तूने ओ टीचर कैसा जादू किया …!!!

तूने ओ टीचर कैसा जादू किया …!!!

तूने ओ टीचर कैसा जादू किया …!!!

काॅलेजचे ते दिवस खरंच खूपच सुंदर होते. मला मराठी शिकवायला एक मिस होत्या..त्यांच नाव रोहिणी. सावळ्या, उंच आणि बारीक अंगकाठीच्या…दिसायला अतिशय सुंदर, अगदी नावाप्रमाणेच नक्षत्रासारख्या …खूप छान शिकवायच्या..शिकवताना खूप तल्लीन व्हायच्या. समरसून जायच्या.

आमच्याशी त्यांची छान गट्टी जमली होती. अगदी आमच्या घरगुती गप्पा सुद्धा व्हायच्या लेक्चरला. त्या त्यांच्या घरातल्या प्रत्येक माणसाविषयी भरभरून बोलायच्या. आम्हालाही आमच्या घरचं विचारून घ्यायच्या. आमची चौकशी करायच्या. मैत्रीणच झाल्या होत्या आमच्या.

सासू, सासरे, दीर, नणंद आणि नवरा या सगळ्याविषयी छान बोलायच्या. त्यांच नुकतच लग्न झालं होत. ‘माझे दिवस आता सद्या फुलपाखरासारखे आहेत ‘अस आम्हाला सांगायच्या. त्यांचा मूड नेहमीच चांगला असायचा.

बऱ्याचदा त्यांना गाणी बोलायला आवडायची. त्या स्वत: आणि आम्ही मिळून गाणी गायचो. पण त्यांना आवडतं गाण विचारल की त्या नेहमीच आपलं हेमामालिनीवर चित्रित झालेलं ‘तू ने ओ रंगिले कैसा जादू किया ‘ निवडायच्या. गायच्याही छान.

गाणं गाताना इतक्या तल्लीन व्हायच्या की आम्हाला वाटायच्या ह्या बहुतेक स्वप्नात हरवून गेल्या. त्यांच ते तल्लीन होणं सांगून जायचं की त्यांच्या घरातल वातावरण किती सुरेख असेल. आम्हा मुलींना फार हेवा वाटायचा त्यांचा. वर्गात आम्ही मुलीच होतो, आम्ही सर्वजणी शांत होऊन मिस आता पुढे काय सांगणार याची वाट बघत बसू.

विशेष म्हणजे आम्हीही मिसचा चेहरा सोडून काहीच बघत नव्हतो. त्यांच बोलणं ऐकण्यास सर्वांचे कान आतूर असायचे. खूप सुंदर सुंदर अनुभव त्या आमच्याशी शेअर करायच्या.

आजही मला “तू ने ओ रंगिले कैसा जादू किया “हे गाण लागलं की आमच्या मराठीच्या मिस आठवल्याशिवाय राहत नाही. आजही त्यांच्या आठवणी तितक्याच ताज्या. दो-यात ओवलेल्या मोगऱ्यायासारख्या सुगंधी…!!!

 

 

 

नंदा गवांदे

लेखिका शिक्षिका आहेत.

gawandenanda734@gmail.com

 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!