चौथीतल्या मुलीवर गावातल्याच अल्पवयीन मुलांचा सामूहिक बलात्कार !

चौथीतल्या मुलीवर गावातल्याच अल्पवयीन मुलांचा सामूहिक बलात्कार !

चौथीतल्या मुलीवर गावातल्याच अल्पवयीन मुलांचा सामूहिक बलात्कार !

 उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील एका दहा वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना पुढे आलीय. मुलगी चौथीत शिकणारी आहे. गावातील मंदिरात घटस्थापना झालीय. मंदिरात लगबग आहे. परंतु, मंदिर परिसरातील समाजमंदिराजवळ पतसंस्थेच्या मागील सुनसान जागेत ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.

आरोपी अल्पवयीन आहेत. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यात गावच्या पुजाऱ्याचा मुलाचाही समावेश आहे. सामाजिक कार्यकर्त्या व निर्धार सामाजिक सेवाभावी संस्थेच्या सचिव सत्यभामा सौंदरमल यांनी लातूर शासकीय रुग्णालयात जाऊन पीडित मुलीची व तिच्या आईवडिलांची भेट घेतली.

मुलीचे आईवडिल मजुरी करतात. आईवडिल भेदरलेले आहेत व कारवाईपेक्षाही आपल्या मुलीचा जीव वाचला पाहिजे, यावरच त्यांचं सगळं लक्ष असल्याचं सत्यभामा सौंदरमल यांनी मिडिया भारत न्यूज ला सांगितलं.

रविवारी दुपारी मुलगी घरी आली तेव्हा तिची तब्येत चिंताजनक होती. तिला उलटी व जुलाब होत होते. ताप चढलेला होता. प्राथमिक उपचारानंतर सास्तुरच्याच ग्रामीण रुग्णालयात अर्धवट शुद्धीत तिला नेल्यावर तपासणीत डाॅक्टरांना संशय आला. पुढील तपासणीतून व मुलीने आईला सांगितलेल्या प्रसंगातून बलात्काराची घटना उघड झाली. आता मुलीची तब्येत स्थिर आहे.

मुलीचे आईवडिल तिथेही दुर्लक्षित असून शिळ्या अन्नावर दिवस काढताहेत, असं सांगून स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी किंवा रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी, असं मागणी वजा आवाहन सौंदरमल यांनी केलंय.

लोहारा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप यांनी मिडिया भारत न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे व त्यांची रवानगी बालनिरीक्षणगृहात करण्यात आलीय.

घटना १८ आॅक्टोबरची आहे. रविवारचा दिवस असल्याने पतसंस्थेतही कोणी नव्हतं. त्याचा गैरफायदा मुलांनी घेतला असावा, असं सास्तुर गावचे सरपंच यशवंत कासार यांनी मिडिया भारत न्यूज ला सांगितलं. गावातलं वातावरण शांत असून या घटनेस कोणताही जातीय रंग नसल्याचं कासार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.


MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!