तबलिघी मरकजमध्ये सहभागी झालेल्या अडीच हजार विदेशी नागरिकांना भारतात प्रवेशबंदी !

तबलिघी मरकजमध्ये सहभागी झालेल्या अडीच हजार विदेशी नागरिकांना भारतात प्रवेशबंदी !

तबलिघी मरकजमध्ये सहभागी झालेल्या अडीच हजार विदेशी नागरिकांना भारतात प्रवेशबंदी !

४० देशांतील २५५० विदेशी नागरिकांना भारतीय गृहमंत्रालयाने तब्बल १० वर्षांसाठी भारतात प्रवेशबंदी केली आहे. व्हिसा नियमांचं उल्लंघन, लाॅकडाऊन काळात विविध राज्यांत धार्मिक उपक्रमात सहभाग नोंदवणे आणि कोविड आजाराच्या संसर्गाला कारणीभूत ठरणे असे आरोप या नागरिकांवर ठेवण्यात आले आहेत.

पर्यटन व्हिसावर भारतात आलेले विदेशी नागरिक दिल्लीतील निजामुद्दीन मशीदीत भरवण्यात आलेल्या तबलिघी जमातच्या धर्मसंमेलनात सहभागी झाले होते. कोविडसंसर्गाच्या पार्श्वभूमीवर निष्काळजीपणा दाखवल्याने त्यांच्यात मोठ्या संख्येने कोविडबाधा झाली होती. काही जणांचा मृत्यूही ओढवला होता. या मंडळींनी उपचारार्थही सहकार्य केले नसल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

भारतातील विविध राज्य सरकारांनी या नागरिकांच्या धार्मिक उपक्रमातील सहभागाबाबत तसंच नियम डावलून मस्जिदीमध्ये समुहाने केलेल्या वास्तव्याबाबत केंद्राला अहवाल सोपवले आहेत. त्या आधारेच केंद्राने कारवाईचा निर्णय घेतला.

इतक्या मोठ्या संख्येने विदेशी नागरिकांना दीर्घकालीन प्रवेशबंदी केली गेल्याची ही पहिलीच वेळ आहे.

तबलिघी जमातच्या मरकजमध्ये बेकायदेशीरपणे विदेशी पैशाचा विनियोग झाल्याबाबतही सीबीआयने प्राथमिक चौकशी सुरू केली आहे.

News by MediaBharatNews Team

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!