केरळात ग्रामस्थांच्या क्रूरतेने घेतला भुकेल्या गरोदर हत्तीणीचा बळी !

केरळात ग्रामस्थांच्या क्रूरतेने घेतला भुकेल्या गरोदर हत्तीणीचा बळी !

केरळात ग्रामस्थांच्या क्रूरतेने घेतला भुकेल्या गरोदर हत्तीणीचा बळी !

कोरोनाच्या भयनीय स्थितीत माणूस एकीकडे माणसाला वाचविण्यासाठी जीवाची बाजी लावतोय, तर दुसरी कडे निर्बळ, मुक्या झाडं जीवांना बिनधास्त चिरडण्याचा अहंकार सोडायला तयार नाही. अशाच काही बिनकाळजाच्या लोकांनी केरळमधील एका उपासमारीने व्याकूळ गर्भवती हत्तींणीचा जीव घेतलाय. चक्क आपल्या विकृत मनोरंजनासाठी तिच्या तोंडात फटाके फोडले. तिच्या कळवळत्या भुकेच्या बदल्यात त्या निरागस हत्तीणीला मरण देऊन जणू भुतदयेची लक्तरंच वेशीला टांगली.

वन अधिकारी मोहन कृष्णन यांनी समाज माध्यमातून हा संतापजनक प्रकार समोर आणलाय. केरळमधील मल्लापुरम जिल्ह्यात भुकेने व्याकूळ ही गरोदर हत्तीण आली होती. पण काही जणांनी तिच्या भुकेचाच तमाशा मांडला. अननसामध्ये पेटते फटाके मिसळून खाऊ घातले.

हत्तीणीने भुकेपोटी खाण्यास सुरुवात करताच, फटाक्यांचा स्फोट झाला. त्यात तिची सोंड, जबडा छिन्नविच्छिन्न, रक्तबंबाळ होऊन आतून गंभीर जखमा झाल्या. वेदनेने व्याकूळ होऊन सैरावैरा धावत होती. तिला वेदना सहन होत नव्हत्या. जवळच्याच नदीत जाऊन आपली सोंंड बुडवून तो दाह शमवुन घेण्याचा प्रयत्न करू लागली. परंतु त्या नदीच्या पाण्यातच तिचा संध्याकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. मुक्या जनावरांने माणसावर विश्वास ठेवला खरा, पण माणूस अघोरी लागला.

अर्थात, या घटनेने कळवळणारे लोकही आहेतच. अभिनेत्री श्रद्धा कपूरने या निंदनीय घटनेचा निषेध करत अपराध्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. अभिनेता सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टीनेही या प्रकरणी घृणा व्यक्त करीत कारवाईची अपेक्षा केलीय.

वन अधिकारी मोहन कृष्णन यांनी एका ट्रकमधुन या हत्तीणीला तिचं बालपण आणि आयुष्य जगलेल्या जंगलात नेलं आणि मृतदेहावर सन्मानाने अंतिम संस्कार केले. पण प्रश्न उरतोच. स्वतःला सर्वश्रेष्ठ मानणारा आणि जल, जंगल, जनावरांवर मालकी सांगणारा माणूस आपल्याप्रमाणे इतरांच्या जीवाचं मोल कधी जाणणार ? माणसातली ही क्रूरता कधी संपणार ?

News by Praful Kedare

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!