मिलिटरी येणार, मुंबई ठप्प होणार; ही निव्वळ अफवा ! पोलिसांचा खुलासा !

मिलिटरी येणार, मुंबई ठप्प होणार; ही निव्वळ अफवा ! पोलिसांचा खुलासा !

मिलिटरी येणार, मुंबई ठप्प होणार; ही निव्वळ अफवा ! पोलिसांचा खुलासा !

मुंबई-पुणे पुढचे दहा दिवस मिलिटरीच्या ताब्यात जाणार असून, संपूर्ण शटडाऊन होणार आहे. फक्त दूध व औषधं मिळतील. आवश्यक सामान भरून ठेवा, अशा आशयाचा इंग्रजी भाषेतला मजकूर मोठ्या प्रमाणावर समाजमाध्यमात पसरवण्यात आलेला असून, तो सपशेल खोटा आहे, असा स्पष्ट खुलासा मुंबई पोलिसांनी केला आहे.

हा मजकूर खोटा असल्याने तो आपल्यापर्यंत पोहचल्यास तो मोबाईलमधून काढून टाकून त्याच्या प्रसाराची साखळी जागेवरच खंडित करावी, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. घोषित टाळेबंदीतील अटीशर्ती व मर्यादांच्या अधीन राहून नियमांचं पालन करून, लोकांच्या बाहेर पडण्यावर बंदी नाही, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनीही लोकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. मुंबई पोलिसांंना १०० क्रमांकावर संपर्क साधून आपल्या मनातल्या कुठल्याही शंकेची खातरजमा आपण करू शकता, असं पोलिस आयुक्तांनी म्हटलं आहे. अधिकृत शासकीय संदेश असल्याशिवाय इतर कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पोलिस आयुक्तांनी केलं आहे.

MediaBharatNews

Related Posts
comments
 • मिलिटरी नं …शहर ठप्प कसं होईलं.
  पूर्वी दंगलीत मिलिटरी ला पाचारण केलं जायचं ….5ते 6…महीने..असायची… तेही शिस्ती करीता.
  …. ..

 • leave a comment

  Create Account  Log In Your Account  Don`t copy text!