एमएमआरडीए करणार अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसर विकास !

एमएमआरडीए करणार अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसर विकास !

एमएमआरडीए करणार अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसर विकास !

राज्यात झालेला सत्ताबदल, त्यानंतर अंबरनाथ शहरातील आमदार व माजी नगराध्यक्षांसहीत अनेकांचं मुख्यमंत्र्यांच्या गोटात जाणं आणि नगरपालिका निवडणुकीची पार्श्वभूमी अंबरनाथ शहराच्या पथ्यावर पडताना दिसत आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने अंबरनाथच्या पूर्वपश्चिमेस रेल्वे स्थानक परिसर विकासाचं काम प्रस्तावित झालं आहे. मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने ही जबाबदारी घेतली आहे.

स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात बोलावलेल्या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी, माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख, माजी नगरसेवक उमेश गुंजाळ, सुभाष साळुंखे, रवींद्र पाटील, मुख्याधिकारी डॉ.प्रशांत रसाळ, अभियंता अशोक पाटील, हावल, राजेश तडवी, नगररचनाकार विवेक गौतम, मनोज तारानी, तसंच एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते.

अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या पूर्व व पश्चिम भागातील आरक्षणाचा एमएमआरडीए मार्फत सॅटीस (SATIS) अंतर्गत विकास करण्यात येणार असून यशवंतराव चव्हाण खुल्या नाट्यगृहाच्या जागेवरील रखडलेलं पार्किंगचं कामही एमएमआरडीए हाती घेणार आहे. या कामात सुधारणा करून सभागृह व अभ्यासिकेचा समावेश करावा, अशी सूचना आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी केली. ती तत्वतः मान्य करण्यात आलीय. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना सकारात्मक सूचना दिल्या.

अंबरनाथ शहराच्या पुर्व बाजूस आरक्षण क्र. १०९ या ठिकाणी पुर्वी कै. य. मा. चव्हाण नाट्यगृह उभारण्यात आलेले होते. या वास्तुच्या ठिकाणी मंजूर आरक्षणानुसार पार्किंगची इमारत अंबरनाथ नगरपरिषदेकडून विकसीत करण्यात येत आहे.

एम.एम.आर.डी.ए. च्या अर्थसहाय्याने अंबरनाथ रेल्वे स्टेशन जवळील पुर्व व पश्चिमेकडील आरक्षणांचा Station Area Traffic Improvement Scheme ( SATIS) अंतर्गत विकास करण्याचा प्रस्ताव आपल्या प्रयत्नाने मंजूर झाला आहे. या मंजूर प्रकल्पाची किंमत रु. ५०.०० कोटी आहे. प्रस्तावित प्रकल्पाचे रेखांकन तयार करुन सविस्तर अंदाजपत्रक बनविण्याचे काम एम. एम. आर. डी. ए. कडून प्रकल्प व्यवस्थापन व सल्लागार मे. AMIAND Consulting Pvt Ltd. यांचेकडून प्रगतीपथावर आहे. यासाठी अंबरनाथ शहराच्या गरजा विचारात घेऊन सदर प्रकल्पाची आखणी करण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये अंबरनाथ नगरपरिषदेने आरक्षण क्र. १०९ या ठिकाणी उभारण्यात आलेल्या पार्किंगच्या वास्तुचे बळकटीकरण करुन एकत्रितरित्या Station Area Traffic Improvement Scheme (SATIS) | चा प्रकल्प उभारल्यास ते शहरवासियांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

नागरिकांच्या मागणीनुसार, नगरपरिषदेकडून बांधण्यात आलेल्या पार्किंगच्या वास्तुमध्ये सभागृह व वाचनालयाची व्यवस्था अंतर्भुत करुन SATIS प्रकल्पामध्ये हे काम करण्यात यावे. कृपया ही बाब विचारात घेऊन एम.एम.आर.डी.ए. स निर्देश देण्यात यावेत, असं निवेदन सुनील चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं.

अंबरनाथ शहरातील इतर विविध विकासकामांवरही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली असल्याने अंबरनाथ शहरातील विकासकामे जलदगतीने मार्गी लागणार असल्याचा विश्वास आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी मीडिया भारत न्यूज शी बोलताना व्यक्त केलाय.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!