अल्पवयीन मुलीवर गेले नऊ महिने बलात्कार ; एकोणतीस जणांवर गुन्हा दाखल ; २६ अटकेत !

अल्पवयीन मुलीवर गेले नऊ महिने बलात्कार ; एकोणतीस जणांवर गुन्हा दाखल ; २६ अटकेत !

अल्पवयीन मुलीवर गेले नऊ महिने बलात्कार ; एकोणतीस जणांवर गुन्हा दाखल ; २६ अटकेत !

जानेवारीपासून गेल्या नऊ महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आरोपींनी एका 14 वर्षाच्या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना डोंबिवलीतून उघड झाली आहे. यासंदर्भात मानपाडा पोलिसांनी मानपाडा पोलीस स्टेशन ठाण्यात बलात्कार व पोस्कोतील कलमांखाली गुन्हा दाखल झाला असून एकूण २९ आरोपींपैकी २६ जणांना एक धडक मोहीम राबवून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दोन दिवसापूर्वी यातील ७ आरोपींनी पीडितेवर वडवली एकाच वेळी सामूहिक बलात्कार केला. यानंतर तिला असह्य वेदना झाल्यावर तिने ही घटना आपल्या आईला सांगितली. त्यानंतर सदर प्रकरण पोलिसांपर्यंत पोचलं.

संबंधित पीडित मुलीशी एका युवकाने समाजमाध्यमात ओळख वाढवली व त्यानंतर तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित करून त्याचा मोबाईलवर व्हिडिओ बनवला. संबंधित युवकांने तो व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर शेअर केला. त्याच व्हिडिओच्या आधारे इतर आरोपी मुलीला ब्लॅकमेल करू लागले.

व्हिडिओ प्रसारित करण्याची भीती दाखवून त्यांनी तिला डोंबिवली, मुरबाड, बदलापूर, वडवली, रबाळे अशा विविध ठिकाणी नेऊन बलात्कार केला. या घटनेत एकावेळी दोन ते तीन जणांचा सहभाग असायचा. प्रत्येक वेळी वेगवेगळी मुलं ब्लॅकमेल करून शरीरसंबंधांची मागणी करायचे.

मुलीने काल रात्री मानपाडा पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार नोंदवली, त्यावेळी तिने तब्बल 29 आरोपींची नावं दिली आहेत, ज्यात दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.

या अल्पवयीन मुलांसहित तेवीस आरोपींना पोलिसांनी अटक केलीय. प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं असून सहाय्यक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांच्याकडे हा तपास सोपविण्यात आला आहे, अशी माहिती अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिलीय.

या प्रकरणात वैद्यकीय फाॅरेन्सिक तांत्रिक अशा सर्व बाजूंनी तपास करण्यात येत असून पीडित मुलीने तक्रारीत दिलेल्या माहितीचीही शहानिशा केली जात आहे.

या घटनेत सामील आरोपी विविध राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांची मुलं असल्याचं सांगण्यात येतंय. गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी एका नगरसेविकेने दबाव आणला होता, अशीही चर्चा आहे ; त्यामुळे या घटनेला राजकीय वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत स्वत: अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त संजय गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जे डी मोरे, मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादाहरी चौगुले तपासावर लक्ष ठेवून आहेत.

संबंधित विडिओ इथे पाहा :

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!