देशाच्या पंतप्रधानांना बापूंच्या आदर्शांपासून ते काश्मिरी पंडितांच्या व्यथांची जबाबदारी चित्रपटांच्या हवाली सोडायची आहे का? वस्तुस्थिती आणि सत्याला सामोरे जाऊन मोदी सरकारला आपली जबाबदारी शेवटी कळणार तरी कधी ? कुठवर आपण फक्त खोटे-द्वेष-भेदभावांमध्ये राजकीय संधी शोधत राहणार?
१९२५ ते १९४७ या काळात तुमची पालक संघटना देशाच्या स्वातंत्र्य चळवळी आणि बापूंच्या विरोधात उभी राहिली. 'असहकार आंदोलन' असो, 'सविनय कायदेभंग' असो किंवा 'छोडो भारत'चे देशव्यापी आंदोलन असो... प्रत्येक वेळी इंग्रजांच्या पाठीशी उभे राहिलात. देश स्वतंत्र झाल्यावर पहिल्या दिवसापासून 'फोडा आणि राज्य करा'चा स्वीकार केला.
मोदीजी सांगा, १९९० मध्ये जेव्हा काश्मिरी पंडितांना दहशत आणि रानटीपणाच्या छायेत पळून जावे लागले, तेव्हा भाजपचे ८५ खासदार काय करत होते, ज्यांच्या पाठिंब्याने केंद्रात व्हीपी सिंग सरकार चालत होते?

मुख्यमंत्र्यांना सुरक्षा देण्याऐवजी राज्यपालांनी पंडितांना पळून जाण्यास का लावले? लक्षात ठेवा, भाजप समर्थित सरकारमध्ये काश्मिरी पंडितांवर अत्याचार होत असताना आणि ते पळून जात असताना राजीव गांधींनी संसदेचा घेराव केला, आवाज उठवला. मात्र भाजपाने शोकांतिकेला मौन राखून छुपा पाठिंबा दिला. भाजपा राजकीय फायद्यासाठी ‘रथयात्रा’ काढत बसली. ते तेव्हाही तसेच होते आणि आजही तसेच आहेत.
मोदी सरकारने ८ वर्षात काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी काय केले? काश्मीरमधील परिस्थिती पुन्हा बिघडली, हिंसाचार वाढला आणि हजारो काश्मिरींना पळून जावे लागले. काश्मिरी पंडितांसाठी काही करू शकत नसताना तुम्ही त्यांना ‘फिल्म’ दाखवायला सुरुवात केलीत? द्वेषाच्या लागवडीतून नफ्याचे पीक अजून किती काळ?

काश्मीरी पंडितांना घरदार सोडून जावे लागले... जेव्हा दिल्ली सरकार तुमच्या पाठिंब्यावर चालत होते, जेव्हा तुमचे नेते श्री जगमोहन मुख्यमंत्र्याला हटवून राज्यपाल होते आणि त्यांनी जबाबदारी झटकली... जेव्हा भाजप आणि अडवाणी "रथयात्रे" मध्ये व्यस्त होते. त्या रथयात्रेचे ऑपरेटर-इव्हेंट मॅनेजर मोदीजी होते.
आणि हो, काश्मीर आणि काश्मिरी पंडितांसाठी ही माहिती देतो. यूपीए सरकारमध्ये १० वर्षात ४२४१ दहशतवादी मारले गेले. पीएम पॅकेजमध्ये ३००० नोकऱ्या दिल्या गेल्या. ५९११ ट्रान्झिट निवास तयार केले. मोदी सरकारमध्ये ८ वर्षात १४१९ दहशतवादी मारले गेले. फक्त ५२० नोकऱ्या दिल्या गेल्या. १००० ट्रान्झिट निवास तयार केले. केलेत तर काहीच नाही, फक्त जखमा चिघळवून राजकीय फायदा घेणार ?
रणदीप सिंग सुरजेवाला
राष्ट्रीय महासचिव, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
ट्वीटरवरून साभार !