माणसांना किती रुपये दरान औषध मिळावीत हे सरकार ठरवतं. माझ्या घरात येणार अन्नधान्य किती रुपयांनी मिळाव हे सरकार ठरवतं.

माझ्या घरात येणार पाणी कुठून आणि किती रुपये दरान याव हे सरकार ठरवतं. माझ्या घरात येणारी वीज किती वेळ येईल आणि किती रुपये दरान येईल हे सरकार ठरवतं.

माझ्या गाडीत पेट्रोल टाकायला किती रुपये द्यावे लागतील हे सरकार ठरवतं.

माझ्या कुटुंबाला विमा कवच घ्यायचं असेल तर त्याचा दर सरकार ठरवतं.

मी जिथ नोकरी करतो त्या कंपनीला होणारा नफा नुकसान सरकारी धोरणावर अवलंबून आहे.

मार्केट नावाचा जो बागुलबुवा आहे त्याच्या नाकातली वेसण सरकारच्या हातात असतीय.

माझी कंपनी नफ्यात आली तर मला पगारवाढ मिळेल कि नाही हे ठरतं.

माझ्या शेतीला कुठून आणि कस पाणी मिळेल हे सरकार ठरवतं. शेतीत पेरायला बीज आणि टाकायला खताचे दर सरकार ठरवतं. माझ्या शेतीत पिकलेल्या मालाचा बाजारभाव सरकार ठरवतं.

माझ्या भवताली असणारा परिसर आज कसा असेल आणि उद्या कसा राहील हेही सरकार ठरवतं.

माझ्या जन्मापासून माझ्या मृत्यूपर्यंत प्रत्येक बाबतीत माझ्या आयुष्यात सरकार कुठे ना कुठे दृश्य अदृश्य स्वरुपात माझ्या जगण्यावर प्रभाव टाकतं.

हि सरकार नावाची जी व्यवस्था आहे तिच्यात राजकारणी लोकांच मंत्रीमंडळ आल , प्रशासन आल , न्यायपालिका आली , कार्यपालिका आली अश्या सगळ्या संस्था आल्या.

माझ्या परीने सरकारने आखून दिलेल्या नियम आणि कायद्यानुसार मी नागरिक म्हणून वागतो, पालन करतो.

ह्या सरकारला निवडून देण्याच्या प्रक्रियेतला एक भाग , अगदी लहान का असेना , माझ मूल्य अतिशय कमी असेल , पण माझ्या मताला मूल्य आहे, म्हणून मला जिथे जिथे शक्य होईल तिथे मी माझ्या हक्कासाठी बोलल पाहिजे, म्हणून मी इथ राजकारणाबद्दल लिहितो. माझी राजकीय मत मांडतो.

येणारे भलेबुरे अनुभव असतील , धोरण असतील किंवा निर्णय असतील , त्याचा थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम माझ्या जगण्यावर होतो म्हणून मी लिहितो. कधी समर्थन करायला तर कधी विरोध करायला.

माझ्या लिहिण्याने सरकार मत बदलेल अशी भाबडी आशा कधीच नसते. माझ्या लिहिण्याने वाचणारे त्यांच मत बदलतील अशीही आशा नसते. पण किमान माझ्या मनात कोंडलेली वाफ बाहेर पडावी आणि मनमोकळ व्हाव ह्या भावनेसाठी का होईना, पण मी लिहितो.


आनंद शितोळे

लेखक सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कायद्याचे अभ्यासक आहेत.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!